Colors Marathi New Serial Abir Gulal : कलर्स मराठी वाहिनीवर आणखी एक नवीन मालिका सुरू होणार

Colors Marathi New Serial Abir Gulal

Colors Marathi New Serial Abir Gulal आजकाल टीव्ही हेच आपल्या मनोरंजनाचं प्रमुख माध्यम आहे आणि टीव्हीवरील मालिका या तर सर्वांच्याच आवडत्या असतात. इतक्या साऱ्या चॅनेल्सवर अनेक मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत. या मालिकांमध्ये प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यासाठी नेहमीच चुरस सुरू असते. प्रत्येक टीव्ही चॅनल टीआरपीमध्ये पुढे राहण्यासाठी आपल्या मालिकांमध्ये नवीन नवीन ट्विस्ट आणत असतात. यासोबतच नवनवीन मालिकासुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला आणत असतात.

सध्या वेगवेगळे टीव्ही चॅनल्स अनेक नवीन मालिकांची घोषणा करत आहेत. याच स्पर्धेमध्ये कलर्स मराठी वाहिनीने एक नवीन जबरदस्त मालिकेची घोषणा केली आहे. मागील वर्षाच्या शेवटी लोकप्रिय मराठी दिग्दर्शक केदार शिंदेंनी कलर्स मराठी चॅनलचे ‘प्रोग्रामिंग हेड’ म्हणून जवाबदारी स्वीकारली. त्यानंतर त्यांनी अनेक नवीन मालिका सुरू केल्या आहेत.

Colors Marathi New Serial Abir Gulal

मागच्या महिन्यात ‘इंद्रायणी’ ही नवीन मालिका सुरू करण्यात आली. नुकतीच अभिनेत्री स्पृहा जोशी आणि अभिनेता सागर देशमुखच्या प्रमुख भूमिका असलेली ‘सुख कळले‘ ही मालिका सुरू झाली. यासोबतच डॉ निलेश साबळे, भाऊ कदम आणि ओंकार भोजने यांचा ‘हसताय ना ? हसायलाच पाहिजे!’ हा नवीन कॉमेडी शो 27 एप्रिलपासून चॅनलवर सुरू होणार आहे.

पियुष रानडेने बायकोला दिल्या शुभेच्छा

यातच आता कलर्स मराठीवर आणखी एक नवीन मालिका Colors Marathi New Serial Abir Gulal सुरू होणार आहे. ‘अबीर गुलाल’ हे नवीन मालिकेचं नाव असणार आहे. नवीन मालिकेचा पहिला प्रोमो नुकताच कलर्स मराठीच्या इंस्टाग्रामवर दाखवण्यात आला. या प्रोमोसोबतच ‘दोन अनोळखी मुलींचं नशीब बदलणारी ती रात्र’ असं वाक्य लिहण्यात आलंय म्हणजे यावरच मालिकेची कथा आधारित असणार आहे.

कलर्स मराठीवर नवीन मालिका ‘अबीर गुलाल’

प्रोमोमध्ये दोन तान्ही बाळं पाळण्यात ठेवलेली दाखवण्यात आलीत. या बाळांच्या पाळण्यावरून आणि पांघरण्यात आलेल्या कपड्यावरून गरिबी श्रीमंतीचा भेदही दिसतो.
त्या दोन्ही बाळांची दोन बायका अदलाबदली करतात.

या दोन्ही बाळांना कोणी आणि का बदललं असेल हाच प्रश्न सर्वांना पडतो. नवीन मालिकेत कोणकोणते कलाकार असणार हे अजून समोर आलेलं नाही. यासोबतच ही मालिका कधी आणि कोणत्या वेळेत सुरू होणार याबद्दल माहिती मिळालेली नाही. पुढील काही दिवसांमध्ये सर्व गोष्टींची घोषणा केली जाईल. पण प्रोमो Colors Marathi New Serial Abir Gulal पाहिल्यापासून प्रेक्षकांची उत्सुकता खूप वाढली आहे.

मनोरंजनविश्वातील अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा.

तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद.  

Scroll to Top