Comedy Marathi Ukhane 2024 : लग्नसराईसाठी दहा स्पेशल कॉमेडी उखाणे

Comedy Marathi Ukhane 2024

Comedy Marathi Ukhane 2024 उन्हाळ्यात जसं जसं तापमान वाढतंय, तशीचं लग्नसराईसुद्धा सुरू झाली आहे. अनेकांची लग्न होणार आहेत आणि लग्नात नवरी बाईंनी कोणता उखाणा घ्यायचा, याबद्दल सगळे चर्चा करताना दिसतात. नव्या नवरींना तर उखाण्याचं खूप टेन्शन असतं.

परंतु जर तुम्हाला असा एखादा उखाणा घ्यायचा असेल की, सगळे खळखळून हसतील. तर आज आम्ही तुमच्यासाठी 10 खूपचं विनोदी उखाणे Comedy Marathi Ukhane 2024 घेऊन आलो आहोत, तर चला पाहूयात.

Comedy Marathi Ukhane 2024

गोठ्यात गोठा, गोठ्यात जरशा,
मी आर्ची आणि —– राव माझे परश्या

—- राव माझे डायमंड, मी त्यांची रिंग
आयपीएलची शान म्हणजे चेन्नई सुपर किंग

साखरेचं पोतं, सुईने उसवलं
—- रावांनी मला पावडर लावून फसवलं

बघते यांच्याकडे आवडतो मला यांचा फ्रेंच कट,
—- रावांजवळ कोणती पण पोरगी येते, तर मी तिला म्हणते चल हट

वर्क फ्रॉम होमच्या काळात चेक ईन चेक आऊटचा आलाय नुसता कंटाळा,
—- रावांचे नाव घेते आमच्या जोडीचा अंदाजचं आहे निराळा

नवीन लग्न झालेल्या मुलींसाठी 11 स्पेशल उखाणे

सुंदर सुंदर हरणाचे नाजूक नाजूक पाय,
आमचे —– राव दिसत नाही पिऊन पडले की काय

गुलाब जामुन बनवण्यासाठी लागतो पावशेर खवा,
—- रावांचे नाव घेते सूनमुख म्हणून हातावर हजार रुपये ठेवा

चांदीच्या ताटात जिलेबीचे तुकडे,
—- रावांच नाव घेते, मेल्या थोबाड कर इकडे

आजकाल उन्हाळ्यात पडतंय खूप ऊन,
—- रावांचे नाव घेते —– घराण्याची सून

जमले सगळे —– च्या दारात,
—– रावांचे नाव घेते, येऊ द्या ना मला घरात

तुम्हाला यापैकी कोणता उखाणा सर्वात जास्त आवडला आणि तो तुम्ही शेअर करणार आहात नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाचं नवीन नवीन उखाण्यासाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top