Director Atlee Kumar : जवान चित्रपटाचा दिग्दर्शक ऍटली कुमारबद्दल या गोष्टी माहितीये का ?

Director Atlee Kumar

Director Atlee Kumar शाहरुख खानच्या जवान चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 500 कोटींचा गल्ला जमवला होता आणि याचं श्रेय जातं शाहरुख खानच्या स्टार पावरला.

परंतु जवान चित्रपट सुपरहिट होण्यामागे आणखी एका व्यक्तीची खूप मोठी मेहनत आहे आणि त्याचं नाव आहे या चित्रपटाचा लेखक दिग्दर्शक ऍटली कुमार. ऍटली कुमार तमिळ चित्रपटांचा यशस्वी दिग्दर्शक आहे. हा त्याचा पहिलाचं हिंदी चित्रपट होता आणि त्याने खूप भारी काम केलंय.

Director Atlee Kumar 

ॲटली कुमारचा (Director Atlee Kumar) जन्म तामिळनाडूतील मदुराईमध्ये 36 वर्षांपूर्वी झाला होता. त्याच्या जन्मानंतर संपूर्ण कुटुंब चेन्नईला शिफ्ट झालं आणि मग ऍटलीचं शालेय शिक्षण चेन्नईतच पूर्ण झालं. पुढे त्याने व्हिज्वल कम्युनिकेशन या विषयात डिग्री मिळवण्यासाठी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं.

अवघ्या 31 व्या वर्षी जग सोडून गेल्या होत्या अभिनेत्री स्मिता पाटील

यादरम्यान त्याला सिनेमाबद्दल आवड निर्माण झाली आणि कॉलेजमधील काही मित्रांच्या साथीने त्याने एक शॉर्ट फिल्म बनवली. ही शॉर्ट फिल्म इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर त्याला तमिळ चित्रपटांचा प्रसिद्ध दिग्दर्शक शंकरबरोबर असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करण्याची संधी मिळाली.

ऍटली कुमारची जीवनकहानी

ऍटली कुमारने (Director Atlee Kumar) शंकरबरोबर एनधिरण आणि ननबन या दोन चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. यादरम्यान त्याने चित्रपट निर्मितीतले सगळे बारकावे शिकून घेतले आणि मग 2014 मध्ये स्वतःचा पहिला चित्रपट राजा राणी बनवला. हा चित्रपट खूप चालला आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला.

त्यानंतर त्याची गट्टी तमिळ चित्रपटाचा प्रसिद्ध अभिनेता विजयबरोबर जमली आणि या दोघांनी एकानंतर एक असे 3 सुपरहिट चित्रपट दिले. थेरी, मर्सल आणि बिगील या चित्रपटांनी 200 कोटींपेक्षा जास्तची कमाई केली आणि ऍटली हा तमिळ सिनेमांचा नंबर 1 दिग्दर्शक बनला.

2018-19 च्या दरम्यान शाहरुख खानचे सर्व चित्रपट फ्लॉप होत होते. तेव्हा त्याने ऍटली कुमारशी (Director Atlee Kumar) संपर्क साधला आणि त्याच्यासाठी एक चित्रपट बनवण्याची विनंती केली. ऍटली कुमारने यासाठी होकार दिला आणि जवान चित्रपटाची पटकथा लिहिली. शाहरुखला सुद्धा ती आवडली आणि आता आपल्यासमोर जवान चित्रपट आला आहे आणि तो सर्वांनाच आवडतोय आणि बॉक्स ऑफिसवर नवीन नवीन रेकॉर्ड करतोय.

तर तुम्ही ऍटली कुमारचे कोणकोणते चित्रपट पाहिलेत ? नक्कीच कमेंट करुन सांगा आणि अशाच नवीन नवीन आणि इंटरेस्टिंग माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीच वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top