प्रसिद्ध अभिनेत्री सुनावले खडे बोल. कॉमेडियन म्हटलं की, पुरुष कलाकारचं जास्त दिसून येतात. परंतु अशा काही महिला कलाकारही आहेत, ज्यांनी कॉमेडियन म्हणून आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलंय. मराठीमध्ये श्रेया बुगडे आणि हिंदीमध्ये भारती सिंग यांनी कॉमेडी क्षेत्रात मोठं नाव कमावलंय.
सध्या भारती सिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल होतोय. जेथे ती ट्रोलर्सला चांगलं सुनावतेय. Youtube वर एका vlog चैनलच्या माध्यमातून भारती चांगलीच ऍक्टिव्ह असते आणि युट्युबवरचं तिने हा व्हिडिओ शेअर केला आहे.
प्रसिद्ध अभिनेत्री सुनावले खडे बोल
या व्हिडिओत तिने ट्रोलर्सला सुनावत म्हटलंय की, जेव्हा मी एखादा चांगला ड्रेस घालते, छान तयार होते आणि सोशल मीडियावर फोटो पोस्ट करते, तेव्हा मला क्युट पांडा, गेंडी असं म्हणून सुनावलं जात. परंतु या ट्रॉलर्सला काय हक्क आहे मला असं म्हणण्याचा ? मला त्याचा काडीचाही फरक पडत नाही. दुसऱ्याच्या दिसण्यावरून असं बोलणं चुकीचं आहे.
जे लोक मला असं बोलतात, मी त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त कमावते. मी जास्त फिरते. हे लोक साधं लोखंडवालापर्यंत सुद्धा जाऊ शकत नाही आणि दुसऱ्याच्या दिसण्यावरून त्यांची किंमत करतात. त्यांची तुलना करतात. हे अतिशय चुकीचं आहे. अशा लायकी नसणाऱ्या लोकांबद्दल बोलून फायदा नाही, असंही तिने म्हटलंय.
भारती सिंग हे कॉमेडी विश्वातील एक मोठं नाव आहे. तिने द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या कार्यक्रमातून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर कॉमेडी सर्कस आणि द कपिल शर्मा शो यांसारख्या कार्यक्रमातून तिने मोठी प्रसिद्धी मिळवली. हिंदी चित्रपटांमध्येसुद्धा ती झळकली.
काही वर्षांपूर्वी तिने लेखक हर्ष लिंबाचीया याच्याशी लग्न केलं होतं. त्यानंतर दोघांना गोलू नावाचा एक मुलगाही झाला. सध्या ते युट्युबवर जास्त ऍक्टिव्ह असतात. एका पॉडकास्ट चॅनल बरोबरचं त्यांचं एक vlog चैनलही आहे आणि तेथे त्यांचे अनेक मिलियन सबस्क्राईबर आहेत.
भारती सिंग सोशल मीडियावरही चांगलीचं लोकप्रिय आहे आणि तिचे इंस्टाग्रामवर मिलियन्स मध्ये फॉलोवर्स आहेत आणि तिच्या या पोस्टनंतर सगळेचं तिचं समर्थन करताय.
तर तुम्हाला काय वाटते याबद्दल ? नक्कीचं कमेंट करुन सांगा आणि मनोरंजन विश्वाशी निगडित अशाच नवीन नवीन बातम्यांसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !