Donuts Recipe In Marathi 2024
Donuts Recipe In Marathi 2024 आपल्या सगळ्यांच्या घरातील लहान मुलं अनेकदा बाहेरचं भरपूर काही खात असतात अशावेळी आपल्याला त्यांच्या आरोग्याची खूप काळजी वाटते. कारण लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती काही एवढी चांगली नसते आणि बाहेरचे पदार्थही एवढे काही चांगल्या वस्तूंपासून बनवलेले नसतात त्यामुळे बाहेरून काही गोष्टी खाण्यापेक्षा आपण त्या घरातच बनवल्या तर किती चांगलं होईल.
आपण मुलांचे खाण्याचे अनेक असे पदार्थ आहेत जे अगदी सहज घरी बनवू शकतो. ते पदार्थ बाहेरच्यापेक्षा टेस्टीही होतील आणि हेल्दीही असतील. सध्या मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत त्यामुळे ते घरीच असतात आणि खाण्यासाठी काही न काही नवीन चटपटीत गोष्टींची फर्माईश करत असतात त्यामुळे आपल्यालाही प्रश्न पडतो की मुलांना काय टेस्टी बनवून द्यावं.
डोनट्स हा लहान मुलांचा खूपच आवडता पदार्थ आहे. मुलं अनेकदा बाहेरून खाण्यासाठी ते आणत असतात पण आपण हेच डोनट्स घरातच अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकतो. या डोनट्सची टेस्टसुद्धा अगदी बाहेरच्यासारखीच लागेल मग बाहेरून आणून खाण्याची काहीच गरज नाही. घरी आपण मुलांना लागतील तसे पुन्हा पुन्हासुद्धा बनवू शकतो.
आज आम्ही तुमच्यासाठी डोनट्स बनवण्याची सहज सोपी Donuts Recipe In Marathi 2024 रेसिपी घेऊन आलो आहोत. यामध्ये आपण अंडं किंवा यीस्ट वापरणार नाही फक्त घरातील उपलब्ध साहित्यापासूनच बनवणार आहोत. तुम्ही याच सर्व स्टेप्स फॉलो करून डोनट्स बनवा आणि आपल्या मुलांना खायला द्या. मुलांना नक्कीच खूप आवडतील.
डोनट्स बनवण्याचं साहित्य :
डोनट्स Donuts Recipe In Marathi 2024 बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण पाहूया.
1 कप मैदा
पाव कप दही
1 मोठा चमचा पिठीसाखर
अर्धा चमचा बेकिंग सोडा
2 चमचे दूध
थोडंसं तूप
तळण्यासाठी तेल
कोटिंग बनवण्यासाठी साहित्य :
1 चमचा कस्टर्ड पावडर
2 मोठे चमचे साखर
अर्धा कप दूध
चॉकलेट स्प्रेड
पिस्त्याचे काप आणि पिठीसाखर
डोनट्स बनवण्याची कृती :
1. Donuts Recipe In Marathi 2024 डोनट्स बनवण्यासाठी सर्वात आधी एका बाऊलमध्ये 1 कप मैदा घ्यायचा. यामध्ये पाव कप दही घालायचं आहे. 1 मोठा चमचा पिठीसाखर टाकायची. तुम्हाला जर गोड हवं असेल तर तुम्ही 2 मोठे चमचे पिठीसाखर घेऊ शकता.
2. त्यानंतर अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकायचा. तुम्ही बेकिंग पावडरसुद्धा वापरू शकता किंवा मग अर्धा चमचा इनोसुद्धा टाकू शकता. हे आपल्याला हाताने असंच मिक्स करून घ्यायचं आहे.
3. मग यामध्ये थोडं थोडं दूध टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये थोडंसं बटर किंवा तूप घालून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपला हा गोळा तयार आहे. हा गोळा आपल्याला अर्धा तास सेट करायला ठेवायचा आहे. बाऊलवर झाकण ठेवून द्यायचं आणि आता आपण वाट बघूया.
4. अर्धा तास झालेला आहे. आता आपण जो मैद्याचा गोळा तयार करून घेतलेला आहे त्याचा एक भाग घेऊन त्याची आपल्याला जाडसर पोळी लाटून घ्यायची आहे. पोळी आपल्याला थोडीशी जाड ठेवायची आहे. आता यावर ग्लास किंवा वाटीच्या मदतीने आपल्याला गोल काप करून घ्यायचे आहेत. त्यानंतर औषधाच्या बाटलीचं एक छोटंसं झाकण घेऊन मधेसुद्धा गोल आकार कापून घ्यायचे आहेत.
5. अशाप्रकारे आपण डोनट्सचा बेस तयार केला आहे. असेच सर्व डोनट्सचे बेस तयार करून घ्यायचे आहेत. आपले डोनट्सचे बेस तयार आहेत. आपल्याला आता हे डीप फ्राय करून घ्यायचे आहेत.
6. एका कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं. आता डोनट्स या तेलामध्ये टाकूया. तेल सुरुवातीला गरम हवं नंतर मिडीयम फ्लेमवर आपल्याला हे छान गोल्डन रंग येईपर्यंत दोन्ही बाजूने फ्राय करून घ्यायचे आहेत. आता आपले हे सर्व डोनट्स तेलामध्ये फ्राय करून झालेले आहेत.
छान एकसारखा रंग आलेला आहे. डोनट्स आपण मिडीयम साईझचे ठेवलेले आहेत. जर तुम्हाला थोडासा मोठा साईझचा डोनट करायचा असेल तर जी बारीकशी जाडी आहे ती थोडी जाड ठेवायची.
7. या डोनट्ससाठी Donuts Recipe In Marathi 2024 जी वरची कवरिंग असते किंवा कोटिंग असते ती तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची करू शकता. आज आपण एकदम सोपी कोटिंग पाहणार आहोत. आज आपण कस्टर्ड पावडरपासून याची कवरिंग किंवा कोटिंग करणार आहोत.
8. कवरिंग बनवण्यासाठी एका वाटीमध्ये 1 चमचा व्हॅनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर घ्यायचं. यामध्ये 2 मोठे चमचे साखर टाकायची. जर तुम्ही लहान मुलांसाठी बनवत असाल तर 3 ते 4 चमचे साखर टाकली तरी चालेल. कारण वरचं कवरिंग थोडं गोडच असतं. यामध्ये अर्धा कप दूध घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे.
9. हे छान मिक्स करून झालं की आता आपल्याला गॅसवर कमी फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे. गॅसवर एका पॅनमध्ये हे मिश्रण टाकायचं आणि चमच्याने हलवत थोडीशी घट्ट कंसिस्टंसी होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. चमच्याने मिश्रण सलग ढवळत रहायचं आहे.
10. काही वेळाने हे मिश्रण घट्ट झालेलं आहे. गॅस बंद करायचा आणि एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं. आता आपल्याला डोनट्स यामध्ये बुडवून प्लेटमध्ये ठेवायचे आहेत. हे डोनट्स तुम्ही चॉकलेट स्प्रेड किंवा चॉकलेट सॉसमध्येसुद्धा बुडवून घेऊ शकता. चॉकलेट स्प्रेड डोनट्सला वरून चमच्याने लावू शकता किंवा डोनट्स त्यात बुडवून कोट करू शकता.
11. आपण काही डोनट्सला चॉकलेट स्प्रेड लावलंय आणि काही डोनट्सला कस्टर्ड पावडर लावलंय. यावर सजावट म्हणून थोडे पिस्त्याचे काप लावायचे आहेत. चॉकलेट स्प्रेड गोड आहे त्यात भरपूर साखर असते पण कस्टर्डमध्ये आपण साखर कमी टाकलेली आहे. जर तुम्ही हे डोनट्स मुलांसाठी बनत असाल तर तुम्हाला यावर थोडीशी पिठीसाखर टाकायची आहे त्यामुळे ते छान गोडसर होतील.
12. आपले हे डोनट्स Donuts Recipe In Marathi 2024 तयार आहेत. हे आपल्याला 15 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवायचे आहेत आणि त्यानंतर खाण्यासाठी द्यायचे आहेत. आपण घरगुती उपलब्ध साहित्यापासून अंडं किंवा यीस्ट न वापरता डोनट्स बनवले आहेत. हे डोनट्स तुम्ही नक्की बनवून पहा. तुमच्या कुटुंबियांना खायला द्या. घरातील सर्वांना खूप आवडतील पण विशेषतः लहान मुलं तर या डोनट्सचे फॅन होऊन जातील.
डोनट्स अनेक वेगवेगळे प्रकारचेसुद्धा बनवले जातात. चॉकलेट डोनट्स तर सर्वांचे खूपच फेव्हरेट आहेत. चॉकलेट असल्यामुळे ते आणखीनच जास्त टेस्टी लागतात.
तुम्ही घरात एखाद्या स्पेशल दिवशी हे डोनट्स नक्कीच बनवू शकता. बर्थडे असो किंवा मग ऍनिव्हर्सरी तुम्ही हे डोनट्स बनवून तो दिवस आणखीनच स्पेशल बनवू शकता. डोनट्स हे खूपच टेस्टी डेझर्ट आहे.
जर तुम्ही घरीच Donuts Recipe In Marathi 2024 डोनट्स बनवले तर ते फ्रीजमध्ये ठेवून कमीतकमी 1 आठवड्यापर्यंत चांगले ठेवू शकता. पण हे डोनट्स इतके टेस्टी बनतात की ज्यादिवशी बनवले त्याच दिवशी संपून जातील एवढं खरं आहे. लहान मुलं असो की मोठी माणसं कोणीही ते उरु देणार नाही. दुसऱ्या अनेक मिठायांपेक्षा डोनट्स हे खूपच हलके आणि खाण्यासाठी टेस्टीसुद्धा असतात.
Donuts Recipe In Marathi 2024 महत्वाच्या टिप्स :
1. तुम्हाला जर डोनट्स मोठ्या आकाराचे बनवायचे असतील तर पोळी लाटताना ती थोडी जाड ठेवायची.
2. डोनट्स जर तुम्ही लहान मुलांसाठी बनवत असाल तर कवरिंग तयार करताना त्यात साखर थोडी जास्त टाकायची कारण वरचं कवरिंग थोडं गोडच असतं.
3. काही डोनट्सला आपण चॉकलेट स्प्रेड लावलेलं आहे तर काहींना कस्टर्ड लावलं आहे. चॉकलेट स्प्रेडमध्ये साखर असते पण कस्टर्डमध्ये एवढी साखर नसते. जर तुम्ही डोनट्स मुलांसाठी बनवत असाल तर कस्टर्ड लावलेल्या डोनट्सवर पिठीसाखर टाकायची म्हणजे ते छान गोड होतात.
4. डोनट्स तयार झाल्यानंतर ते 15 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवायचे आहेत आणि मग खाण्यासाठी घ्यायचे आहेत.
या मस्त टिप्स वापरून तुम्ही अगदी सहज टेस्टी डोनट्स बनवू शकता.
काही महत्त्वाचे प्रश्न FAQ’s For Donuts Recipe In Marathi 2024 :
1. टेस्टी डोनट्स Donuts Recipe In Marathi 2024 कसे बनवता येतात ?
डोनट्स बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये मैदा घ्यायचा त्यात दही, पिठीसाखर, बेकिंग सोडा टाकायचा आणि हातानेच मिक्स करून घ्यायचं. मग थोडं थोडं दूध टाकून घट्टसर गोळा तयार करायचा. थोडंसं तूप टाकून पुन्हा मिक्स करायचं. आपला गोळा तयार आहे. त्यावर झाकण ठेवून अर्धा तास सेट व्हायला ठेवायचं आहे. त्यानंतर या मैद्याच्या गोळ्याचा एक भाग घेऊन त्याची जाडसर पोळी लाटून घ्यायची. त्यावर ग्लास किंवा वाटीने गोल काप करून घ्यायचे. औषधाच्या बाटलीच्या छोट्या झाकणाने मधेसुद्धा गोल आकार कापून घ्यायचा. त्यानंतर ते तेलात तळून घ्यायचे. आता कस्टर्ड तयार करायचं आणि डोनट्स त्यात बुडवायचे. चॉकलेट स्प्रेडसुद्धा डोनट्सला लावू शकता. कस्टर्ड डोनटला लावल्यावर वरून पिस्त्याचे काप आणि पिठीसाखर टाकायची. आपले डोनट्स तयार आहेत.
2. डोनट्स Donuts Recipe In Marathi 2024 हा नेमका कुठला खाद्यपदार्थ आहे ?
डोनट्स हे खूपच टेस्टी डेझर्ट आहे. डोनट्स हा पदार्थ खरंतर जपान देशातील आहे. मिस्टर डोनटमुळे तो प्रसिद्ध झाला पण नंतर तो अमेरिकेतही खूप लोकप्रिय झाला आणि आता जगभरात सगळीकडेच डोनट्स खूप आवडीने खाल्ला जातो. विशेषतः लहान मुलांना डोनट्स खायला प्रचंड आवडतं.
या सुट्ट्यांमध्ये तुमच्या मुलांसाठी टेस्टी डोनट्स नक्की बनवा. इतके मस्त डोनट्स जर आपल्याला घरीच बनवता आले तर मग बाहेरून आणायची गरजच नाही. हे इतके टेस्टी लागतात की तुमची मुलं पुन्हा पुन्हा नक्कीच बनवायला लावतील. आजच ही डोनट्सची रेसिपी बनवून पहा.
तुम्हाला Donuts Recipe In Marathi 2024ही रेसिपी आवडली का नक्कीच सांगा. अशाच आणखी टेस्टी रेसिपी शिकण्यासाठी आमचे दुसरे आर्टिकलसुद्धा नक्कीच वाचा.
तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.