Causes Of Pimples तुमच्या चेहऱ्याच्या सुंदरतेचा सर्वात मोठा शत्रू कोणी असेल, तर ते म्हणजे चेहऱ्यावर येणारे पिंपल्स. एकदा या पिंपल्सने येणं सुरू केलं की, न बोलवलेल्या पाहुण्याप्रमाणे ते चेहऱ्याला चिटकून बसतात, जातचं नाही आणि जातात तर त्यांची निशाणी सोडून जातात.
पिंपल्सला हटवण्यासाठी आपण खूप सारे उपाय करतो. परंतु हे पिंपल्स येतात का ? हा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का ? तर तुमच्या स्वतःच्याच काही चुकांमुळे ते येतात. तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे ? परंतु हे खरं आहे. तुम्ही रोज ज्या काही चुका करतात, त्यामुळे हे घडतं. मग कोणत्या आहेत त्या चुका ? (Causes Of Pimples) आपण त्याबद्दल जाणून घेऊया.
चेहऱ्याचं टॅनिंग करण्यासाठी करा हे उपाय
Causes Of Pimples
★ कमी पाणी पिणे : पाण्याला जीवन म्हटलं जातं. आपल्या शरीरासाठी पाणी किती उपयोगी आहे, हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. परंतु कमी पाणी पिणे हे चेहऱ्यावर पिंपल्स येण्याचं सर्वात मोठं कारण आहे. पाणी न पिल्याने शरीरात अशुद्धी जमतात आणि त्या पिंपल्सच्या रूपात चेहऱ्यावर दिसतात. त्यामुळे पुरेसं पाणी प्यायलाचं हवं.
★ चेहऱ्याला पुन्हा पुन्हा हात लावणे : आपण दिवसभर काही ना काहीतरी काम करत असतो आणि हे काम करण्यासाठी आपल्या हातांचा वापर होतो। त्यामुळे हात सर्वात जास्त अस्वच्छ असतात. त्यावर खूप बॅक्टेरिया असतात. काहीजणांना पुन्हा पुन्हा चेहऱ्याला हात लावायची सवय असते. त्यामुळे हे बॅक्टेरिया हातावरून चेहऱ्यावर येतात आणि मग पिंपल्स यायला सुरुवात होते. त्यामुळे हेही करणे टाळा.
★ साखरेचं सेवन : गोड साखर आपल्या सर्वांनाच आवडते. परंतु अति तिथे माती. त्यामुळे जर साखरेचे प्रमाण शरीरात जास्त झालं, तरी सुद्धा पिंपल्सचं प्रमाणही वाढतं. अनेक तरुण-तरुणींना पॅकेज फूड खाण्याची सवय असते. (Causes Of Pimples) पण यामध्ये खूप जास्त प्रमाणात साखर असते. त्यामुळे पिंपल्स येऊ शकतात. साखरेचे सेवन कमी करा.
★ चेहरा पुन्हा पुन्हा धुणे : अनेक लोक आपल्या चेहऱ्याच्या सुंदरतेसाठी खूप सेन्सिटिव्ह असतात. त्यामुळे ते दिवसभरात अनेक वेळेस चेहरा धुतात. फेस पॅक वापरतात, स्क्रब वापरतात. परंतु अति तेथे माती या उक्तीप्रमाणे जास्त चेहरा धुतला की पिंपल्सचा त्रास सुरू होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक गोष्ट लिमिटमध्ये करणं योग्य.
तर यापैकी तुम्ही कोणती चूक करता नक्कीचं कमेंट करुन सांगा आणि अशाचं नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !