Bundiche Ladoo Recipe In Marathi | बुंदीचे लाडू रेसिपी मराठी

Bundiche Ladoo Recipe In Marathi

Bundiche Ladoo Recipe In Marathi

Bundiche Ladoo Recipe In Marathi लग्नसमारंभात जेवणात मिळणारी गोड गोड बुंदी तर आपल्याला सर्वांनाच आवडते. एखाद्या लग्नात जेवण करताना बुंदी ही आकर्षणाचं केंद्र असते. लग्नात बुंदी असली की जेवण जरा जास्तच जातं. आजकाल बहुतांश लग्नांमध्ये बुंदीऐवजी गुलाबजामुन देखील बनवले जातात पण बुंदीची क्रेझ अजूनही कमी झालेली नाही. अनेक लोक आजही आवर्जून लग्नांमध्ये बुंदीच जेवणामध्ये ठेवतात.

आजकाल बुंदी एवढी सहज खायला मिळतच नाही पण एखाद्यावेळी आपल्याला अचानक कुठे खायला मिळाली तरी आपण खूप आवडीने खातो. बुंदी खाण्यासाठी आपल्याला कोणाच्यातरी लग्नाची वाट पहावी लागते.
पूर्वी लग्नांमध्ये जेवणात बुंदी हमखास असायचीच त्यामुळे सहज सर्वजण खायचे पण सध्या असं होत नाही. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत बुंदी सगळेच आनंदात खातात.

एवढंच काय आपल्याकडे दिवाळीच्या फराळामध्येही बुंदीचे लाडू बनवले जातात. नेहमीचे बेसनाचे, रव्याचे लाडूंसोबत टेस्टी बुंदीचे लाडू बनवले की फराळाची चव आणखीनच वाढते. बुंदीचे लाडू खायला तर खूप टेस्टी असतात पण बुंदी बनवायला किचकट असते त्यामुळे अनेकदा आपण घरी बुंदीचे लाडू बनवण्यापेक्षा बाहेर हलवाईकडून आणणंच पसंत करतो.

पण आज आम्ही तुमच्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने घरच्याघरी बुंदीचे लाडू बनवण्याची मस्त Bundiche Ladoo Recipe In Marathi रेसिपी घेऊन आलो आहोत. तुम्ही एकदम सहज हे बुंदीचे टेस्टी लाडू बनवू शकाल आणि तुमच्या दिवाळीचा फराळ आणखीनच उत्तम होईल. तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून पहा.

बुंदीचे लाडू बनवण्याचं साहित्य :

बुंदीचे लाडू Bundiche Ladoo Recipe In Marathi बनवण्यासाठी काय साहित्य लागतं ते आपण पाहूया.

5 कप बेसनपीठ
4 कप पाणी
खाण्याचा पिवळा रंग
तळण्यासाठी तेल
खाण्याचा लाल रंग
खाण्याचा हिरवा रंग
खाण्याचा केशरी रंग
5 कप साखर
अडीच कप पाणी
2 चमचे दूध
1 वाटी काजूचे काप
1 वाटी बदामाचे काप
थोडीशी किशमिश
थोडीशी वेलची पूड
थोडीशी जायफळ पूड
थोडंसं तूप

बुंदीचे लाडू बनवण्याची कृती :

1. बुंदीचे लाडू Bundiche Ladoo Recipe In Marathi बनवण्यासाठी सर्वात आधी एका भांड्यामध्ये 5 कप बेसनपीठ घ्यायचं. यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला रवीच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे.
5 कप बेसनपीठाला 4 कप पाणी आपल्याला लागणार आहे. पाण्याचं प्रमाण हे कमी किंवा जास्त होऊ शकतं.

बुंदीचं बॅटर आपल्याला खूप घट्ट किंवा पातळ नाही करायचं बुंदी पडेल इतकं घट्ट असायला हवं. बॅटरची कंसिस्टंसी ही मिडीयम असायला हवी.

2. या बॅटरमध्ये आपल्याला थोडासा खाण्याचा पिवळा रंग टाकायचा आणि रवीने मिक्स करून घ्यायचा. यामुळे रंग खूप छान येतो.

3. आता यामधील थोडंसं बॅटर आपण वेगळ्या बाऊलमध्ये काढून घेऊया. हे आपण वेगवेगळ्या कलरची बुंदी बनवण्यासाठी वापरणार आहोत.

4. बुंदी Bundiche Ladoo Recipe In Marathi पाडण्यासाठी लोखंडाचा झाऱ्या घेऊया. तुमच्याकडे स्टीलचा झाऱ्या किंवा दुसरा कोणता झाऱ्या असेल ज्याने बुंदी पाडता येईल तो तुम्ही घेऊ शकता.

5. बुंदी तळण्यासाठी मोठी पसरट कढई घ्यायची ज्यामुळे बुंदी पाडण्यासाठी खूप सोपं पडतं आणि बुंदी बाजूला गॅसवर सांडत नाही. बुंदी तळण्यासाठी तेलसुद्धा थोडं जास्तच लागतं. यासोबतच तुम्हाला एक डबा ठेवायचा आहे आणि डब्यावर झाऱ्या आदळून बुंदी पाडून घ्यायची आहे.

6. बुंदी तळताना तेल गरम असायला हवं आणि बुंदी पाडल्यावरसुद्धा तेल गरमच असायला हवं. गॅस हाय फ्लेमवर ठेवायचा. आपल्याला फक्त 15 ते 20 सेकंद बुंदी शिजवून घ्यायचीय तेलाचे बुडबुडे कमी झाले की बुंदी काढून घ्यायची.

बुंदी काढताना मात्र गॅसचा फ्लेम कमी करायचा नाहीतर बुंदी कडक होते आणि लाडूसुद्धा कडक होऊ शकतात. आपल्याला लाडू सॉफ्ट ठेवायचे आहेत त्यामुळे बुंदी तेलातून बाहेर काढताना गॅस कमी करायचा. जर तुम्ही बुंदी फक्त खाण्यासाठी बनवत असाल तर मात्र बुंदी थोड्यावेळ जास्त शिजवू शकता. अशाचप्रकारे सर्व बुंदी तळून घ्यायची.

7. जे बॅटर आपण एका बाऊलमध्ये काढून घेतलं होतं त्याचे दोन पार्ट करूया. निम्मं बॅटर आणखी एका बाऊलमध्ये काढायचं. पहिल्या बाऊलमध्ये खाण्याचा थोडासा लाल रंग टाकायचा आणि रवीच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचा. दुसऱ्या बाऊलमध्ये थोडासा खाण्याचा हिरवा रंग टाकायचा आणि रवीने मिक्स करायचं. आपण दोन्ही रंगांच्या बुंदी पाडणार आहोत.

8. त्यानंतर थोडंसं बॅटर उरलेलं आहे त्यामध्ये केशरी रंगसुद्धा टाकायचा आणि मिक्स करून घ्यायचा. यामुळे आपले लाडू आणखी कलरफुल दिसतील. आता झाऱ्याने ही सगळी बुंदी कढईमध्ये तळून घ्यायची आणि एका ताटामध्ये काढून घ्यायची. आपली वेगवेगळ्या प्रकारची बुंदी पाडून तयार आहे.

9. आता आपण साखरेचा पाक तयार करून घेऊया. त्यासाठी गॅसवर एका पातेल्यात 5 कप साखर घ्यायची. 5 कप बेसनासाठी आपण 5 कप साखर घेतलीय. 5 कप साखरेसाठी आपण अडीच कप पाणी टाकायचं. जेवढी साखर घेतली त्याच्या अर्ध पाणी घ्यायचंय.

आपल्याला एक तारी पाक तयार करून घ्यायचाय. एकतारीपेक्षा थोडा जास्त पाक शिजवला तरी चालेल. साखर विरघळली की यात 2 चमचे दूध घालायचं म्हणजे त्यात जर काही मळ असेल तर तो आपल्याला काढता येईल. काही वेळाने पाण्यावर थोडा मळ साचलेला आहे तो चमच्याने काढून घ्यायचा.

10. आपल्याला एक तारी पाक शिजवून घ्यायचाय. प्रमाण जास्त असल्यामुळे साधारण 15 ते 20 मिनिटे लागतात. गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा. पाक चिकट आला की झाला म्हणून समजायचा एक तार आली तरी चालेल. पाक कच्चा राहायला नको. पाक कच्चा राहिला तर लाडू वळता येत नाही आणि थोडा जास्त शिजला तरी चालतो.

इथे आपला पाक तयार आहे. हा गरमागरमच आपल्याला तळलेल्या बुंदीमध्ये टाकायचा आहे. हे एकदा छान मिक्स करून घ्यायचं आणि तुम्हाला वाटलं पाक जास्त झालाय तर थोडीशी बुंदी बाजूला ठेवून यामध्ये घालू शकता किंवा पाक थोडासा कमी टाकला तरी चालेल.

11. यामध्ये आपल्याला 1 वाटी काजूचे काप, 1 वाटी बदामाचे काप, थोडीशी किशमिश, थोडीशी वेलची पूड आणि थोडीशी जायफळ पूड टाकायची त्यामुळे खूप छान चव येते. हे सर्व मिक्स करून घ्यायचं. आता आपल्याला हे मिश्रण साधारण 45 मिनिटे ते 1 तास असंच ठेवायचं आहे म्हणजे बुंदी साखरेचा पाक पूर्ण शोषून घेईल आणि छान नरम होईल. त्यानंतरच आपण लाडू वळण्यासाठी घेणार आहोत.

12. साधारण 1 तास झाल्यानंतर आपला पाक मस्त मुरलेला आहे. आता लाडू बांधता येतात की नाही ते चेक करायचं. त्यासाठी हाताला आधी तूप लावून घ्यायचं आणि थोडंसं जास्त प्रमाण घेऊन दोन्ही हाताने दाबून दाबून लाडू वळून घ्यायचा आहे. हे लाडू वळताना थोडासा जोर जास्त लागतो. कारण बुंदीचे लाडू आहेत आणि हाताला चिकटतात त्यामुळे थोडेसे काळजीपूर्वक हे लाडू वळायचे.

13. बुंदीचे लाडू Bundiche Ladoo Recipe In Marathi वळणं थोडंसं कठीण आहे. नवीन लोकांना किंवा जे पहिल्यांदा बुंदीचे लाडू करत असतील त्यांना थोडं कठीण जातं. पण त्यांच्यासाठी एक खूप सोपी ट्रिक आहे. तुमच्याकडे कुठलीही छोटीशी वाटी किंवा प्लॅस्टिकचा कप असेल तर त्याला तुपाने ग्रीस करून घ्यायचं आणि त्यामध्ये बुंदीचं मिश्रण घालून चांगलं दाबून घ्यायचं.

त्यानंतर ही वाटी उलटी करून ताटामध्ये लाडू पाडून घ्यायचा. जेव्हा खूप साऱ्या प्रमाणात लाडू बनवायचे असतात तेव्हा तुम्ही असे करू शकता. एखाद्या कार्यक्रमात तुम्ही असे लाडू बनवू शकता. हे सोपं पडतं पण तुम्हाला गोल आकाराचे लाडू हवे असतील तर तुम्ही हाताने वळू शकता.

14. आपले बुंदीचे लाडू Bundiche Ladoo Recipe In Marathi तयार आहेत. लाडू वळल्यानंतर ते 3 ते 4 तास मुरू द्या त्यानंतर लाडूंची चव खूप छान लागते. खूप मऊ होतात. बऱ्याचदा पाक जास्त शिजला की लाडूवर पांढरा थर येतो त्यामुळे पाक योग्य शिजवायचा. खूप जास्त नाही एकतारी पाक शिजवायचा. मग लाडू मऊ होतो आणि चवीलाही छान होतो.

Veg Hakka Noodles Marathi Recipe | व्हेज हक्का नूडल्स रेसिपी मराठी

Bundiche Ladoo Recipe In Marathi महत्वाच्या टिप्स :

1. बुंदी तळण्यासाठी मोठी पसरट कढई घ्यायची ज्यामुळे बुंदी पाडण्यासाठी सोपं पडतं आणि बुंदी गॅसवर सांडत नाही.

2. बुंदी फक्त 15 ते 20 सेकंद तेलात तळायची आणि बुंदी तेलातून बाहेर काढताना गॅस कमी करायचा नाहीतर बुंदी कडक होते त्यामुळे लाडूसुद्धा कडक होतात. पण बुंदी खाण्यासाठी बनवत असाल तर जास्तवेळ तळू शकता.

3. साखरेचा पाक बनवताना साखर विरघळल्यावर त्यात थोडं दूध टाकायचं म्हणजे त्यातील मळ आपल्याला काढता येईल.

4. साखरेचा पाक कच्चा राहता कामा नये. पाक कच्चा राहिला तर लाडू नीट वळता येत नाही.

5. जर साखरेचा पाक जास्त झाला तर थोडीशी बुंदी यामध्ये टाकू शकता किंवा तुम्हाला अंदाज येत नसेल तर पाक कमी टाकायचा.

6. साखरेचा पाक बुंदीमध्ये टाकल्यानंतर 1 तास मुरू द्यायचं म्हणजे बुंदी पाक शोषून घेईल आणि त्यानंतर लाडू वळायचे.

7. तुम्हाला जर बुंदीचे लाडू वळताना अडचण येत असेल तर तुम्ही एखादी वाटी किंवा प्लॅस्टिकच्या कपमध्ये बुंदी टाकून चांगली दाबून घेऊ शकता आणि त्यानंतर हे लाडू ताटात काढून घ्यायचे. तुमचे लाडू तयार आहेत.

8. लाडू वळल्यानंतर ते 3 ते 4 तास मुरू द्या म्हणजे त्याची चव छान लागते. लाडूवर साखरेच्या पाकाचा पांढरा थर येऊ नये म्हणून पाक चांगला शिजवायचा.

या सर्व टिप्स वापरून तुम्ही चमचमीत बुंदीचा लाडू Bundiche Ladoo Recipe In Marathi नक्की बनवा.

FAQ For Bundiche Ladoo Recipe In Marathi काही महत्त्वाचे प्रश्न :

1. Bundiche Ladoo Recipe In Marathi कसे बनवले जातात ?

बुंदीचे लाडू बनवण्यासाठी बेसनपीठ आणि पाणी मिक्स करून त्याचं बॅटर तयार करायचं. हे बॅटर थोडं थोडं वेगळ्या बाऊलमध्ये काढून त्यामध्ये वेगवेगळे कलर टाकून मिक्स करायचे. मग झाऱ्याच्या साहाय्याने कढईमध्ये बुंदी पाडून तळून घ्यायची. बुंदी तयार झाल्यावर त्यात साखरेचा पाक तयार करून टाकायचा आणि पाक मुरल्यावर त्याचे लाडू वळून घ्यायचे. आपले बुंदीचे लाडू तयार आहेत.

2. Bundiche Ladoo Recipe In Marathi कडक होऊ नये म्हणून काय करायला हवं ?

बुंदी गरम तेलात गॅसच्या हाय फ्लेमवर तळायची. बुंदी फक्त 15 ते 20 सेकंद तळायची आणि तळल्यानंतर ती बाहेर काढताना गॅस कमी फ्लेमवर करायचा नाहीतर बुंदी कडक होते आणि लाडूसुद्धा कडक होतात. बुंदीचे लाडू सॉफ्ट ठेवायचे असतील तर बुंदी तेलातून बाहेर काढताना गॅस कमी करायचा.

आपले एकदम हलवाईसारखे चमचमीत बुंदीचे लाडू Bundiche Ladoo Recipe In Marathi घरच्याघरी तयार आहेत. तुम्हाला हे लाडू खाल्ल्यानंतर अगदी लग्नातल्या बुंदीचीच आठवण येईल. दिवाळीमध्ये बुंदीचे लाडू खाऊन आणखी जास्त मजा येईल. तुम्ही ही बुंदीच्या लाडूंची रेसिपी एकदा नक्कीच बनवून पहा.

तुम्हाला ही Bundiche Ladoo Recipe In Marathi रेसिपी आवडली का नक्कीच सांगा. अशाच चमचमीत रेसिपी शिकण्यासाठी आमचे दुसरे आर्टिकलसुद्धा नक्कीच वाचा.

तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.  

Scroll to Top