Dattak Mulga Marathi Story लक्ष्मण आणि त्याची बायको प्रिया घराची आवरासावर करत होते. सर्व सामान पॅक करून ठेवत होते. कारण त्यांनी एक नवीन मोठं घर घेतलं होतं. खूप मेहनतीनंतर आज हे यश लक्ष्मणला मिळालं होतं.
लक्ष्मणचे बाबा तो अवघा पाच वर्षांचा असताना हे जग सोडून गेले होते. त्यानंतर लक्ष्मण आणि त्याच्या आईने खूप मेहनत केली. लक्ष्मण शाळेत शिकत असतानाही काम करायचा. Dattak Mulga Marathi Story त्याने स्वतःच्या मेहनतीने शिक्षण पूर्ण केलं आणि आज तो एका मोठ्या कंपनीत, चांगल्या पदावर नोकरी करत होता. आज या भाड्याच्या घरातून ते स्वतःच्या मोठ्या थ्री बीएचके फ्लॅटमध्ये राहायला जाणार होते.
Dattak Mulga Marathi Story
लक्ष्मणची आई प्रतिभासुद्धा खूप खुश होती. आपल्या मुलाने करून दाखवलं. इतक्या अडीअडचणींचा सामना करून तो आज यशस्वी झाला, म्हणून तिच्याही डोळ्यात आनंदाश्रू आलेले असतात. Dattak Mulga Marathi Story या भाड्याच्या घरात जवळपास मागील 35 वर्षांपासून ती राहत होती. या घराशीही तिच्या खूप भावना जोडलेल्या असतात. हे घर सोडताना तिचा पाय जड होतो.
तेव्हा लक्ष्मण आणि प्रिया प्रतिभाला धीर देतात की, आयुष्यामध्ये बदल हे घडतचं असतात आणि आणि हे तिघे त्यांच्या नवीन घरात राहायला जातात. आपलं हे नवीन मोठं घर पाहून या तिघांनाही खूप आनंद होतो. Dattak Mulga Marathi Story तेवढ्यात लक्ष्मणच्या मोबाईलवर एक कॉल येतो. लक्ष्मण फोन उचलतो, तर त्याला समजतं की, प्रतिभाची मोठी बहीण त्याची मावशी खूप आजारी आहे. लक्ष्मण प्रतिभाला याबद्दल सांगतो. प्रतिभाला खूप काळजी वाटते आणि ती लगेच बहिणीच्या घरी जायला निघते.
प्रिया लक्ष्मणला म्हणते, “आता हे सगळं सामान आपल्या दोघांनाच मिळून लावायचंय.” सर्वात आधी ते हॉलमध्ये सामान लावतात आणि मग त्यांच्या बेडरूममध्ये. दुसऱ्या दिवशी लक्ष्मण ऑफिसला जातो. Dattak Mulga Marathi Story प्रिया घरी एकटीचं असते आणि ती प्रतिभाचं सगळ सामान तिच्या खोलीत लावत असते. तेवढ्यात प्रतिभाची एक जुनी सुटकेस उघडते आणि त्यामधून खूप सारी कागदपत्र बाहेर पडतात.
प्रिया सगळी कागदपत्र नीट ठेवू लागते. तर त्यात तिला एक लेटर म्हणजेच दत्तक घेतल्याचं कागदपत्र दिसतं. Dattak Mulga Marathi Story प्रिया हे डॉक्युमेंट वाचू लागते, तर तिला मोठा धक्का बसतो. तिचा यावर विश्वासचं बसत नाही. कारण या डॉक्युमेंटनुसार तिचा नवरा लक्ष्मण त्याच्या आई-बाबांचा मुलगा नसून, त्यांनी त्याला दत्तक घेतलेला असतो.
प्रियाचा विश्वासचं बसत नाही. तिला असं वाटतं की, आत्ताच्या आत्ता लक्ष्मणला फोन करून घरी बोलवावं, Dattak Mulga Marathi Story परंतु लक्ष्मणला धक्का बसेल, त्यामुळे तो घरी आल्याशिवाय त्याला काय सांगायचं नाही, असं ती ठरवते. संध्याकाळी लक्ष्मण घरी येतो. प्रिया शांत बसलेली असते. लक्ष्मण विचारतो, “काय झालं प्रिया, तू एवढी शांत शांत का आहेस ?”
