CNG Two Wheeler : इलेक्ट्रिक टू व्हीलर विसरा, ही कंपनी आणतेय CNG मोटारसायकल

CNG Two Wheeler

CNG Two Wheeler आपल्या देशात सध्या ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये क्रांतिकारक बदल होत आहेत. पेट्रोल आणि डिझेल गाड्यांची जागा आता इलेक्ट्रिक आणि सीएनजी गाड्या घेत आहेत. इलेक्ट्रिक गाड्या तर ऑटोमोबाईल सेक्टरचं फ्युचर असतील, असं म्हटलं जातंय.

परंतु चार चाकी गाड्यांबद्दल जेवढं काही नवीन घडताना दिसतंय, तेवढे दोन चाकी गाड्यांबद्दल घडताना दिसत नाहीये. पेट्रोल ऐवजी आता लोक इलेक्ट्रिक दुचाकी वापरायला लागले आहेत. परंतु त्यातही अनेक कमतरता आहे. कोणतीही इलेक्ट्रिक दुचाकी खऱ्या आयुष्यात 70 किंवा 80 किलोमीटरपेक्षा जास्त रेंज देत नाही. त्यामुळे लांबच्या प्रवासासाठी लोक पेट्रोल गाड्याचं वापरतात.

CNG Two Wheeler

परंतु आता भारतातील खूप मोठी दुचाकी वाहन कंपनी बजाज मोटर्स दुचाकी वाहन क्षेत्रात एक क्रांतिकारक बदल घडून आणणार आहे. या वर्षात बजाज चक्क सीएनजीवर CNG Two Wheeler चालणारी दुचाकी लॉन्च करणार आहे.

म्हणजेच ही दुचाकी हायब्रीड मॉडेलवर चालेल. ती तुम्ही पेट्रोलवर सुद्धा चालवू शकतात. त्याचबरोबर सीएनजीवर सुद्धा चालवू शकतात. जसं की सध्या बाजारात असलेल्या अनेक चार चाकी गाड्या चालतात. तुम्हाला हवं असेल तेव्हा तुम्ही पेट्रोल किंवा सीएनजीवर शिफ्ट करू शकतात.

प्रार्थना बेहेरे गोवा व्हॅकेशन फोटोज पाहिले का ?

बजाजच्या या नवीन मोटरसायकलमध्ये बाकी दुचाकींप्रमाणे जशी पेट्रोलची टाकी असते, तशीच पेट्रोलची टाकी असेल. परंतु सीट खाली एक सीएनजीसाठी टाकी दिलेली असेल. तुम्ही एका बटनाद्वारे सीएनजी किंवा पेट्रोल असं ट्रान्सफॉर्मेशन करू शकता आणि गाडी चालवू शकता.

तसंही बजाजच्या मोटरसायकल सर्वाधिक मायलेज देतात, हे आपल्या सर्वांना माहितीये. बजाज प्लेटिना आणि बजाज डिस्कवर या सर्वाधिक मायलेज देणाऱ्या गाड्या म्हणून ओळखल्या जातात आणि आता बजाजची ही सीएनजीवर CNG Two Wheeler चालणारी गाडी तर खूपचं जास्त मायलेज देईल यात शंका नाही.

बजाज मोटर्स आणतेय CNG मोटरसायकल

असं म्हटलं जात आहे की, एक लिटर सीएनजीमध्ये बजाजची ही मोटरसायकल कमीत कमी 120 km पर्यंतचं मायलेज देईल आणि जर खरंच असं होत असेल तर ही गाडी नक्की दुचाकी वाहन क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणेल आणि इतर दुचाकी कंपन्या सुद्धा सीएनजी मोटरसायकल बाजारात आणतील, यात शंका नाही.

परंतु या सीएनजी CNG Two Wheeler मोटरसायकलसमोर सर्वात मोठा प्रश्न असेल सीएनजी पंपवर असलेल्या चार चाकी वाहनांच्या लांबच लांब रांगा. आधीचं सीएनजी चारचाकी वाहनांचे मालक या लांब रांगांमुळे कंटाळलेले आहेत आणि त्यातचं जर दुचाकीची रांग सुद्धा लागली, तर सीएनजी गाडीवाल्यांना भगवानचं मालक असेल, हे मात्र नक्की.

तर तुम्हाला काय वाटतं अशा सीएनजी दुचाकी वाहनांची गरज आहे का ? नक्कीचं कमेंट करुन सांगा आणि अशाच नवीन नवीन आणि इंटरेस्टिंग बातम्यांसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top