Black Rice Farming सध्या शेती करणं हे सर्वात जिकिरचं काम बनलं आहे. आपला निसर्ग शेतकऱ्यांची साथ देत नाहीये. अवकाळी पाऊस असो किंवा दुष्काळ यामुळे शेती भरोशाची राहिली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान होतं.
शेतकऱ्यांनी आता लागवड करणाऱ्या पिकांचे नवीन पर्याय शोधलं पाहिजेत. अशा पिकांच्या लागवडीतून कमीत कमी मेहनतीत जास्तीत जास्त फायदा होऊ शकेल आणि शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारू शकेल.
म्हणूनचं आज आम्ही तुम्हाला अशा एका पिकाबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या लागवडीतून शेतकरी मालामाल होऊ शकतो. आता लवकरच मान्सून सुरू होणार आहे. पावसाळा सुरू झाला की, अनेक शेतकरी भात लागवडीला सुरुवात करतील.
Black Rice Farming
आपण सगळेचं रेषनच्या तांदळापासून बासमती पर्यंत तांदूळ पाहिले आहेत. 30 रुपये किलोपासून सुरू होणारा तांदळाचा भाव जास्तीत जास्त 150 रुपये किलोपर्यंत जातो. परंतु आज आम्ही तुम्हाला अशा तांदळाबद्दल सांगणार आहोत, ज्याची सुरुवातीची किंमत 250 रुपये किलो असते, तर 500 रुपये किलो पर्यंत या तांदळाचा भाव जातो.
हा तांदूळ आहे “काळा तांदूळ” म्हणजेचं “ब्लॅक राईस किंवा ब्लॅक पॅडी”. काळा रंगाचा हा तांदूळ (Black Rice Farming) शिजवल्यानंतर निळ्या रंगाचा होतो, म्हणूनच त्याला ब्लू राईसही म्हणतात. सर्वप्रथम चीनमध्ये या तांदळाची लागवड सुरू झाली. त्यानंतर ईशान्य भारतातील आसाम राज्यात याचे उत्पादन घ्यायला सुरुवात झाली आणि आता हळूहळू संपूर्ण देशात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि आपल्या महाराष्ट्रातसुद्धा या ब्लॅक राईस म्हणजेचं काळ्या तांदळाचे उत्पादन सुरू झालं आहे.
काळ्या तांदळाची लागवड
एका हेक्टरमध्ये या तांदळाचे Black Rice Farming उत्पादन घेतलं, तरी शेतकऱ्यांना लाखो रुपयांची कमाई होऊ शकते. ब्लॅक राईस हा शरीरासाठी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे तांदळाला चांगलीच मागणी आहे
या तांदळामध्ये कर्करोगविरोधी तत्व असतात. या तांदळात लोह, फायबर आणि प्रथिनेसुद्धा मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे जे लोक आरोग्याकडे विशेष लक्ष देतात. ज्यांना बजेटचा कोणताही प्रॉब्लेम नाहीये, ते लोक हा ब्लॅक राईसचं खातात.
250 रुपये किलो पासून या तांदळाची किंमत सुरु होते ते 500 रुपये किलोपर्यंत भाव जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना हा तांदूळ Black Rice Farming खूपच फायदेशीर ठरेल, यात शंका नाही. काळ्या तांदळाचं पीक 100 ते 120 दिवसांमध्ये तयार होतं. या तांदळाच्या रोपाची लांबी सामान्य तांदळाच्या रोपाएवढीचं असते. पण दाणे लांब असतात.
ही माहिती फायदेशीर वाटल्यास नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाचं नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीच वाचा.
खूप खूप धन्यवाद !