ज्ञानदा रामतीर्थकर मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, फॅन्सना दिलं सरप्राईज

ज्ञानदा रामतीर्थकर मराठी चित्रपट

अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर ही ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतील अप्पू या भूमिकेमुळे प्रचंड लोकप्रिय झाली. या मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. पण काही महिन्यांपूर्वी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला तेव्हापासून फॅन्स ज्ञानदाला खूप मिस करत होते. ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेचे चाहते ही मालिका पुन्हा सुरू करण्याचीही मागणी करत असतात.

पण आता ज्ञानदाच्या चाहत्यांसाठी खूपच मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर तिने आपल्या फॅन्सना जबरदस्त सरप्राईज दिलं आहे आणि सोशल मीडियावरून एक घोषणा केली आहे. ज्ञानदा रामतीर्थकर मराठी चित्रपट येतोय.

Dnyanada Ramtirthkar Marathi Movie
Dnyanada Ramtirthkar Marathi Movie

ज्ञानदा रामतीर्थकर मराठी चित्रपट 

लवकरचं ज्ञानदाची मुख्य भूमिका असलेला ‘मुंबई लोकल’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ज्ञानदा रामतीर्थकर मराठी चित्रपट तिच्यासोबत अभिनेता प्रथमेश परब, पृथ्वीक प्रताप आणि मनमीत पेम दिसणार आहेत.

ज्ञानदाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये ज्ञानदासोबत प्रथमेश परब आणि पृथ्वीक प्रताप दिसून येत आहेत. त्यांनी मुंबईच्या सिद्धिविनायक गणपती मंदिरात जाऊन बाप्पाचा आशीर्वाद घेऊन आपल्या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित केलंय.

Dnyanada Ramtirthkar Marathi Movie
Dnyanada Ramtirthkar Marathi Movie

Dnynada Ramtirthkar Marathi Movie  

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहलंय की, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर तुम्हा सर्वांसाठी एक सरप्राईज. माझ्या नवीन प्रोजेक्टबद्दल तुम्हाला सर्वांना सांगताना आनंद होतोय. ‘मुंबई लोकल‘ हा माझा नवीन चित्रपट प्रथमेश परब, पृथ्वीक प्रताप, मनमीत पेमसोबत लवकरच येणार आहे. नेहमीप्रमाणे तुमच्या आशीर्वाद आणि प्रेमाची गरज या चित्रपटासाठीही आहे. गणपती बाप्पा मोरया.

Dnyanada Ramtirthkar Marathi Movie
Dnyanada Ramtirthkar Marathi Movie

अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर मराठी चित्रपट दिसणार असल्यामुळे तिचे फॅन्स खूप खुश झाले आहेत. तिने शेअर केलेल्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी आणि अनेक मराठी कलाकारांनी कमेंट्स करत या नवीन चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

मिलिंद बायकोची बायको असती प्रसिद्ध अभिनेत्री पण

ज्ञानदाच्या या नवीन चित्रपटाबद्दल आणि तिच्या भूमिकेबद्दल लवकरच माहिती समोर येईल. चाहते ज्ञानदाला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहेत आणि तिच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहताय.

मनोरंजनविश्वातील अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा. 

तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top