प्रिया म्हणते, “काही नाही” परंतु तिच्या डोळ्यात पाणी येतं, ते पाहून लक्ष्मण खूप घाबरतो आणि विचारतो, “काय झालं, तू का रडतोस ?” प्रिया रडू लागते. तेव्हा लक्ष्मण तिला सावरतो. पाणी प्यायला देतो. Dattak Mulga Marathi Story प्रिया पाणी पिते आणि शांत होते. लक्ष्मण म्हणतो, “आता तरी सांग, नेमकं काय झालंय ?” प्रियाला खूप भीती वाटते. प्रियाची हिंमत होत नाही लक्ष्मणला काही सांगण्याची आणि ती दत्त घेतल्याचं डॉक्युमेंट त्याच्या हातात ठेवते. लक्ष्मण हे डॉक्युमेंट वाचतो आणि त्याला मोठा धक्का बसतो.
लक्ष्मण म्हणतो, “प्रिया हे काय आहे, यानुसार तर मी माझ्या आई बाबांचा मुलगा नाहीये. त्यांनी मला नाही जन्म दिला. मी अनाथ आहे. त्यांनी मला दत्तक घेतलंय.” प्रिया म्हणते, “लक्ष्मण मलाही त्याचमुळे मोठा धक्का बसला. Dattak Mulga Marathi Story माझाही अजून विश्वास बसत नाहीये. हे कसं सत्य असू शकतं. पण आज जेव्हा मी आईची बॅग त्यांच्या रूममध्ये ठेवत होते, तेव्हा त्या बॅगमधून मला हे डॉक्युमेंट सापडलं.”
लक्ष्मण म्हणतो, “मला तर काहीचं कळत नाहीये आणि जर हे खरं असेल, तर आई-बाबांनी खूप मोठी चुकी केली आहे. मला काही नाही सांगितलं. Dattak Mulga Marathi Story मला 30 वर्ष त्यांनी आंधारात ठेवलंय. ते माझे आईबाप नाहीये. मग माझे खरे आईबाप कोण आहेत ? कोठे आहेत ? हे सगळं मला जाणून घ्यायचंय. मी तिला आताच इथे बोलवून घेतो.”
प्रिया म्हणते, “थांब नको करू, त्या सध्या मावशीला पाहायला गेल्या आहेत ना. मावशीची तब्येत बरी नाहीये. त्या जेव्हा घरी परत येतील, तेव्हाच त्यांना विचार सगळं.” लक्ष्मण हा खूप चिडलेला असतो. Dattak Mulga Marathi Story त्याला हे सगळं सहनच होत नाही आणि तो म्हणतो, “ठीक आहे, आईला येथे नाही ना बोलवायचं, मग आपण तिथे जाऊया.” असं म्हणून तो लगेचच प्रियाला घेऊन मावशीच्या घरी जायला निघतो.
लक्ष्मण प्रियाला घेऊन मावशीच्या घरी पोहोचतो. तेव्हा त्यांना पाहून प्रतिभाला आश्चर्य वाटतं. ती विचारते, “तुम्ही दोघे येथे कसे ?” मावशीला भेटायला आलात का ?” Dattak Mulga Marathi Story लक्ष्मण म्हणतो, “आई मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे, चल बाहेर.” असं म्हणून तो प्रतिभाचा हात पकडतो आणि तिला बाहेर घेऊन येतो.
प्रतिभा विचारते, “काय झालं, एवढं महत्त्वाचं काय विचारायचं तुला ?” लक्ष्मण म्हणतो, “आज मला एक खूप मोठी गोष्ट समजली आहे. तू मला खरं खरं सांग, मी तुझा मुलगा आहे की नाही ? तू मला दत्तक घेतलंय ना ?” Dattak Mulga Marathi Story हे ऐकून प्रतिभाच्या पायाखालची जमीनचं सरकते. प्रतिभा म्हणते, “मला काही नाही माहीत, तुला कोणी सांगितलं ?”
लक्ष्मण खूप चिडतो आणि म्हणतो, “आई मला हे डॉक्युमेंट सापडलंय. यामध्ये सगळं लिहिलंय. यावर तुझी आणि बाबांची सही आहे. आता खोटं बोलून फायदा नाही. Dattak Mulga Marathi Story इतकी वर्ष तू माझ्याशी खोटं बोलत राहिली आणि आजही खोटं बोलतेय. खरं बोल आई खरं बोल.”
प्रतिभा हे डॉक्युमेंट हातात घेते आणि चक्क फाडून टाकते. हे पाहून लक्ष्मण आणि प्रियाला मोठा धक्का बसतो. Dattak Mulga Marathi Story प्रतिभा म्हणते, “खोट आहे सगळं, तू माझा मुलगा आहेस. आमचा मुलगा आहे.”
लक्ष्मणच्या डोळ्यात पाणी येतं आणि तो म्हणतो, “आई तुझा हा रागावलेला चेहरा, तुझा चढलेला आवाज, तू हे डॉक्युमेंट फाडून टाकलं, यावरून मला माझं उत्तर मिळालंय. हे डॉक्युमेंट खरं होतं. मी तुझा मुलगा नाहीये. Dattak Mulga Marathi Story तू माझ्याशी खोटं बोलतेस. खोटारडी आहेस तू.” हे ऐकून प्रतिभाला खूप वाईट वाटतं.
लक्ष्मण म्हणतो, “तू माझ्याशी खोटं बोलली. आजपासून तुझा आणि माझा कोणताही संबंध नाहीये. नाही तू माझी आई. पुन्हा कधीही माझ्या घरी येऊ नको. मला तुझा चेहरा पाहण्याची इच्छा नाही राहिली. Dattak Mulga Marathi Story तू माझा विश्वासघात केला आहेस.” असं म्हणून लक्ष्मण प्रियाचा हात पकडतो आणि तिथून निघून जातो. प्रिया त्याला शांत करण्याचा प्रयत्न करते. पण लक्ष्मण त्याचं काहीही ऐकून घेत नाही.
प्रतिभा पूर्णपणे कोलमडून गेलेली असते. लक्ष्मण असा बोलला, असं वागला, यामुळे ती खूप दुःखी होते आणि रडू लागते.
लक्ष्मण प्रियाला घेऊन घरी येतो. तो खूप चिडलेला असतो. प्रिया लक्ष्मणला म्हणते, “आईचं ऐकून घ्यायला पाहिजे होत.” लक्ष्मण म्हणतो, “काही नाही ऐकून घ्यायचं मला. सत्य आपल्यासमोर आलंय. Dattak Mulga Marathi Story त्या बाईने मला फसवलंय आणि आजनंतर तिचा विषय नाही काढायचा या घरात. मला नाही बोलायचं तिच्याबद्दल. तिचा आणि आपला संबंध संपला. तू काही बोलायचं नाही.” प्रियाला खूप वाईट वाटतं.
पुढील काही दिवस लक्ष्मण खूप दुःखी असतो. तर प्रतिभाची तब्येत खूप बिघडते. प्रियाला हे सगळं समजतं. प्रिया ठरवते की, सत्य शोधून काढायला हवं. Dattak Mulga Marathi Story या आई मुलाच्या नात्यातील दुरावा संपवायला हवा आणि ती लक्ष्मणला एक दिवस म्हणते की, मला माझ्या माहेरी जायचंय. लक्ष्मण हो म्हणतो. परंतु प्रिया माहेरी जाण्याऐवजी प्रतिभाकडे, मावशीकडे येते.
प्रतिभा मंदिरात गेलेली असते. मावशी घरी असते. प्रिया मावशीला म्हणते, “बरं झालं मावशी, आई घरी नाहीयेत. त्या मला कधीही सत्य सांगणार नाही. तुम्हीच आता मला सत्य सांगा की, नेमकं काय झालं होतं ?” Dattak Mulga Marathi Story मावशी म्हणते, “ठीक आहे, सांगते मी तुला सगळं. लक्ष्मण आणि प्रतिभामध्ये आलेला दुरावा मलाही सहन होत नाहीये. प्रतिभाची तब्येती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. त्यासाठी मला सत्य सांगणं भागच आहे.”
मावशी सगळं सांगणार आहे, हे पाहून प्रिया लगेचं लक्ष्मणला फोन लावते. परंतु याबद्दल ती मावशीला काही सांगत नाही. लक्ष्मण फोन उचलतो, तेव्हा मावशी सांगू लागते. Dattak Mulga Marathi Story “प्रिया हे खर आहे की, प्रतिभा आणि लक्ष्मणच्या बाबांनी लक्ष्मणला दत्त घेतलंय. लक्ष्मण यांचा सख्खा मुलगा, त्यांचा पोटचा मुलगा नाहीये.
परंतु यापेक्ष सुद्धा मोठ सत्य आहे आणि ते म्हणजे जेव्हा प्रतिभा आणि लक्ष्मणच्या बाबाच्या लग्नाला फक्त सहा महिने झाले होते. तेव्हा हे दोघे एक दिवस बाहेर फिरायला गेले होते. रात्री उशिरा घरी परतत असताना त्यांना मंदिराच्या पायऱ्यावर एक लहान बाळ रडताना दिसलं. या लहान बाळाच्या आजूबाजूला खूप कुत्री भुंकत होती. या लहान बाळाचा जीव धोक्यात होता, पण प्रतिभा आणि लक्ष्मणने या बाळाला पाहिलं आणि त्यांनी या बाळाला उचललं.
