BPO Full Form : कॉल सेंटर म्हणजे BPO चा फुल फॉर्म माहितेय का ?

BPO Full Form 

BPO Full Form मित्रांनो आज आपण BPO चा full form आणि काही इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेणार आहोत.

BPO Full Form 

BPO चा full form आहे Business Process Outsourcing.

BPO म्हणजे (BPO Full Form) बिझनेस प्रोसेस आऊटसोर्सिंग यामध्ये विदेशात असलेल्या मल्टीनॅशनल कंपन्यांचं काम हे वेगवेगळ्या देशातल्या कंपन्यांना दिलं जातं.

भारतातील BPO इंडस्ट्री खूपच मोठी आहे. दरवर्षी आपल्या देशात लाखो लोक डिग्री घेऊन बाहेर पडतात त्यांना या BPO इंडस्ट्रीमुळे रोजगार मिळण्यास खूप मदत होते.

BPO चे प्रकार :

1. Domestic BPO : जेव्हा आपल्याला BPO सर्व्हिसेज आपल्या देशातूनच मिळतात.

2. Nearshore BPO : जेव्हा BPO सर्व्हिसेज आपल्या शेजारील देशातून मिळतात.

3. Offshore BPO : जेव्हा BPO सर्व्हिसेज या विदेशातून मिळतात.

UPS चा फुल फॉर्म माहितेय का ?

BPO चे फायदे :

1. BPO कडे काही कामं आऊटसोर्सिंग केल्यामुळे ते काम करण्यासाठी एक्सपर्ट लोकं भेटतात.

2.  कंपन्यांना काही कामं आऊटसोर्सिंग केल्यामुळे मेन बिझनेसवर लक्ष केंद्रित करता येतं.

3. बिझनेस करताना काही खर्चात कपात करता येते त्यामुळे कमाई आपोआपच वाढते.

4. बिझनेसमध्ये कामाचा स्पीड आणि कार्यक्षमता वाढवता येते.

5. BPO कंपनी जगाच्या कानाकोपऱ्यातील वेगवेगळ्या भाषेतील कस्टमर्सना सर्व्हिस देतात त्यामुळे कंपनीला जगभरात आपला बिझनेस करता येतो.

यासोबतच BPO चे काही नुकसानही आहेत :

1. कंपनीला आपलं काम आऊटसोर्स केलेल्या BPO वर कामासाठी अवलंबून राहावं लागतं. त्यांच्या पद्धतीनेच कंपनीला आपलं काम करून घ्यावं लागतं.

2. अनेकदा कंपनी आणि BPO मध्ये कामाच्या बाबतीत बोलताना काही गैरसमज झाला तर त्याचा डायरेक्ट परिणाम हा कामावर होऊ शकतो.

3. BPO ला काम आऊटसोर्स करताना काही खर्च हे ठरवलेले नसतात किंवा ते अचानक समोर येऊ शकतात त्यामुळे कधी कधी हे महागात पडू शकतं.

4. काम आऊटसोर्स करताना प्रोजेक्टबद्दल खूप महत्त्वाची माहिती BPO सोबत शेअर केली जाते त्यामुळे सिक्युरिटीचा विषय हा खूप महत्त्वाचा असतो.

मित्रांनो तुम्हाला हा आर्टिकल आवडला असेल तर आमचे दुसरे आर्टिकल सुद्धा नक्की वाचा. 

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top