Chardham Yatra 2024 अक्षय तृतीयेनिमित्त केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री या चारही धामांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. आता अनेक लोकांचा हा विचार असेल की, चारधाम यात्रा करायची. परंतु या चारधाम यात्रेचा रूट कसा असेल ? तुम्ही यात्रा कशी करू शकता ? आज आम्ही त्याबद्दलचं माहिती घेऊन आलो आहोत.
Chardham Yatra 2024
चारधाम यात्रेची (Chardham Yatra 2024) सुरुवात तुम्ही दिल्लीहून करू शकतात. दिल्लीहून रेल्वे किंवा विमान मार्गाने हरिद्वार येथे पोहोचायचं. हरिद्वार जवळचं ऋषिकेश आहे. ऋषिकेशला गेल्यानंतर तुम्ही केदारनाथ, बद्रीनाथ, यमुनोत्री आणि गंगोत्री या चारही धामांची यात्रा करू शकतात.
केदारनाथ : ऋषिकेशला पोहोचल्यानंतर तुम्ही बस किंवा टॅक्सीने गौरीकुंडपर्यंत जायचं असतं. गौरीकुंडपासून पुढे केदारनाथ मंदिरापर्यंत 17 किलोमीटरचा रस्ता आहे. जो तुम्ही पायी, घोडा, डोली किंवा हेलिकॉप्टरच्या मदतीने पार करू शकतात.
बद्रीनाथ : बद्रीनाथला जाण्यासाठी तुम्हाला पायी प्रवास करण्याची गरज नाहीये. ऋषिकेशवरून तुम्हाला बस किंवा टॅक्सी मिळेल. जी तुम्हाला बद्रीनाथपर्यंत घेऊन जाईल.
यमुनोत्री : यमुनोत्री हे यमुना नदीचं उगमस्थान आहे. ऋषिकेश पासून 220 किलोमीटर अंतरावर असलेल्या चट्टी येथे तुम्ही बस किंवा टॅक्सीच्या सहाय्याने पोहोचू शकता आणि मग तेथून पुढे यमुनोत्रीपर्यंत 5 किलोमीटरचा तुम्ही पायी, घोडा किंवा डोलीच्या साह्याने करू शकता.
गंगोत्री : गंगोत्री हरिद्वारपासून 270 किलोमीटर अंतरावर आहे. तुम्हाला हरिद्वारमधून बस किंवा टॅक्सी मिळून जाईल.
एकूणचं आयुष्यात एकदा तरी चारधाम यात्रा करायची, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि आता 2024 मध्ये चारधाम यात्रेला (Chardham Yatra 2024) सुरुवात झाली आहे. एप्रिल – मे ते नोव्हेंबर – डिसेंबरपर्यंत ही चारधाम यात्रा सुरू असते. त्यानंतर ही मंदिरं बंद केली जातात. त्यामुळे या सहा महिन्यातचं तुम्ही चारधाम यात्रा करू शकतात.
100 वर्ष जगायचंय मग करा हे ५ काम
आपल्या महाराष्ट्रातूनही दरवर्षी लाखो लोक चारधामची यात्रा (Chardham Yatra 2024) करत असतात. अनेकदा एखाद्या ग्रुपबरोबर ही टूर करणं जास्त सोयीस्कर असतं. कारण आपल्या येथील जेवण आणि तेथील जेवणात फरक असतो. ग्रुप टूर असेल तर ते सगळ्या गोष्टी मॅनेज करतात. म्हणजे तुम्हाला चारधाम यात्रा करणं जास्त अवघड जाणार नाही.
तर तुम्ही केलीये का चारधाम यात्रा ? नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाचं नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !