Documents For Income Tax Return इन्कम टॅक्स रिटर्न्स भरायचाय, मग हे डॉक्युमेंटस तयार ठेवा

Documents For Income Tax Return

Documents For Income Tax Return वित्तीय वर्ष 2022-23 साठी इन्कम टॅक्स रिटर्न्स फाईल करण्यासाठी सुरुवात झालेली आहे. जर तुम्ही स्वतः रिटर्न फाईल करण्याचा निर्णय घेतलाय, तर कोणते डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत, आज आपण याबद्दल जाणून घेऊया.

Documents For Income Tax Return

1) Form 16 : जर तुम्ही जॉब करत असाल, तर इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी तुमच्याकडे Form 16 असणं खूप गरजेचं आहे. हा फॉर्म तुमच्या एम्प्लॉयरकडे तुम्हाला मिळेल, ज्यात तुमच्या ग्रॉस इन्कम, नेट इन्कम आणि TDS बद्दल माहिती असते. ITR भरतेवेळी हा फॉर्म जरूर बरोबर ठेवा.

2) होम लोन स्टेटमेंट : जर तुम्ही होम लोन घेतलं असेल, तर मागील वर्षांचं होम लोन स्टेटमेंट नक्की घ्या. ज्यात तुम्ही किती व्याज भरलंय याची नोंद असेल आणि या रकमेवर तुम्ही इन्कम टॅक्स धारा 24 अंतर्गत सूट मिळवू शकता.

3) कॅपिटल गेन डॉक्युमेंटस : मागील वित्त वर्षात तुम्ही शेअर मार्केट, म्युच्युअल फंड आणि प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करून परतावा मिळवला असेल तर त्याला कॅपिटल गेन म्हटलं जातं. ITR भरताना हे डॉक्युमेंटस असणं गरजेचं आहे.

4) इन्व्हेस्टमेंट डॉक्युमेंटस : जर तुम्ही मागील आर्थिक वर्षात इन्व्हेस्टमेंट केली असेल, तर या इन्व्हेस्टमेंटचे डॉक्युमेंटस तुम्ही आयकर नियम 80C अंतर्गत आयकर सूट मिळवण्यासाठी वापरू शकता.

वजन कमी करण्यासाठी हा उपाय करा

5) सॅलरी स्लिप : सॅलरीड लोकांसाठी ITR भरताना सॅलरी स्लिप असणे खूप गरजेचे आहे.

6) आधार कार्ड पॅन कार्ड : कोणताही फॉर्म भरायचा असल्यास आधार कार्ड आणि पॅन कार्ड असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे ITR भरतानाही आधार कार्ड आणि पॅन कार्ड जवळ बाळगणं महत्त्वाचे आहे.

आजकाल अनेकजण स्वतःचं ऑनलाईन ITR भरतात. ही सगळी प्रोसेस ऑनलाइन असते. परंतु वरील प्रमाणे सगळे डॉक्युमेंटस Documents For Income Tax Return तुमच्याकडे असतील, तर तुम्ही सहज ITR भरू शकाल.

तर तुम्ही ITR भरता का ? नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top