Divya Bharti Death दिवाना या चित्रपटाचं नाव घेतलं की, शाहरुख खान जेवढा आठवतो तेवढीचं या चित्रपटात त्याची नायिका असलेली अभिनेत्री दिव्या भारतीसुद्धा आठवते. एकेकाळी श्रीदेवीला घाम फोडणारी बॉलीवूडची पुढची सुपरस्टार हीरोइन म्हणून ओळखली जाणारी दिव्या भारती अवघ्या 19 व्या वर्षी हे जग सोडून गेली आणि तिच्या चाहत्यांना आयुष्यभराचं दुःख देऊन गेली.
दिव्या भारतीने वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर फक्त तीनचं वर्षात तिने अनेक हिट सिनेमे दिले आणि बॉलिवूडची नंबर वन अभिनेत्री बनली. यशाच्या शिखरावर असताना तिने साजिद नाडियाडवाला या निर्मात्याशी लग्नही केलं.
दिव्या भारतीचा सोनेरी प्रवास
तीन वर्षाच्या चित्रपट कारकिर्दीमध्ये तिचे अनेक चित्रपट सुपरहिट होते. त्याचबरोबर मोठमोठ्या निर्मात्यांच्या रांगा तिच्या घराबाहेर लागलेल्या असायच्या. तिची लोकप्रियता शिखरावर होती. परंतु एक दिवस अचानक बातमी आली की, दिव्या भारती तिच्या राहत्या घराच्या बाल्कनीमधून खाली कोसळली आणि तिचा मृत्यू झाला आहे. या बातमीवर कोणालाही विश्वास ठेवणं शक्य होत नव्हतं.
हेही वाचा : तारक मेहताच्या सोनुने सोडली मालिका ?
आणि आता तिच्या रंग या चित्रपटाचा सह अभिनेता कमल सदाना यांनी तिच्याबद्दल divya bharti death एक मोठा खुलासा केला आहे. कमल सदाना सांगतात, दिव्या भारती खूपचं मजेशीर व्यक्तिमत्व होती. जेव्हा ती शूटिंगला यायची तेव्हा ती सर्वांना हसवायची, खूप आनंदी राहायची. तिच्या मृत्यूच्या काही दिवसांआधीचं मी तिच्याबरोबर शूटिंग केली होती, त्यामुळे तिने आत्महत्या केली असेल किंवा कुणी तिची हत्या केली असेल, असं मला वाटत नाही.
Divya Bharti Death : दिव्या भारतीच्या मृत्यूचं गूढ
जे काही झालं, तो फक्त एक divya bharti death अपघात होता. ती तिच्या राहत्या घराच्या बाल्कनीमधून खाली कोसळली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यावेळेस दिव्या भारती दारू प्यायलेली होती आणि तिच्या घरातील बाल्कनीला कोणतीही फेन्सिंग नव्हती. त्यामुळे तेथून तिचा तोल गेला आणि ती खाली कोसळली.
जर आज दिव्या भारती जिवंत असती, तर नक्कीचं श्रीदेवी आणि माधुरी दीक्षित यांच्यासारख्या सुपरस्टार अभिनेत्रींच्या पंक्तीत तिचं नाव असतं, यात तीळमात्रही शंका नाही.
तुम्हाला आठवते का दिव्या भारती ? तिचा कोणता चित्रपट तुम्हाला आवडतो ? नक्कीचं कमेंट करुन सांगा आणि मनोरंजन विश्वाशी निगडित अशाचं नवीन नवीन बातम्यांसाठी आमचे इतर लेखही नक्कीच वाचा.
खूप खूप धन्यवाद !