Bhauji Mehuni Marathi Story प्रज्ञा दिसायला खूपचं सुंदर होती आणि ती एक चांगल्या पगाराची नोकरीही करत होती. तिच्या आई-बाबांना आता तिच्या लग्नाचे वेध लागले होते. त्यांनी तिला अनेक स्थळ दाखवली. अनेक सुंदर मुलं, मोठ्या पगाराची नोकरी असणारी मुलंसुद्धा तिला चालून येत होती. परंतु एकानंतर एक ती सर्व स्थळांना नकार द्यायची.
मुलांना नकार देण्याची तिची कारणं सुद्धा अजबचं राहायची. या मुलाच्या डोक्यावर केस नाहीयेत, तर या मुलाचं नाकचं मोठं आहे. Bhauji Mehuni Marathi Story असे एक ना अनेक कारणं ती द्यायची. त्यामुळे प्रज्ञाचे आई बाबा आणि प्रज्ञाची मोठी बहीण नलिनी या सर्वांनाचं तिची खूप काळजी वाटत होती.
Bhauji Mehuni Marathi Story
नलिनीला अजून एका गोष्टीची खूप काळजी वाटू लागली होती. कारण जेव्हापासून प्रज्ञाला लग्नाची स्थळ दाखवायला सुरुवात केली, तेव्हापासून ती तिच्या भाऊजींशी म्हणजेचं नलिनीच्या नवऱ्याशी विकासशी सतत बोलत राहायची.
हे दोघे तासनतास फोनवर बोलायचे. त्यामुळे नलिनीला संशय आला की, नक्की या दोघांचं काय चाललंय ? हे दोघे एकमेकांशी फोनवर का बोलताय ? हा प्रश्न तिला नेहमी पडायचा. Bhauji Mehuni Marathi Story परंतु आपल्या बहिणीवर आणि नवऱ्यावर संशय घ्यायचा नाही, त्यामुळे ती काही बोलली नव्हती.
परंतु एक दिवस तिला रहावलं गेलं नाही आणि तिने विकासला विचारलं “काय झालं अहो, तुम्ही प्रज्ञाशी फोनवर का नेहमी बोलत असतात ? असं कोणत्या महत्त्वाच्या विषयावर तुमचं बोलणं सुरू आहे ?
जेव्हा जेव्हा तिला एखाद्या लग्नाचं स्थळ येतं तेव्हा ती लग्नाला नकार देते आणि तुम्हाला फोन करते. Bhauji Mehuni Marathi Story मी खूप दिवसांपासून हे पाहतेय. काय चालू आहे तुमचं, खरं खरं सांगा मला ?”
विकास म्हणतो, “हे काय बोलतेस तू नलिनी ? प्रज्ञा ही माझ्या छोट्या बहिणीसारखी आहे. तू आमच्यावर हा संशय घेतेस, Bhauji Mehuni Marathi Story लाज नाही का वाटत तुला ? मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती.”
विकास असं बोलतोय, त्यामुळे नलिनीची बोलतीच बंद होते आणि ती ठरवते की, विकासशी बोलून फायदा नाही. आता प्रज्ञालाचं याबद्दलचा जाब विचारायचा.
दुसऱ्या दिवशी नलिनी आपल्या आई-बाबांच्या घरी येते आणि आई-बाबांसमोरच ती प्रज्ञाला जाब विचारते की, “प्रज्ञा मागील अनेक दिवसांपासून तू तुझ्या भाऊजींशी फोनवर बोलत असतेस. Bhauji Mehuni Marathi Story तासंतास तुमच्या गप्पा सुरू असतात. काय चालू आहे तुमचं ?”
प्रज्ञा म्हणते, “ताई हे काय बोलतेस तू ? भावजी तर मला मोठ्या भावासारखे आहेत आणि तू आमच्यावर संशय घेतेस का ? मला खूप वाईट वाटलं तू असा विचार केला आमच्याबद्दल.”
नलिनी म्हणते, “वा प्रज्ञा वा. दोघांनी उत्तर सुद्धा सारखीच पाठ करून ठेवली होती. तुम्हाला माहीत होतं, आज ना उद्या आपलं सत्य सगळ्यांसमोर येणार आहे. त्यामुळे काय सांगायचं, काय बोलायचं, हे सुद्धा ठरवून ठेवलं होतं का ? Bhauji Mehuni Marathi Story काल मी त्यांना विचारलं, तर ते सुद्धा मला असंच म्हणाले की, प्रज्ञा माझ्या छोट्या बहिणीसारखी आहे आणि हे तू काय बोलतेस. आज तू सुद्धा हेचं म्हणतेस की, ते माझ्या मोठ्या भावासारखे आहेत.”
प्रज्ञा म्हणते, “ताई आम्ही सारखं बोललो, कारण आमचे एकमेकांबद्दलचे विचार हे सारखे आहेत. आम्ही एकमेकांना भाऊ बहिणीच्या नात्याने पाहतो, म्हणून असं बोललो. Bhauji Mehuni Marathi Story आता तू आमच्या बोलण्यावरही संशय घेणार आहेस का ?”
नलिनी म्हणते, “ठीक आहे. नाही संशय घेत तुमच्यावर. परंतु मला खरं खरं सांग. तू तासनतास त्यांच्याशी काय गप्पा मारतेस ? असा कोणता विषय होतो तुमच्यामध्ये ?”
प्रज्ञा म्हणते, “ताई मी तुला नाही सांगू शकत.” नलिनी खूप चिडते आणि विचारते, “का नाही सांगू शकत ? खरं सांग मला.” Bhauji Mehuni Marathi Story प्रज्ञा ओरडून म्हणते, “एकदा सांगितलेलं कळत नाही का तुला, नाही सांगू शकत मी.” नलिनीला खूप राग येतो आणि ती चक्क प्रज्ञाच्या थोबाडीत मारते.
नलिनीचे आई-बाबा घाबरतात आणि म्हणतात, “नलिनी हे काय करतेस ? मोठी झालीय ती आता. आपण तिला प्रेमाने विचारूया, सांगेल की सगळं खरं खरं.” Bhauji Mehuni Marathi Story तेवढ्यात विकास तेथे येतो आणि म्हणतो, “आई बाबा, मी सांगतो सगळ. आज या नलिनीच्या मनातील संशय तरी दूर करतो.”
विकासला पाहून प्रज्ञा म्हणते, “नाही भाऊजी, तुम्ही यांना काही सत्य सांगू नका. त्यांना जे समजायचं ते समजू द्या.” विकास म्हणतो, “प्रज्ञा ते आपल्यावर संशय घेताय आणि हा संशय दिवसेंदिवस असाचं वाढत जाईल. आपण त्यांना सगळं खरं खरं सांगून टाकूया.”
नलिनी चिडून म्हणते, “हो सांगा ना. आता जे केलंय ते सांगण्याची हिंमत सुद्धा ठेवा.” विकास म्हणतो, “जास्त बोलू नकोस, नाहीतर तुलाचं नंतर पश्चाताप होईल. नलिनी तू जसं समजतेस, तसं आमच्या दोघांमध्ये काहीही नाहीये आमच्या दोघांमध्ये काही नाहीये. Bhauji Mehuni Marathi Story आमच्या दोघांत खरंच भाऊ बहिणीचं नातं आहे. तुला खरं सांगायचं, तर मागील काही दिवसांपासून प्रज्ञा ही एकानंतर एक स्थळांना नकार देतेय, कारण तिला लग्नचं करायचं नाहीये.”
प्रज्ञाचे आई बाबा तिच्याकडे पाहतात. प्रज्ञा म्हणते, “हो आई बाबा. मला तुमच्यासाठी लग्न नाही करायचंय. या नलिनीताईला काय माहित आपल्या घरची परिस्थिती. Bhauji Mehuni Marathi Story ही तर लग्न करून तिच्या सासरी सुखी आहे. तिचा नवरा चांगले पैसे कमवतो. ती मजा करते. परंतु इकडे माहेरी काय सुरू आहे, तिला नाही माहित.”
नलिनी म्हणते, “प्रज्ञा मला सगळं माहिती आहे. आपल्या आई-बाबांची परिस्थिती गरिबीची आहे. परंतु त्यासाठी आपण आयुष्यभर तर घरी बसून नाही राहू शकत. Bhauji Mehuni Marathi Story मुलींना एक ना एक दिवस लग्न करावचं लागतं आणि सासरी जावंच लागतं.”
प्रज्ञा म्हणते, “हो ताई खरं आहे तुझं. परंतु एक मुलगा म्हणून आपणचं त्यांची मदत करायला हवी ना. मला माहित आहे, आपला समाज हा कधीही स्वीकार करणार नाही की, लग्नानंतर सुद्धा मी माझा पगार माझ्या आई-बाबांना देऊ शकते. Bhauji Mehuni Marathi Story त्यामुळे मी असं ठरवलं की, मी लग्नचं करणार नाही.”
विकास म्हणतो, “प्रज्ञा त्यासाठीचं मला फोन करायची आणि मला सांगायची की, भाऊजी मला लग्न नाही करायचं. तुम्ही माझ्या आई-बाबांना आणि ताईला समजावून सांगा. तेव्हा मीच तिला म्हणायचो, असा वेडेपणा करू नकोस. Bhauji Mehuni Marathi Story तू लग्न कर, सेटल हो. हवं तर मी आई-बाबांना मदत करेल. ते माझेही आई बाबा आहेतचं ना.
मागील काही काळामध्ये तिच्या नव्या नोकरीबद्दलसुद्धा आमचं डिस्कशन सुरू होतं. मी तिला गाईड करत होतो. तू जसं समजतेस नलिनी, तसं आमच्यामध्ये काहीही नाहीये
आणि कदाचित तुझा आमच्यावर विश्वास नाही बसणार. Bhauji Mehuni Marathi Story तुला हवं असेल, तर हे पहा मागील महिन्याभरातील आमच्या दोघांचे कॉल रेकॉर्ड. हव तर सगळं ऐक, मगचं तुझा निर्णय घे.”
विकास आणि प्रज्ञाने जे काही सांगितलंय, ते नलिनीला पटतं. तिच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती म्हणते, “खरंचं माफ करा मला. मी तुमच्या दोघांवर संशय घेतला. Bhauji Mehuni Marathi Story तुम्ही माझ्या आई-बाबांचा विचार करत होते, त्यांच्या भविष्याचा विचार करत होते आणि मी तुमच्याबद्दल असा घाणेरडा विचार केला. यानंतर मी असं कधीही करणार नाही.”
प्रज्ञा नलिनीला म्हणते, “जाऊ दे ताई, रडू नको. तुझ्या जागी दुसरं कोणीही असतं, तर त्याला असा संशय आलाचं असता. आम्ही तुला आधी विश्वासात घ्यायला हवं होतं.”
नलिनी म्हणते, “प्रज्ञा तू जो निर्णय घेतलाय, तो चुकीचा घेतला आहेस. तू लग्न टाळू नकोस. लग्न कर. आमची परिस्थिती चांगली आहे, Bhauji Mehuni Marathi Story आम्ही आई-बाबांचा सांभाळ करू. तुलाही समजूतदार नवरा आणि सासर भेटलं, तर तुम्ही त्यांना मदत करू शकतेस.
आपण दोघी मुली मिळून आपल्या आई-बाबांचा मुलगा होऊ. त्यांना आयुष्यभराची साथ देऊ, आधार देऊ.” प्रज्ञा आणि नलिनी एकमेकांचा हात हातात घेतात. विकाससुद्धा त्यांचा हात धरतो आणि म्हणतो, Bhauji Mehuni Marathi Story “मी आहे तुमच्याबरोबर.” आपल्या मुली आणि आपले जावईबापू हे किती चांगले आहेत, समजदार आहेत, हे पाहून आई-बाबांनाही खूप आनंद होतो.
तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला आजची कथा, नक्कीचं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि अशाचं नवीन नवीन कथांसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !