Chakolya Recipe In Marathi | चकोल्या रेसिपी मराठी 2024

Chakolya Recipe In Marathi

Chakolya Recipe In Marathi

Chakolya Recipe In Marathi चकोल्या हा पदार्थ आपल्या सर्वांच्या घरात खूपच आवडीने बनवला जातो आणि खाल्ला जातो. कोणी कोणी याला वरण फळ किंवा डाळ फळ असंही म्हणतं. तर गुजरात आणि राजस्थानमध्ये या पदार्थाला दाल ढोकळी या नावाने ओळखतात. हा पदार्थ सगळीकडे खूपच जास्त लोकप्रिय आहे आणि आवडीने खाल्ला जातो. तुम्ही सर्वांनीदेखील चकोल्या Chakolya Recipe In Marathi नक्कीच खाल्ल्या असतील.

एखाद्या दिवशी घरात आपल्याला भाजी पोळी बनवण्याचा कंटाळा आला की चकोल्या किंवा वरण फळ हमखास बनवलं जातं. दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणात या चकोल्या खाताना खूप टेस्टी लागतात. चकोल्या बनवायलादेखील खूपच सोप्या असतात आणि खायलाही अतिशय टेस्टी लागतात. चकोल्या खाऊन पोट भरतं पण मन भरत नाही.

आज आम्ही तुमच्यासाठी या चकोल्या किंवा वरण फळ बनवण्याची अतिशय सोपी रेसिपी घेऊन आलो आहोत. तुम्ही या चकोल्या जर अजूनपर्यंत कधीच बनवल्या नसतील तर एकदा नक्कीच बनवून पहा. घरात लहान मोठ्यांना या चकोल्या खूप आवडतील.

चकोल्या बनवण्याचं साहित्य :

चकोल्या बनवण्यासाठी काय साहित्य लागतं ते आपण पाहूया.

डाळ बनवण्याचं साहित्य

  • अर्धा कप तूर डाळ
  • दीड कप पाणी
  • चवीनुसार मीठ
  • थोडीशी हळद
  • 1 चमचा साजूक तूप

डाळीला फोडणी देण्यासाठी साहित्य

  • 2 मोठे चमचे तेल
  • अर्धा चमचा मोहरी
  • अर्धा चमचा जिरे
  • 1 उभी चिरलेली हिरवी मिरची
  • थोडीशी कढीपत्त्याची पानं
  • किंचित हिंग
  • आलं लसणाची पेस्ट
  • थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर
  • 1 मोठा टोमॅटो बारीक चिरलेला
  • थोडीशी हळद
  • थोडंसं लाल तिखट
  • थोडंसं मीठ
  • 2 चमचे लिंबाचा रस
  • छोटासा गुळाचा खडा

चकोल्या बनवण्याचं साहित्य

  • 1 कप गव्हाचं पीठ
    2 चमचे बेसन
    थोडीशी हळद
    चवीनुसार मीठ
    अर्धा चमचा लाल मिरची पावडर
    अर्धा चमचा ओवा आणि जिरे
    1 चमचा तूप
    अर्धा कप पाणी
    थोडंसं तेल
    थोडीशी कोथिंबीर

Bundiche Ladoo Recipe In Marathi | बुंदीचे लाडू रेसिपी मराठी

Procedure For Chakolya Recipe In Marathi चकोल्या बनवण्याची कृती :

1. चकोल्या Chakolya Recipe In Marathi किंवा वरण फळ बनवण्यासाठी सर्वात आधी आपण डाळ बनवून घेणार आहोत. त्यासाठी एका बाऊलमध्ये अर्धा कप तुरीची डाळ घेणार आहोत. ही डाळ आपण 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ. डाळ स्वच्छ पाण्याने धुवून झाल्यावर यामध्ये पुन्हा पाणी टाकून ही डाळ 10 ते 15 मिनिटे भिजत ठेवायची आहे.

2. 15 मिनिटे झाल्यावर यातलं पाणी काढून ही डाळ आपण कुकरमध्ये शिजवणार आहोत. डाळ कुकरमध्ये टाकून त्यात दीड कप पाणी टाकायचं. मग चवीनुसार मीठ, किंचित हळद आणि 1 चमचा साजूक तूप टाकून कुकरचं झाकण लावून घेऊया. आपल्याला कुकरच्या 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत. पहिली शिट्टी गॅसच्या हाय फ्लेमवर होऊ द्यायची आणि पुढच्या 3 शिट्ट्या कमी फ्लेमवर होऊ द्यायच्या.

3. आपण आता चकोल्या Chakolya Recipe In Marathi बनवण्यासाठी कणिक मळून घेऊया. त्यासाठी एका बाऊलमध्ये एक कप गव्हाचं पीठ, 2 चमचे बेसन, किंचित हळद, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा ओवा आणि जिरे हाताने मळून घालायचे आणि 1 चमचा तूप टाकून सर्व मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून घट्टसर गोळा तयार करून घेणार आहोत. अर्धा कप पाणी टाकायचंय. पोळीची कणिक मळतो तशीच कणिक आपल्याला मळून घ्यायचीय.

4. आपली कणिक मळून तयार आहे. यावर थोडंसं तेल लावायचं आणि झाकण ठेवून ही कणिक थोडावेळ बाजूला ठेवायची.

5. आपल्या कुकरच्या 4 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर पूर्णपणे थंड झाला आहे. आपली डाळ छान शिजली आहे.

6. आता आपण या डाळीला फोडणी देणार आहोत. त्यासाठी एका कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घ्यायचंय. तेल गरम झाल्यावर त्यात अर्धा चमचा मोहरी, मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरे, 1 उभी चिरलेली हिरवी मिरची, थोडेसे कढीपत्त्याची पानं, किंचित हिंग, आलं लसणाची पेस्ट यामध्ये 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा दोन्ही क्रश करून घ्यायचं. थोडीशी कोथिंबीर टाकून 1 मिनिटे तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचं.

यानंतर 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून घालायचा. गावरान टोमॅटो घ्यायचा तो चवीला छान आंबट असतो, किंचित हळद, थोडंसं लाल तिखट, थोडंसं मीठ टाकून मिक्स करायचं. थोडावेळ हा टोमॅटो आपण तेलामध्ये छान शिजवून घेणार आहोत आणि त्यानंतर ही शिजलेली डाळ यामध्ये टाकायची. कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्स करून कढईमध्ये टाकायचं.

चकोल्या किंवा वरण फळासाठी जी डाळ आहे ती थोडी पातळ ठेवायची असते कारण जसं जसं आपण यामध्ये चकोल्या घालत जाऊ ती घट्ट होत जाईल. आपली डाळ घट्ट झालीय त्यामुळे यात पुन्हा 2 कप पाणी टाकायचं. पातळ डाळ आपल्याला हवीय कारण ही नंतर अजून घट्ट होणार आहे.

7. यामध्ये 2 चमचे लिंबाचा रस टाकायचा. तुम्ही कैरी, चिंचा, कोकम, आमचूर पावडरसुद्धा वापरू शकता. जर तुम्हाला आंबटपणा नको असेल तर नाही टाकलं तरी चालेल. लिंबाचा रस टाकल्यामुळे यात एक छोटासा गुळाचा खडासुद्धा टाकायचा. त्यानंतर कढईवर झाकण ठेवून छान उकळी येऊ द्यायची आहे.

8. डाळीला उकळी येईपर्यंत आपण चकोल्या बनवायला सुरुवात करूया. या कणकेला 10-15 मिनिटे बाजूला ठेवलं होतं. ती पुन्हा हाताने छान मळून घेऊया आणि दोन भाग करूया. आता आपण पोळीप्रमाणे लाटून घेऊया. पोळपाटाला थोडंसं तेल लावायचं. लाटण्याकरिता आपण पिठाचा वापर करणार नाही तर तेलाचा वापर करणार आहोत. कारण आपण पीठ वापरलं तर ते पीठ आपल्या डाळीत जातं आणि डाळ घट्ट होते त्यामुळे पीठ वापरायचं टाळायचं.

आपल्याला गोल पोळी लाटून घ्यायचीय. आपण पराठा लाटतो तशी थोडीशी जाड ठेवायची. आता आपण याचे काप करून घेणार आहोत. तुम्ही चौकोनी, आयताकृती किंवा डायमंड शेपमध्ये कापून घेऊ शकता. हे काप प्लेटमधून काढून घेऊया. अशाचप्रकारे उरलेल्या चकोल्या तयार करून घेऊया. आपल्या चकोल्या तयार आहेत.

9. आपल्या डाळीला छान उकळी आलेली आहे. या डाळीमध्ये आपण आता चकोल्या सोडणार आहोत. याला ढोकळीसुद्धा म्हणतात. एकेक करून ही ढोकळी आपण डाळीमध्ये सोडणार आहोत. चकोल्या टाकताना गॅसचा फ्लेम मिडीयम ते हाय करायचा आणि चकोल्या टाकल्यावर गॅसचा फ्लेम कमी करायचा. आता या कढईवर झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटे छान शिजवून घ्यायचं आहे. पण मधेमधे ढवळत राहायचं जेणेकरून चकोल्या खाली जाऊन लागायला नको.

10. 20 मिनिटे झाल्यावर आपल्या चकोल्या छान शिजलेल्या आहेत. छान फुललेल्या आहेत. शेवटी यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गारनिशिंग करूया आणि गॅस बंद करूया.

आपल्या गरमागरम चकोल्या Chakolya Recipe In Marathi किंवा वरणफळ तयार आहेत ते एका बाऊलमध्ये सर्व्ह करूया. गरमागरम चकोल्या खूप टेस्टी लागतात. दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी हा खूप चांगला ऑप्शन आहे. तुम्ही या चकोल्यावर थोडंसं तूप आणि कोथिंबीर टाकून असंच खाऊ शकता किंवा मग भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता.

ही चकोल्याची रेसिपी Chakolya Recipe In Marathi नक्की बनवून पहा. तुमच्या घरातील सर्वांना नक्कीच आवडतील.

Chakolya Recipe In Marathi Important Tips महत्वाच्या टिप्स :

1. वरण फळासाठी आपण जी डाळ बनवतो ती थोडी पातळ ठेवावी लागते कारण आपण यामध्ये चकोल्या टाकल्या की ते घट्ट होत जाईल. डाळ घट्ट झाली की त्यात पाणी टाकून शिजवायचं.

2. डाळीमध्ये आंबटपणा येण्यासाठी लिंबाचा रस टाकायचा. त्याऐवजी तुम्ही कैरी, चिंच, कोकम किंवा आमचूर पावडर वापरू शकता. जर आंबट नको असेल तर काहीच नाही टाकलं तरी चालेल.

3. चकोल्या पाडण्यासाठी त्याच्या कणकेची पोळी लाटताना घोळण्याकरिता पिठाचा नाही तर तेलाचा वापर करायचा. कारण आपण पीठ वापरलं तर ते आपल्या डाळीत जातं आणि डाळ घट्ट होते त्यामुळे घोळण्याकरिता पीठ वापरणं टाळायचं आणि तेलच वापरायचं.

4. चकोल्या Chakolya Recipe In Marathi कापताना तुम्ही कुठल्याही शेपमध्ये कापू शकता पण डायमंड शेपमध्ये कापल्या तर खूप छान दिसतात.

5. आपण कापलेल्या चकोल्या डाळीमध्ये शिजवताना मधेमधे ढवळत राहायचं म्हणजे त्या कढईला खाली लागणार नाहीत किंवा खाली बसणार नाहीत.

6. या चकोल्या किंवा वरण फळ तुम्ही यावरून तूप आणि कोथिंबीर टाकून असंच खाऊ शकता किंवा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता.

या सर्व मस्त टिप्स वापरून टेस्टी चकोल्या Chakolya Recipe In Marathi नक्की बनवा.

FAQ For Chakolya Recipe In Marathi काही महत्त्वाचे प्रश्न :

1. Chakolya Recipe In Marathi किंवा वरण फळ कसे बनवतात ?

चकोल्या बनवण्यासाठी तुरीची डाळ स्वच्छ पाण्याने धुवून ती पाण्यात भिजवून ठेवायची. त्यानंतर पाणी काढून ही डाळ कुकरमध्ये शिजवून घ्यायची. मग गव्हाचं पीठ, बेसन, मीठ, हळद, लाल मिरची पावडर, जिरे, ओवा, तूप टाकून मिक्स करायचं आणि पाणी टाकून गोळा तयार करायचा आणि अशी चकोल्याची कणिक मळून घ्यायची. त्यानंतर कुकरमध्ये डाळ शिजवून घ्यायची. आता कढईमध्ये डाळीसाठी फोडणी तयार करायची आणि शिजलेली डाळ त्यात टाकायची. डाळीला उकळी आल्यावर चकोल्या कापून त्यात टाकायच्या आणि शिजवून घ्यायच्या आहेत. आपल्या चकोल्या तयार आहेत.

2. चकोल्या खाणं आरोग्यासाठी चांगलं आहे का ?

Chakolya Recipe In Marathi किंवा वरण फळ खाण्यात अतिशय टेस्टी असतात. याचबरोबर हे डाळीपासून बनवलेलं असल्यामुळे पचण्यासाठीही खूप हलकं असतं. यामध्ये भरपूर प्रमाणात पोषणद्रव्ये असतात त्यामुळे आपल्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. या चकोल्या किंवा वरण फळ बनवायलाही खूप सोपं असतं.

काहीतरी स्वादिष्ट खायचं असेल तर तुम्ही आपल्या या Chakolya Recipe In Marathi किंवा वरणफळ नक्कीच बनवू शकता. तुम्हाला या चकोल्या खाऊन खूप छान वाटेल. तुमच्या कुटुंबियांना या चकोल्या टेस्ट करायला द्या सर्वांना खूप आवडतील. सगळे तुमचं खूप कौतुक करतील आणि वारंवार बनवायला लावतील. तुम्ही ही चकोल्याची रेसिपी नक्की बनवून पहा.

तुम्हाला ही Chakolya Recipe In Marathi रेसिपी आवडली का नक्कीच सांगा. अशाच खमंग रेसिपी बनवण्यासाठी आमचे दुसरे आर्टिकलसुद्धा नक्कीच वाचा.

तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.  

Scroll to Top