पानटपरीवाला भाऊ कदम कसा बनला कॉमेडीचा बादशहा

भाऊ कदम कसा बनला कॉमेडीचा बादशहा

भाऊ कदम कसा बनला कॉमेडीचा बादशहा. भाऊ कदम हे नाव आज सगळ्यांच्या ओळखीचं बनलं आहे. कॉमेडी जगतात आज भाऊ कदमचं मोठं नाव आहे. भाऊ कदमचे आज जगभरात लाखों करोडो चाहते आहेत. प्रत्येक मराठी माणसाला भाऊ कदम आपल्यातलाच वाटतो अगदी हक्काचा वाटतो.

भाऊ कदमच्या चेहऱ्यावर नेहमी एक स्मितहास्य असते आणि तो लहानपणापासून अगदी शांत आणि कमी बोलणारा आहे. आज एवढा मोठा कॉमेडी स्टार होऊनही त्याचे पाय अजूनही जमिनीवर आहेत. त्याच्या याच साधेपणाचे असंख्य चाहते आहेत.

भाऊ कदम कसा बनला कॉमेडीचा बादशहा

फु बाई फु आणि चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातील त्याची जबरदस्त कॉमेडी लोकांना खुप आवडली.

पण भाऊ कदम कसा बनला कॉमेडीचा बादशहा. आज यशाच्या शिखरावर असणारा आपला भाऊ कदम कधीकाळी खूपच कष्टात जीवन जगत होता. त्याने अत्यंत मेहनतीने आपलं आयुष्य बदललंय पण इथपर्यंत येण्याचा मार्ग काही सोपा नव्हता.

Bhau Kadam's Daughter Become New Crush Of Maharashtra

भाऊ कदमची स्ट्रगल स्टोरी  

भाऊ कदमचं लहानपण मुंबईतील वडाळा येथील चाळीत गेलं त्याचं पूर्ण नाव भालचंद्र पांडुरंग कदम आहे. 12 जून 1972 साली त्याचा जन्म झाला. लहानपणापासून भाऊ कदम खूप शांत स्वभावाचा आणि कमी बोलणारा आहे.

तो लहान असतानाच त्याच्या वडिलांचं अचानक निधन झालं तेव्हा त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला. त्यानंतर तो आपल्या फॅमिलीसह डोंबिवलीत राहायला लागला.

कुटुंबाची जवाबदारी त्याच्यावर होती त्यामुळे तो पैसे कमावण्यासाठी मतदार मोजणीचे काम करू लागला पण पुरेसे पैसे मिळत नसल्यामुळे त्याने भावाच्या मदतीने पानाची टपरी सुरू केली.

Bhau Kadam's Daughter Become New Crush Of Maharashtra

Bhau Kadam Struggle Story  

भाऊ कदमला (भाऊ कदम कसा बनला कॉमेडीचा बादशहा) आधीपासूनच अभिनयाची आवड होती. मतदार मोजणीचे काम आणि पानटपरी सोबतच तो अभिनयाची आवडसुद्धा जोपासत होता. त्याकाळी तो नाटकांमध्ये अभिनय करायचा. अभिनयक्षेत्रातील अनेक लोकांची त्याच्याशी ओळख होती.

भाऊच्या नाटकातील कामामुळेच त्याला फु बाई फु या कॉमेडी शोमध्ये काम करण्याची ऑफर आली पण आपल्याला हे काम जमणार नाही असा विचार करून त्याने दोनदा नकार दिला पण तिसऱ्यांदा ऑफर आल्यानंतर भाऊने ऑफर स्वीकारली आणि होकार कळवला.

फु बाई फु या कॉमेडी कार्यक्रमात भाऊने खूप छान काम केलं आणि शोचा विनरसुद्धा बनला. त्यानंतर त्याला चला हवा येऊ द्या कार्यक्रमात सुद्धा काम करण्यासाठी विचारण्यात आलं. तेव्हापासून तो चला हवा येऊ द्या या शोमध्ये काम करतोय.

अमित भानुशाली दिसणार या प्रसिद्ध कार्यक्रमात

भाऊच्या फॅमिलीमध्ये त्याची पत्नी ममता आणि त्यांची तीन मुली आणि एक मुलगा आहे.

Bhau Kadam's Daughter Become New Crush Of Maharashtra

कॉमेडी शोसोबतच भाऊ कदमने टाईमपास, पांडू, नशीबवान, बाळकडू, नारबाची वाडी, कोकणस्थ, मिसमॅच यासारख्या अनेक चित्रपटात काम केलंय.

भाऊ कदमच्या कॉमेडीमुळे सर्वजण आपापल्या आयुष्यातील दुःख काही वेळासाठी का होईना विसरून मनापासून आनंदी होतात त्यामुळे सगळे त्याचे खूप मोठे फॅन आहेत.

मित्रांनो तुम्हाला हा आर्टिकल आवडला असेल तर आमचे दुसरे आर्टिकलसुद्धा नक्की वाचा. 

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top