Central Locking System मागील काही वर्षांमध्ये आपण सगळेचं अशा अपघातांबद्दल ऐकतोय, जेथे चारचाकी गाडीचा अपघात झाला. गाडीला आग लागली आणि गाडीत असलेल्या सेंट्रल लॉकिंग सिस्टीम या फीचरमुळे गाडीतील लोक गाडीतचं अडकले, त्यांना दरवाजे उघडता आले नाहीत आणि त्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला.
मग तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीचं आला असेल की, गाडीत दिले जाणारे फीचर्स हे गाडी सुरक्षित बनवण्यासाठी तयार केले जातात. मग या सेंट्रल लॉकिंग सिस्टीममुळे Central Locking System लोकांचे मृत्यू का होत आहेत ? ही तर खूप धोकादायक सिस्टीम आहे, मग ती गाडीत का बसवतात ? आज आपण या सेंट्रल लॉकिंग सिस्टीमबद्दल जाणून घेणार आहोत.
Central Locking System
चारचाकी गाडीतील ही सेंट्रल लॉकिंग सिस्टीम Central Locking System तुम्ही नवीन गाडी विकत घेताना कंपनी तुम्हाला देते किंवा नंतरही ती गाडीमध्ये बसवून घेता येते. मग ही सेंट्रल लॉकिंग सिस्टीम नेमकी आहे तरी काय ? तर मित्रांनो ड्रायव्हर फक्त एका बटनाच्या आधारे मग ते गाडीत असो किंवा त्याच्या रिमोट कीमध्ये संपूर्ण गाडीतील सगळे दरवाजे या फीचरच्या माध्यमातून लॉक करू शकतो. गाडी चालवताना ड्रायव्हरला सुविधा व्हावी, तसंच चुकून एखादा दरवाजा उघडा राहू नये, अपघात होऊ नये, यासाठी हे फीचर खूपचं उपयोगी आहे.
परंतु अपघाताच्या वेळेस हेच फीचर धोकादायक बनतंय कारण अपघात झाल्यानंतर हे फीचर काम करणं बंद करतं. दरवाजे उघडता येत नाही आणि लोकांचे मृत्यू होत आहेत. मग असं का होतंय ?
याचं सोप्प उत्तर म्हणजे सेंट्रल लॉकिंग सिस्टीम हे फीचर रेडिओ वेब या टेक्नॉलॉजीवर काम करतं आणि ही सगळी टेक्नॉलॉजी गाडीच्या इलेक्ट्रॉनिक सिस्टीमशी जोडलेली असते. जेव्हा अपघात होतो तेव्हा गाडीतील इलेक्ट्रॉनिक सिस्टीम आणि वायरिंग हे सगळं डॅमेज होतं. त्यामुळे गाडी चालू असताना ती सेंट्रल लॉक झालेली असते आणि जेव्हा अपघात होतो त्यावेळेस गाडीतील सर्व इलेक्ट्रॉनिक फीचर्स काम करणं बंद करतात, वायरिंग डॅमेज झालेली असते. त्यामुळे सेंट्रल लॉकिंग सिस्टीम काम करत नाही आणि दरवाजे उघडता येत नाही. गाडीतील लोक गाडीमध्येचं अडकून पडतात.
अपघात झाल्यास Central Locking System च्या संकटातून बचाव कसा करावा ?
अशा परिस्थितीतून स्वतःचा जीव वाचवायचा असेल, तर गाडीमध्ये एखादा हातोडा किंवा असं एखादं उपकरण ठेवायला हवं, ज्याचा उपयोग करून तुम्ही गाडीच्या काचा फोडू शकतात आणि सुखरूप गाडीच्या बाहेर निघू शकतात. याव्यतिरिक्त दुसरा कोणताही पर्याय अशा परिस्थितीत तुम्हाला वाचवू शकत नाही.
तर तुम्हाला काय वाटतं, गाडीतील सेंट्रल लॉक फीचरबद्दल Central Locking System नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !