Bihar Laghu Udyami Yojana 2024
Bihar Laghu Udyami Yojana 2024 देशातील आणि राज्यातील प्रत्येक सरकारचं एकचं मुख्य उद्दिष्ट असतं आणि ते म्हणजे गरिबी हटवणे. देशातील जनता गरीब नसेल, त्यांच्याकडे पुरेसे पैसे असतील, तर ते त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करू शकतात. मग सरकारला इतर काही करण्याची गरजचं नाहीये. त्यामुळेचं आपल्या देशात गरिबी हटाव, असा नारा दिला जातो.
आज गरिबीमुळे लोकांच्या आयुष्यात अनेक समस्या आहेत. जसं की गरीब कुटुंबांना दोन वेळच्या अन्नाची भ्रांत पडते. त्यांना आरोग्य विषयक समस्यांसाठी पैसे नसल्यामुळे दवाखान्यात जाता येत नाही. आपल्या मुलांना चांगल्या शाळांमध्ये शिकवता येत नाही. आपला सामाजिक स्तर उंचावता येत नाही.
या सर्व समस्यांचं मूळ एकमेव आहे आणि ते म्हणजे गरिबी आणि जर ही समस्याचं मिटवून टाकली. तर इतर समस्या उत्पन्न होणार नाही. यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार गरिबी हटवण्यासाठी विविध मोहीमा राबवत असतं.
आता बिहार सरकारनेही अशीचं एक नवीन मोहीम हाती घेतली आहे. एक नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव आहे बिहार लघु उद्यमी योजना. मग ही बिहार लघु उद्यमी योजना नेमकी आहे तरी काय ? याBihar Laghu Udyami Yojana 2024 योजनेत लाभार्थ्यांना काय फायदा होईल ? या योजनेच्या पात्रता आणि अटी काय आहेत ? आज आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत.
बिहार लघु उद्यमी योजनेची सुरुवात कशी झाली
बिहार सरकारने काही महिन्यांपूर्वी राज्यात जातीय जनगणना केली होती. या जनगणने दरम्यानचं त्यांना समजलं की, संपूर्ण बिहारमध्ये 96 लाख अशी कुटुंब आहेत, ज्यांचं आर्थिक उत्पन्न खूप कमी आहे, ते गरीब आहेत. अशा कुटुंबांना जर दारिद्र रेषेच्यावर आणायचं असेल, त्यांची गरिबी दूर करायची असेल, तर त्यांना रोजगार मिळाला पाहिजे. हाताला काम मिळालं पाहिजे, हे बिहार सरकारच्या लक्षात आलं.
जी कुटुंब गरीब असतात, त्या कुटुंबांमध्ये लोकांना जास्त शिक्षण भेटलेलं नसतं. त्यामुळे त्यांना चांगल्या नोकऱ्या भेटण्याचीही शक्यता नसते. चांगल्या नोकऱ्या भेटल्या नाही, तर चांगला पगारही भेटत नाही आणि गरिबीही दूर होत नाही. त्यामुळेचं अशा कुटुंबांना जर एखादा उद्योग, एखादा व्यवसाय सुरू करून दिला, तर नक्कीचं ते चांगला रोजगार मिळवू शकतात. या गरिबीतून बाहेर येऊ शकतात. हे बिहार सरकारच्या लक्षात आलं आणि त्यांनी ही Bihar Laghu Udyami Yojana 2024 नवीन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
बिहार लघु उद्यमी योजनेचे लाभ
या Bihar Laghu Udyami Yojana 2024 योजनेअंतर्गत बिहार राज्यातील 96 लाख गरीब कुटुंबांना 2 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात येईल. या पैशांचा वापर त्यांनी एखादा लघु उद्योग सुरू करण्यासाठी करायचा आहे. एवढंच नाही तर बिहार सरकार त्यांना हा व्यवसाय सुरू करण्यासाठी ट्रेनिंग सुद्धा देईल.
म्हणजेचं एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी ज्या दोन सर्वात महत्त्वाच्या गरजा असतात, त्या बिहार सरकार पूर्ण करणार आहे. पहिली गरज म्हणजे भांडवल आणि दुसरी गरज म्हणजे जो व्यवसाय सुरू करायचा आहे, त्या व्यवसायाबद्दलचं ज्ञान ट्रेनिंग.
बिहार लघु उद्यमी योजनेच्या पात्रता आणि अटी
या Bihar Laghu Udyami Yojana 2024 योजनेत लाभार्थी होण्यासाठी बिहार सरकारने काही पात्रता आणि अटी आखून दिल्या आहेत. आपण त्या जाणून घेऊया.
1) या योजनेत अर्ज करण्यासाठी अर्जदाराचं वय 18 ते 50 वर्षांदरम्यान असावं.
2) अर्जदाराचं मासिक उत्पन्न 6000 रुपयांपेक्षा कमी असावं.
हेही वाचा : PM SHREE Yojana | PM श्री योजनेची संपूर्ण माहिती मराठीत
बिहार लघु उद्यमी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
या Bihar Laghu Udyami Yojana 2024 योजनेत अर्ज करण्यासाठी अर्जदाराने काही आवश्यक कागदपत्रे जमा करायची असतात. आपण त्यांची लिस्ट पाहूया.
1) अर्जदाराचं आधार कार्ड
2) अर्जदाराचा निवासी दाखला
3) अर्जदाराचं जाती प्रमाणपत्र
4) अर्जदाराचा मासिक उत्पन्नाचा दाखला
5) अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो
बिहार लघु उद्यमी योजनेसाठी अर्ज कसा करायचा
या Bihar Laghu Udyami Yojana 2024 योजनेत अर्ज करण्यासाठी बिहार सरकारने एक ऑनलाईन पोर्टल सुरू केलं आहे. या पोर्टलवर जाऊन अर्जदाराला त्याची संपूर्ण वैयक्तिक माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील. त्यानंतर अधिकाऱ्यांमार्फत या अर्जांची तपासणी केली जाईल आणि मग या योजनेसाठी अर्जदार लाभार्थी होईल.
बिहार लघु उद्यमी योजनेचे लाभ
आता आपण पाहूया की, या Bihar Laghu Udyami Yojana 2024 योजनेसाठी अर्ज स्वीकार झाल्यानंतर अर्जदाराला काय लाभ मिळतील.
1) एकदा का तुमचा अर्ज या योजनेसाठी स्वीकारला गेला. त्यानंतर दोन लाख रुपयांचा कर्ज मिळणं सुलभ होईल.
2) परंतु हे दोन लाख रुपये तुम्हाला एकाचं वेळेस नाही मिळणार. तर त्यासाठी तीन हप्ते केले गेले आहेत.
3) पहिला हप्ता दोन लाख रुपयांच्या 25% असेल. म्हणजेचं 50 हजार रुपये लाभार्थ्याला मिळतील.
4) लाभार्थी या 50 हजार रुपयांचा वापर कसा करतोय, यावर लक्ष ठेवण्यासाठी एक कमिटी तयार केली गेली आहे.
5) सरकारने या योजनेच्या लाभार्थ्यांना नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी काही व्यवसायांची लिस्ट सुचवली आहे, आपण ती पाहूया.
6) या योजनेसाठी अर्ज करताना तुम्ही कोणता व्यवसाय सुरू करणार आहात, त्याबद्दलची माहिती द्यावी लागणार आहे. सरकारने यासाठी काही ऑप्शन दिलेत, जसं की गव्हाचं पीठ, बेसन पीठ, फ्रुटच्या जेली, नूडल्स, पापड, मिठाई, यांसारख्या खाण्याच्या वस्तूंचे उत्पादन करणं.
7) त्याचबरोबर विविध प्रकारचे फर्निचर, सिमेंटच्या वस्तू, दरवाजे, खिडक्या आणि पीओपीचं सामान बनवण्याचा छोटासा कारखाना असे पर्याय उपलब्ध असतील.
8) या योजनेत लाभार्थी झाल्यानंतर अर्जदारास पन्नास हजार रुपये दिले जातील. त्याचबरोबर ट्रेनिंगही दिली जाईल आणि व्यवसाय सुरू करण्यास सांगितले जाईल.
9) सुरुवातीला मिळणारे 50 हजार रुपयांचं कर्ज राज्य सरकार 5 टक्के व्याज दराने देणार आहे.
10) एकदा का लाभार्थ्याचा व्यवसाय सुरू झाला आणि त्याने सुरुवातीला मिळालेलं पन्नास हजार रुपयांचा कर्ज परत केलं. मग त्याला उरलेल्या दोन लाखांपैकी 50% म्हणजे एक लाख रुपये कर्ज दिले जाईल. त्यानंतर उरलेल्या 50 हजारांचा तिसरा हप्ता दुसरा हप्ताचं कर्ज फेडल्यावर दिला जाईल.
11) लघु उद्योग पूर्णपणे यशस्वी झाला पाहिजे. यासाठी सरकारचं त्याकडे बारीक लक्ष असेल.
बिहार लघु उद्यमी योजनेचे महत्त्व
आपल्या देशात मागील अनेक वर्षांपासून गरिबी हटवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परंतु गरिबी हटवणं हे अजूनही शक्य झालेले नाहीये. गरीबी हटवणं हे काही सोपं काम नाहीये. कारण आपल्या देशातील लोकसंख्या आणि त्यातील गरिबांची संख्या ही लक्षणीय आहे.
सरकारने आजपर्यंत अशा अनेक योजना राबवल्या आहेत. जिथे गरिबांना मोफत धान्य किंवा दरमहा काही पैसे दिले जातात. परंतु एवढ्याशा मदतीने त्यांची गरिबी काही दूर होणार नाही. त्यासाठी त्यांना रोजगाराच्या, व्यवसायाच्या संधी मिळवून देणं खूप महत्त्वाचं आहे.
त्यामुळे बिहार सरकारने ही गरज ओळखून बिहारमध्ये ही योजना लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना नवीन उद्योग सुरू करण्यासाठी दोन लाख रुपयांपर्यंत भांडवल पुरवलं जाईल, ट्रेनिंगसुद्धा दिली जाईल. जेणेकरून त्यांची गरिबी दूर होण्यास मदत होईल.
या जगात कोणालाही गरीब राहण्याची इच्छा नसते. कारण गरिबीत अनेक अडचणींना तोंड द्यावा लागतं. परंतु या गरिबीतून बाहेर कसं यायचं, हाच प्रश्न सर्वांसमोर असतो. कधी कधी त्यांना त्या गरिबीतून बाहेर पडण्याचा मार्गही माहीत असतो. पण त्यासाठी लागणारा पैसा, भांडवल त्यांच्याकडे नसतं.
गरिबांना कोणतीही बँक कर्ज सुद्धा देत नाही. कोणी उसने पैसेही देत नाही. त्यामुळे त्यांना आपली स्वप्न पूर्ण करणं शक्य होत नाही आणि या गरिबीतून बाहेर पडता येत नाही. परंतु आता या बिहार सरकारच्या योजनेअंतर्गत त्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भांडवल मिळणार आहे. त्यामुळे गरीब नक्कीचं आपला व्यवसाय सुरू करून गरिबीच्या गर्तेतून बाहेर येतील, यात शंका नाही.
बिहार सरकारने सुरू केलेली ही बिहार लघु उद्यमी योजना खरचं खूप कौतुकास्पद आहे आणि देशातील इतर भागांमध्येसुद्धा अशी Bihar Laghu Udyami Yojana 2024 योजना सुरू व्हायला हवी. जेणेकरून ज्या कुटुंबांना आपला व्यवसाय सुरू करून गरिबीतून बाहेर यायचंय, त्यांना या योजनेचा लाभ मिळवता येईल.
Bihar Laghu Udyami Yojana 2024 FAQ बिहार लघु उद्यमी योजनेबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न
1) प्रश्न : बिहार लघु उद्यमी योजनेचे उद्दिष्ट काय आहे ?
उत्तर : ही योजना सुरू करण्यामागे बिहार सरकारचा उद्देश आहे की, राज्यातील 96 लाख गरीब कुटुंबांना दारिद्र रेषेखालून वर आणावे आणि त्यांची गरिबी दूर करावी.
2) प्रश्न : बिहार लघु उद्यमी योजनेचा लाभ काय आहे ?
उत्तर : या योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्तीला व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी दोन लाख रुपयांचं कर्ज देण्यात येईल.
3) प्रश्न : बिहार लघु उद्यमी योजनेत किती रुपयांचं कर्ज मिळतं ?
उत्तर : या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला दोन लाख रुपयांचं कर्ज दिले जातं. पण हे कर्ज तीन हप्त्यांमध्ये 25%, 50% आणि 25% या स्वरूपात दिले जाईल.
4) प्रश्न : बिहार लघु उद्यमी योजनेत कोण अर्ज करू शकतं ?
उत्तर : बिहार राज्यातील ज्या कुटुंबांचं मासिक उत्पन्न सहा हजार रुपयांपेक्षा कमी आहे, ते या योजनेत अर्ज करू शकतात.
5) प्रश्न : Bihar Laghu Udyami Yojana 2024 कधी सुरू करण्यात आली ?
उत्तर : ही योजना 2024 मध्ये बिहार सरकारने सुरू केली आहे.
तुमच्या मनात बिहार सरकारने सुरू केलेल्या या Bihar Laghu Udyami Yojana 2024 योजनेबद्दल आणखीन काही प्रश्न असतील, तर नक्कीचं कमेंट करून विचारा. आम्ही त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू आणि अशाच नवीन नवीन योजनांबद्दल जाणून घेण्यासाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !