Dal Batti Recipe In Marathi
Dal Batti Recipe In Marathi आपण घरी रोजचीच भाजी पोळी खाऊन अतिशय कंटाळून जातो त्यामुळे आपल्याला नेहमी काहीतरी चटपटीत खावंसं वाटतं. बाहेरचं फास्टफूड खाण्यापेक्षा घरीच काहीतरी स्वादिष्ट बनवून खाणं हे नेहमीच उत्तम असतं.
मग घरातच चटपटीत, स्वादिष्ट आणि आरोग्यासाठी उपयोगी खायला बनवणं कधीही चांगलंच.
डाळ बट्टी ही डिश मुख्यतः राजस्थानमध्ये खूपच आवडीने बनवली आणि खाल्ली जाते. यासोबतच आपल्या महाराष्ट्रातदेखील खानदेश आणि विदर्भ भागात डाळ बट्टी बनवली जाते आणि सर्व लोक खूप आवडीने खातात. पण ही डाळ बट्टी राजस्थानी दाल बाटीपेक्षा खूप वेगळी असते. राजस्थानात डाळ बट्टीला दाल बाटी असं म्हटलं जातं. महाराष्ट्रातील डाळ बट्टी आणि राजस्थानातील दाल बाटी यांमध्ये खूप मोठा फरक आहे. परंतु हा फरक नेमका आहे तरी काय, हे तर राजस्थानात गेल्यावर दाल बाटी टेस्ट केल्यावरच समजेल. आप मात्र आपण आपल्या महाराष्ट्रात डाळ बट्टी कशी बनवली जाते याबद्दलचं जाणून घेणार आहोत.
आजकाल आपल्याकडे अनेक ठिकाणी सणावाराला आणि पाहुणेमंडळी घरी आल्यानंतर घराघरात हमखास Dal Batti Recipe In Marathi डाळ बट्टी बनवली जाते आणि सर्वजण खूप आवडीने खातात.
त्यामुळे मैत्रिणींनो आज आपण घरच्याघरी डाळ बट्टी रेसिपी कशी बनवायची ते शिकणार आहोत.
घरच्याघरी डाळ बट्टी बनवणं खूपच सोपं असतं आणि बाहेरच्यापेक्षा खूपच टेस्टी आणि हेल्दी डाळ बट्टी घरी बनवता येते.
डाळ बट्टी रेसिपी बनवण्यासाठी लागणारं साहित्य :
४ ते ५ जणांसाठी Dal Batti Recipe In Marathi बनवण्यासाठी पुढीलप्रमाणे साहित्य लागेल.
डाळ बनवण्यासाठी लागणारं साहित्य :
- 1 वाटी तूरडाळ
- 2 चमचे मुगडाळ
- वाळलेल्या 4 – 5 मिरच्या
- आले लसणाची पेस्ट
- 1 चमचा लाल तिखट
- 2 चमचा कांदा लसूण मसाला
- अर्धा चमचा धने पावडर
- बारीक चिरलेला कांदा
- 2 टोमॅटो
बट्टी बनवण्यासाठी लागणारं साहित्य
- अर्धा किलो गहू
- 1 वाटी हरभरा डाळ
- 1 वाटी मका
- अर्धा वाटी तांदूळ
- दही
- सोडा
- मीठ
- साजूक तूप
डाळ बट्टी बनवण्याची कृती खालीलप्रमाणे आहे
डाळ बट्टी या नावातच दोन वेगवेळगे पदार्थ आहेत, पहिलं आहे डाळ आणि दुसरी आहे बट्टी. त्यामुळे हे दोन पदार्थ वेगवेगळे बनवावे लागतात. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही आधी डाळ किंवा बट्टी बनवू शकतात. आपण येथे एकेककरून डाळ कशी बनवायची आणि बट्टी कशी बनवायची हे पाहूया.
डाळ बनवण्याची कृती :
1. डाळ बट्टीमध्ये सर्वात महत्वाची असते ती डाळ. डाळ बनवण्यासाठी एक पॅन घ्यायचा आहे. आता या पॅनमध्ये दोन ते तीन पळ्या तेल टाकायचंय.
2. तेल टाकल्यानंतर त्यात जिरे आणि मोहरी टाकायचीय. त्यानंतर कांदा बारीक चिरून टाकायचा आणि हा कांदा छान लालसर परतून घ्यायचाय.
3. त्यानंतर आले लसूणची पेस्ट टाकायचीय. मग बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आणि टोमॅटो मस्तपैकी फ्राय करून घ्यायचा.
Pavbhaji Recipe In Marathi | पावभाजी रेसिपी इन मराठी
4. आता या मिश्रणात मसाले टाकायचेत. कांदा लसूण मसाला, लाल तिखट, थोडीशी हळद आणि हिंग टाकायचा. तुमच्याकडे तेजपत्ता असेल तर तुम्ही तेलामध्ये टाकू शकता छान फ्राय करून घ्यायचं आणि थोडासा सांबर मसालासुद्धा टाकायचा.
5. Dal Batti Recipe In Marathi गरम मसाला, कांदा लसूण मसाला आणि लाल तिखट हे तीन मसाले दोन दोन चमचे आपल्याला मिश्रणात टाकायचे. अर्धा चमचा धनिया पावडर टाकायची आणि मस्तपैकी फ्राय करून घ्यायची.
6. तुमच्याकडे जर गरम मसाला असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता त्यामुळे खूप छान टेस्ट येते. आता कांदा टोमॅटो आणि लाल मिरच्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं.
7. आता या मिश्रणाला तेल सुटते. तेल सुटल्यानंतर डाळ हातून घ्यायची हाटल्यानंतर तेल सुटलेल्या मिश्रणात शिजलेली डाळ टाकायची आहे.
8. त्यानंतर चमच्याने हलवून घ्यायचं आणि गरम पाणी त्या डाळीत टाकायचं.
9. भिजलेल्या चिंचेचं पाणी आणि किसलेला गूळ त्यात टाकायचा. त्याला छान उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यावर आपली आंबट गोड डाळ आता तयार आहे. यावर तुम्ही थोडीशी कोथिंबीरही टाकू शकता.
बट्टी बनवण्याची कृती
1. गहू, हरभऱ्याची डाळ, तांदूळ, मका हे सगळं एकत्र केलेलं मिश्रण गिरणीतून दळून आणायचं. दळून आणल्यानंतर एक ताट घ्यायचं. एका ताटात ते सगळं पीठ घ्यायचं. त्या पिठात 2 चमचे जिरे, 2 चमचे ओवा, अर्धा वाटी दही, अर्धा वाटी गरम केलेलं तेल, चवीनुसार मीठ त्या पिठात टाकायचं.
2. मग ते पीठ चांगलं मिक्स करून घ्यायच. एका पातेल्यात पाणी घ्यायचं आणि या मिश्रणाची घट्ट अशी कणिक मळायची. कणिक मळल्यानंतर त्याचे गोल गोल गोळे तयार करायचे. सगळ्या पिठाचे गोळे तयार करून घ्यायचे.
3. Dal Batti Recipe In Marathi गोळे तयार झाल्यानंतर एका मोठ्या पातेल्यात पाणी घ्यायचं. हे पाणी गॅसवर चांगलं गरम होऊ द्यायचं. पाणी गरम झाल्यानंतर आपण जे कणकेचे गोळे तयार केले होते ते त्या पाण्यात टाकायचे. त्याला 10 ते 20 मिनिटे शिजू द्यायचं. शिजल्यानंतर 20 मिनिटांनी हे गोळे पाण्यातून काढून घ्यायचे.
4. ते गोळे थंड होऊ द्यायचे. थंड झाल्यावर त्याचे मोठे तुकडे करायचे. तुकडे केल्यानंतर एका कढईत तेल टाकायचे. कडक तेल तापल्यानंतर जे आपण बट्टीचे तुकडे केले होते. ते लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे. या तळलेल्या बट्ट्या एका ताटात काढून घ्यायच्या. मग आपल्या बट्ट्या तयार आहेत.
5. अशाप्रकारे आपली एकदम टेस्टी डाळ आणि बट्टी दोन्हीसुद्धा तयार आहेत. आता एका ताटात बट्ट्या छान बारीक चुरून घ्यायच्या आहेत आणि त्यावर डाळ टाकायची आहे. यावर तुम्ही आवडीप्रमाणे साजूक तूपसुद्धा घेऊ शकता. साजूक तुपामुळे या पदार्थाची चव आणखीनच जास्त वाढते.
ही तयार केलेली Dal Batti Recipe In Marathi डाळ बट्टीची प्लेट तुम्ही कांदा, लिंबूसोबत सर्व्ह करू शकता. मस्त कांदा आणि लिंबूमुळे डाळ बट्टी खाण्याची मजा आणखी येते. घरी बनवलेली ही डाळ बट्टी नक्कीच सर्वांना आवडेल.
Dal Batti Recipe In Marathi Important Tips | डाळ बट्टी महत्वाच्या टिप्स
1. डाळ बट्टी हा आपल्या महाराष्ट्रातील खूपच झणझणीत आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थ आहे. बट्ट्या चुरून त्यावर डाळ टाकून हे खाल्लं जातं. साजूक तुपाचा वापर केला तर टेस्ट आणखी वाढते.
2. डाळ बट्टी खाताना हिरव्या मिरच्यांचा झणझणीत ठेचा हा पाहिजेच म्हणजे जेवणाची टेस्ट खूप वाढते.
3. डाळ बट्टी बनवताना बट्ट्या जर चुलीवर बनवलेल्या असतील तर त्या अजून जास्त स्वादिष्ट आणि रुचकर बनतात.
4. आंबट गोड वरण असेल तर बट्ट्यासोबत जास्त टेस्टी लागते.
Dal Batti Recipe In Marathi FAQ’s डाळ बट्टी रेसिपीबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न
1. Dal Batti Recipe In Marathi डाळ बट्टी हा कुठला प्रसिद्ध खाद्यपदार्थ आहे ?
मूळतः दाल बाटी हा राजस्थानचा अत्यंत प्रसिद्ध खाद्यपदार्थ आहे. यासोबतच मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तरप्रदेश या राज्यांमधेही हा पदार्थ खाल्ला जातो. आपल्या महाराष्ट्रात विशेषतः खानदेश आणि विदर्भ या भागात डाळ बट्टी खूप लोक खाणं पसंत करतात. खानदेशची डाळ बट्टी आपल्याकडे प्रसिद्धदेखील आहे. ही राजस्थानी दाल बाटीपेक्षा खूपच वेगळी असते.
2. आपल्या महाराष्ट्रात डाळ बट्टी कुठे कुठे खाल्ली जाते ?
सध्या महाराष्ट्रात सगळीकडेच डाळ बट्टी खूप आवडीने खाल्ली जाते. सर्वांनाच डाळ बट्टी प्रचंड आवडते. पण खासकरून धुळे, जळगाव, नंदुरबार या खानदेश भागात आणि विदर्भात डाळ बट्टी बनवली जाते आणि तिथे खूप प्रसिद्धदेखील आहे. आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणची अशी वेगवेगळी खाद्यसंस्कृती आहे आणि तिथले वेगवेगळे खाद्यपदार्थदेखील आहेत.
3. आपल्याकडे डाळ बट्टी एवढी लोकप्रिय का आहे ?
Dal Batti Recipe In Marathi ही खूपच रुचकर आणि आरोग्यास उपयुक्त असते. घरगुती जेवण असल्यामुळे डाळ बट्टीला सर्वांची खूप पसंती मिळते.
4. डाळ बट्टी खाल्ल्यामुळे खरंच वजन वाढते का ?
हो डाळ बट्टी खाल्ल्यामुळे वजन वाढते पण तुम्ही योग्य प्रमाणात डाळ बट्टीचा आस्वाद घेऊ शकता. डाळ बट्टी खूपच रुचकर आणि स्वादिष्ट असते.
5. आरोग्यासाठी डाळ बट्टी खरंच उपयुक्त आहे का ?
डाळ बट्टी ही आरोग्यासाठी उपयुक्त आहे कारण या पदार्थामध्ये अनेक प्रकारच्या डाळी वापरल्या जातात. तूरडाळ, मुगडाळ, हरभराडाळ, गहू, तांदूळ असे अनेक पदार्थ डाळ बट्टीमध्ये असतात. घरगुती पद्धतीने बनवलेली डाळ बट्टी आरोग्यासाठी खूप चांगली असते.
Dal Batti Recipe In Marathi ही बाहेरसुद्धा अनेक ठिकाणी मिळते पण ती स्वच्छतेच्या बाबतीत एवढी काही चांगली नसते पण याउलट घरी बनलेली डाळ बट्टी ही स्वच्छ, टेस्टी आणि आपल्या बजेटमध्येही बसणारी असते. यामध्ये टाकले जाणारे मसाले, भाज्या आणि सर्व साहित्य हे उत्तम दर्जाचं असतं त्यामुळे घरी बनलेली डाळ बट्टी नेहमी उत्तमच असते.
डाळ बट्टी खायला तर सगळ्यांनाच आवडते पण जर कोणी पहिल्यांदा खाल्ली असेल तर तोसुद्धा Dal Batti Recipe In Marathi डाळ बट्टीचा फॅन होऊन जातो हे मात्र नक्की. बाहेर अनेक ठिकाणी खानदेश स्पेशल डाळ बट्टीसुद्धा मिळते. पण घरी बनवलेली डाळ बट्टीच सर्वांनाच आवडते.
तुम्हीसुद्धा ही Dal Batti Recipe In Marathi डाळ बट्टी आपल्या घरी नक्की बनवून पहा. सगळ्यांना ही रेसिपी नक्कीच आवडेल आणि घरचे तुमचं खूप कौतुकसुद्धा नक्की करतील हे मात्र खरं.
अशाच आणखी नवनवीन टेस्टी आणि हेल्दी रेसिपी जाणून घेण्यासाठी आम्हाला नक्की फॉलो करा.
तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.