लक्ष्मणच्या बाबांनी या मुलाबद्दल पोलिसांनाही सांगितलं. पोलिसांनी त्याच्या आई बाबांना शोधण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु त्यांना त्याचे आई बाबा कुठेही सापडले नाही. जवळपास पंधरा दिवस हे बाळ प्रतिभा आणि लक्ष्मणच्या बाबांजवळचं होतं आणि त्याच वेळेस प्रतिभाला दिवस गेलेत, हे समजलं. Dattak Mulga Marathi Story प्रतिभा आई होणार होती, परंतु जर आपल्याला या अनाथ मुलाला सांभाळावा लागलं आणि स्वतःचं बाळही झालं, तर त्यांच्यामध्ये नक्कीच आपण भेदभाव करू. आपण ह्या मुलाला अनाथाची वागणूक नाही द्यायला पाहिजे, असा विचार करून प्रतिभा आणि लक्ष्मणच्या बाबांनी एक मोठा निर्णय घेतला. त्यांनी स्वतःच्या बाळाला जन्म न देण्याचा निर्णय घेतला आणि आयुष्यभर मंदिराबाहेर भेटलेले अनाथ मुलाला आपला मुलगा म्हणून सांभाळायचं ठरवलं.
प्रिया हा अनाथ मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून तुझा नवरा लक्ष्मण आहे. लक्ष्मण तो अनाथ मुलगा आहे, ज्याच्यासाठी प्रतिभा आणि लक्ष्मणच्या बाबांनी स्वतःच्या पोटच्या मुलाचा बळी दिला. Dattak Mulga Marathi Story स्वतःला कधी बाळ होऊ दिलं नाही.” हे सगळे ऐकून प्रियाच्या पायाखालची जमीनचं सरकते. तर तिकडे फोनवर सगळं ऐकत असलेल्या लक्ष्मणला जबर धक्का बसतो आणि तो रडू लागतो.
लक्ष्मणाला त्याची चूक समजते की, ज्या आईला तो इतका वाईट साईट बोलला. तू मला फसवलं असं म्हणाला, त्या आईने आपल्यासाठी काय केलंय. किती मोठा त्याग केला आहे. खरंच ती किती चांगली आहे, हे त्याला समजतं आणि तो ढसाढसा रडू लागतो. लक्ष्मण लगेच मावशीच्या घराकडे यायला निघतो.
इकडे प्रतिभा घरी येते. तेव्हा प्रतिभाला पाहून प्रिया रडू लागते आणि तिला घट्ट मिठी मारते. प्रतिभाला समजतं की, मावशीने तिला सगळं सत्य सांगितलंय. Dattak Mulga Marathi Story प्रतिभा प्रियाला शांत करते. तेवढ्यात लक्ष्मण तेथे येतो आणि तो प्रतिभाच्या पायावर डोकं ठेवतो आणि म्हणतो, “आई मला माफ कर. माझं खूप चुकलं. मी तुला खूप वाईट साईट बोललो.
पण मला आता सगळं सत्य समजलंय. तू जरी मला दत्तक घेतलं असलं, तुझ्या पोटी माझा जन्म झालेला नसला, तरी सुद्धा तुझ्यासारखी आई मला कधी भेटू शकली नसती. तू माझ्यासाठी या अनाथासाठी किती मोठा त्याग केलास. तुझ्यासारखी आई मला कधी भेटली नसती, महान आहेस तू आई महान.”
लक्ष्मणने पुन्हा एकदा आपल्याला आई म्हणून हाक मारली, म्हणून प्रतिभालाही खूप आनंद होतो आणि ती लक्ष्मणला घट्ट मिठी मारते आणि हे दोघेही रडू लागतात. Dattak Mulga Marathi Story लक्ष्मण प्रतिभाला म्हणतो, “आई ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. पण यानंतर मी तुला परत कधीही दुखावणार नाही. चल आमच्याबरोबर.”
लक्ष्मण आणि प्रिया प्रतिभाला घेऊन त्यांच्या घरी पोहोचतात. त्यानंतर लक्ष्मण प्रतिभाची खूप काळजी घेतो. त्यांचं घर खूप आनंदी आणि सुखी राहतं.
तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, आवडली का आजची गोष्ट. नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन कथांसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !