Cheapest Laptop For Students लॉकडाऊननंतर संपूर्ण देशात जसं वर्क फॉर्म सुरु झालं, तसं एज्युकेशन फ्रॉम होम सुद्धा सुरू झालं. म्हणजेचं शाळा आणि कॉलेजचे विद्यार्थी घरबसल्यास ऑनलाईन क्लासेस अटेंड करू शकतात. त्यांना इतर कुठेही जायची गरज नाही. त्याचबरोबर इतर लोकांनाही एखादी गोष्ट शिकायची असेल तर तसेही ऑनलाईन कोर्सेस उपलब्ध आहेत.
परंतु ऑनलाईन क्लासेस अटेंड करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते, ती म्हणजे लॅपटॉप. मोबाईल फोनपेक्षा लॅपटॉपची स्क्रीन मोठी असते. त्याचबरोबर नोट्स घेण्यासाठी कीपॅड असतो, विविध अप्लिकेशन्स असतात. त्यामुळे अनेक विद्यार्थी ऑनलाईन क्लासेससाठी मोबाईल पेक्षा लॅपटॉपला प्राधान्य देतात.
Cheapest Laptop For Students
परंतु मार्केटमध्ये लॅपटॉप खूप महाग भेटतात. अनेक कुटुंबांची गरीब परिस्थितीमुळे लॅपटॉप घेण्याची ऐपत नसते. म्हणूनचं आज आम्ही तुमच्यासाठी एक खूप स्वस्त आणि चांगले फीचर्स असलेला लॅपटॉप घेऊन आलो आहोत. जो तुमच्या मुलांसाठी, त्यांच्या ऑनलाइन क्लासेससाठी खूप उपयोगी पडेल.
या स्वस्त लॅपटॉपचं नाव आहे (Cheapest Laptop For Students) Asus क्रोमबुक. आणि हा लॅपटॉप तुम्हाला फक्त 14 हजार रुपयांमध्ये विकत घेता येईल. विद्यार्थ्यांना ऑनलाइन क्लासेससाठी ज्या गोष्टी लागतात, त्या या लॅपटॉपमध्ये आहेतचं.
महागाच्या लॅपटॉपमध्ये असलेली 14 इंच फुल एचडी स्क्रीन तुम्हाला या स्वस्त लॅपटॉपमध्ये मिळेल. त्याचबरोबर ऑनलाईन क्लासेससाठी वेब कॅमेरा महत्त्वाचा असतो. 720p एचडी वेब कॅमेरा या लॅपटॉपमध्ये तुम्हाला मिळेल.
विद्यार्थ्यांसाठी हा आहे सर्वात स्वस्त लॅपटॉप
गुगलची क्रोम OS लॅपटॉपमध्ये इन्स्टॉल असल्यामुळे तुम्हाला खूपच स्मूथ इंटरफेस मिळणार आहे. त्याचबरोबर इंटेलचा ड्युअल कोर प्रोसेसर मिळेल. जे मुलांसाठी अगदी योग्य आहे। 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल मेमरी विद्यार्थ्यांसाठी पुरेशी आहे.
तसंच या लॅपटॉपमध्ये ब्लूटूथ आणि वायफाय हे फीचर्स दिले आहेत. त्याचा वापर करून तुम्ही इंटरनेटशी लॅपटॉप कनेक्ट करू शकतात. सध्या हा लॅपटॉप फ्लिपकार्टवर फक्त 13990 /- रुपयांमध्ये लिस्टेड आहे। त्याचबरोबर तुम्हाला अनेक ऑफर्सचा लाभही घेता येईल.
AC विकत घ्यायचाय मग या गोष्टी लक्षात घ्या
जर तुम्हीसुद्धा अशा एखाद्या लॅपटॉपच्या शोधात होता, जो तुम्हाला तुमच्या मुलांना गिफ्ट करता येईल. (Cheapest Laptop For Students) त्यांच्या शैक्षणिक कार्यात उपयोगी ठरेल. तर हा लॅपटॉप तुमच्यासाठी अगदी योग्य आहे, एवढं मात्र नक्की.
तर तुम्ही विकत घेणार का हा लॅपटॉप ? नक्कीचं कमेंट करुन सांगा आणि अशाचं नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !