Bigg Boss OTT बिग बॉस ओटीटी हा कार्यक्रम नुकताचं सुरू झालाय. 21 जून रात्री 9 वाजता या कार्यक्रमाचा प्रीमियर झाला आणि आता सगळेजण या कार्यक्रमात कोण स्पर्धक आहेत, यावेळेस कार्यक्रमात रंगत येईल की नाही याबद्दल बोलताना दिसताय. परंतु या कार्यक्रमातील एका स्पर्धकाबद्दल मात्र सगळीकडेचं उत्सुकता आहे आणि या स्पर्धकाचं नाव आहे अरमान मलिक.
अरमान मलिक हा प्रसिद्ध youtuber आहे. परंतु त्याच्याबद्दलची खास गोष्ट म्हणजे तो चक्क त्याच्या दोन बायकांसोबत या कार्यक्रमात सहभागी झाला आहे. अरमान मलिकला दोन बायका आहेत. पायल मलिक आणि कृतिका मलिक.अरमानने पहिलं लग्न पायल मलिकशी केलं होतं. पण तिला घटस्फोट न देताचं त्याने कृतिका मलिकशी दुसरं लग्न केलं आणि आता या दोघींनाही मुलं आहेत.
Bigg Boss OTT
अरमान मलिकचं यूट्यूब चैनल या दोन बायका, त्यांची प्रेग्नेंसी, त्यांची मुलं आणि त्यांच्या आयुष्यातील विविध घडामोडी यांच्या बळावर जास्त चालतं आणि आता त्याच्या याच लोकप्रियतेच्या आधारावर त्याला बिग बॉस ओटीटीमध्येही स्थान मिळालंय.
एका घरात एका माणसाबरोबर दोन बायका कधीचं राहू शकत नाही. त्यांच्यात नेहमी भांडण होतात, असं म्हटलं जातं. परंतु अरमान मलिकच्या दोन बायका गुण्यागोविंदाने एकत्र नांदतात. पण आता बिग बॉसच्या घरात चांगल्या चांगल्या लोकांमध्ये भांडण होत असतात. मग आरमान मलिकच्या दोन बायका गुण्यागोविंदाने नांदतील की घरामध्ये महाभारत होईल, हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल.
तारक मेहताचा गोली सोडणार मालिका
त्याच्या बिग बॉस ओटीटीमध्ये एंट्रीनंतर अनेक लोक याबद्दल कमेंट करत आहेत. विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. अनेक सेलिब्रिटी सुद्धा याबद्दल बोलताना आढळतात. प्रसिद्ध अभिनेता करण कुंद्राने सुद्धा सोशल मीडियावर याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे आणि म्हटलं आहे की, लोकांना एक सांभाळता येत नाही आणि अरमान मलिकने दोन दोन लग्न केले आहेत. आता या घरात काय होतं, ते पाहणं खूपचं उत्सुकतेचं असेल.
करण कुंद्राच्या मते तर आता या दोन बायकांमुळे घरामध्ये मोठ महाभारत होईल, यात शंका नाही. तर तुम्ही सुद्धा अरमान मलिक आणि त्याच्या दोन बायकांची केमिस्ट्री पाहायला उत्सुक आहात ना. नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाचं नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !