ड्रायव्हिंग लायसेन्स हरवलंय मित्रांनो आपल्याला सगळ्यांनाच प्रवास करायला खूप आवडतं. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला वाहनांचा खूपच उपयोग होतो. अगदी कमी वेळात आणि कमी कष्टात आपण कितीही लांबच्या ठिकाणी पोहचू शकतो.
पण रस्त्यावर जवाबदारीने गाडी चालवायची असेल तर आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसेन्स असणे बंधनकारक आहे. ड्रायव्हिंग लायसेन्स मिळवण्यासाठी वयाचे 18 वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे.
18 वर्ष पूर्ण असलेल्या व्यक्तींनाच सरकारकडून ड्रायव्हिंग लायसेन्सच्या स्वरूपात रस्त्यावर गाडी चालवण्याची परवानगी दिली जाते. पण जर तुम्ही 18 वर्षांखालील असाल आणि तरी तुम्ही रस्त्यावर गाडी चालवली तर पकडल्यास तुम्हाला दंड होऊ शकतो आणि शिक्षासुद्धा होऊ शकते.
ड्रायव्हिंग लायसेन्स हरवलंय
गाडी चालवण्यासाठी परवाना म्हणजेच ड्रायव्हिंग लायसेन्स खूपच महत्वाचा असतं. पण जर आपलं ड्रायव्हिंग लायसेन्स हरवलंय तर काय होईल ?
आज आम्ही तुम्हाला हेच सांगणार आहोत की ड्रायव्हिंग लायसेन्स हरवलंय तर काय करायचं ?

या प्रोसेसचा तुम्ही वापर करू शकता :
ओरिजिनल ड्रायव्हिंग लायसेन्स हरवल्यानंतर तुम्हाला त्याचं डुप्लिकेट लायसेन्स तयार करून घ्यावं लागेल.
डुप्लिकेट लायसेन्स तयार करण्यासाठी तुम्ही ऑफलाईन पद्धतीने असा अर्ज करू शकता :
डुप्लिकेट लायसेन्स तयार करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला पोलीस स्टेशनला जाऊन ड्रायव्हिंग लायसेन्स हरवल्याची एफआयआर करावी लागेल.
यानंतर तुम्ही पोलीस स्टेशनमधून एफआयआरची कॉपी घ्या. या एफआयआरच्या मदतीने तुम्ही आरटीओकडे काही फी भरून अर्ज करू शकता. मग आरटीओकडून तुम्हाला डुप्लिकेट लायसेन्स मिळून जाईल.
याशिवाय तुम्ही डुप्लिकेट लायसेन्ससाठी ऑनलाइन अर्जसुद्धा करू शकता.
सर्वात आधी तुम्ही परिवहन विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जा. वेबसाईटवर विचारलेली माहिती भरून एलएलडी फॉर्म भरा. फीसुद्धा ऑनलाइन भरा.
त्यानंतर फॉर्मची प्रिंट काढा आणि त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडा.
त्यानंतर आरटीओ कार्यालयात फॉर्म जमा करा आणि सर्व प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसेन्स मिळेल.
ऑनलाईन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने तुम्ही डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसेन्ससाठी अप्लाय करू शकता. फी भरल्यानंतर पुढील 30 दिवसांच्या आत तुम्हाला डुप्लिकेट लायसेन्स मिळेल.
मित्रांनो तुम्हाला हा आर्टिकल आवडला असेल तर आमचे दुसरे आर्टिकलसुद्धा नक्की वाचा.
खूप खूप धन्यवाद !