दुनियादारी 2 चित्रपट येणार. अंकुश चौधरी, स्वप्निल जोशी आणि सई ताम्हणकर हे तिघे मराठीतील सर्वांचे आवडते कलाकार आहेत, यात शंका नाही. दुनियादारीसारख्या चित्रपटातून त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता या चित्रपटाला तब्बल अकरा वर्ष पूर्ण झाली आहेत आणि यानिमित्ताने आता दिग्दर्शक संजय जाधव यांनी आपल्या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात आपल्याला पुन्हा एकदा सई ताम्हणकर, अंकुश चौधरी आणि स्वप्निल जोशी या तिघांनी तिकडी पहायला मिळणार आहे.
दुनियादारी 2 चित्रपट येणार
संजय जाधव यांनी आपल्या नवीन चित्रपटाची घोषणा तर केली आहे. पण चित्रपटाचे नाव काय असेल आणि हा चित्रपट कधी रिलीज होईल, याबद्दल अजून कोणतीही माहिती मिळालेली नाहीये. परंतु सई ताम्हणकर, अंकुश चौधरी आणि स्वप्निल जोशी चित्रपटातील असतील, मात्र नक्की आहे. त्यामुळे सगळे फॅन्स खूपचं उत्सुक झाले आहेत.
चित्रपटाची शूटिंग अजून होणे बाकी आहे, म्हणून हा चित्रपट रिलीज व्हायला अजून एक वर्षाचा कालावधी लागेल, असं दिसतंय. परंतु प्रेक्षक आतापासूनचं खूप एक्साईटेड आहेत.
संजय जाधव यांनी काही वर्षांपूर्वी दुनियादारी हा चित्रपट बनवला होता. ज्यात अंकुश चौधरी, स्वप्निल जोशी आणि सई ताम्हणकर यांची तिकडी होती. दुनियादारीमध्ये या तिघांनी चांगलीच धमाल केली होती. चित्रपटाची गोष्ट, चित्रपटाची गाणी, चित्रपटाचे डायलॉग हे सगळं प्रेक्षकांना तुफान आवडलं होतं आणि त्यावेळेस मराठीतील सर्वात जास्त कमाई करणारा हा चित्रपट ठरला होता.
आता संजय जाधव आणि त्यांची ही तिकडी पुन्हा एकदा एकत्र येणार म्हटल्यावर असाचं दुनियादारी सारखा धमाका होणार, एवढं मात्र नक्की. सध्या स्वप्निल जोशी आणि अंकुश चौधरी हे विविध मराठी चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. तर सई ताम्हणकर ही हिंदी चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये जास्त दिसून येते. त्यामुळे मराठी पेक्षक तिला मिस करत होते.
परंतु आता तिला पुन्हा एकदा मराठी चित्रपटात पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. हे तिघे प्रेक्षकांसाठी एक चांगली कलाकृती घेऊन येतील, जी सर्वांनाचं आवडेल असं दिसतंय. सोशल मीडियावर आतापासूनचं या चित्रपटाची जोरदार चर्चा पाहायला मिळतेय.
तर तुम्ही सुद्धा एक्साईटेड आहात ना संजय जाधव यांचा हा नवीन चित्रपट पाहण्यासाठी ? अंकुश चौधरी, स्वप्निल जोशी आणि सई ताम्हणकर पुन्हा एकदा कमाल करतील का ? तुम्हाला काय वाटतं ? नक्कीचं कमेंट करुन सांगा.
आणि अशाचं नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !