पुरुषांचे तीन गुण. मुलींना कसं इम्प्रेस करायचं याबद्दल अनेक तरुण विचार करत असतात. मग त्यासाठी आपण किती छान दिसतो. आपली हेअर स्टाईल कशी आहे ? आपल्याकडे किती पैसा आहे ? कोणती गाडी आहे ? माझी पर्सनॅलिटी कशी आहे ? आपले कपडे कसे आहेत ? या सगळ्या गोष्टींकडे मुलं लक्ष देत असतात.
पुरुषांचे तीन गुण
परंतु भारताच्या इतिहासातील सर्वात हुशार व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे आचार्य चाणक्य यांच्या मते स्त्रियांना पुरुषांमधील या कोणत्याही गोष्टी आवडत नाहीत किंवा त्या गोष्टी पाहून त्या पुरुषांकडे आकर्षित होत नाही. तर त्यांना पुरुषांमध्ये या तीन गोष्टीचा शोध असतो.
मग कोणत्या आहेत या तीन गोष्टी ? पुरुषांचे तीन गुण कोणते आहेत, जे महिलांना सर्वात जास्त आकर्षित करतात. आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत.
महिला जेव्हा त्यांच्या आयुष्याच्या जोडीदाराची निवड करतात. तेव्हा त्या पुरुषाची सुंदरता न पाहता त्यांचं मन पुरुषांचे तीन गुण पाहतात. पुरुष किती इमानदार आहे, तो किती मेहनती आहे. या दोन गोष्टी स्त्रियांना त्यांच्याकडे सर्वात जास्त आकर्षित करतात. कारण या दोन गुणांमुळेचं पुरुष यशस्वी होणार असतात आणि स्त्रियांच्या सर्व इच्छा पूर्ण करू शकतात.
हे तर झाले दोन गुण. पण तिसरा गुण हा सर्वात महत्त्वाचा आहे. जो स्त्रियांना हवाचं असतो आणि तो म्हणजे त्यांच्या आयुष्याचा जीवन साथी चांगला श्रोता असायला हवा. आपल्या सर्वांना माहिती आहे की, स्त्रियांना बडबड करण्याची किती सवय असते. परंतु त्या कितीही बोलत असल्या, तरी आपल्या मनातील गोष्ट त्या फक्त आपल्या साथीदाराला सांगतात. त्यामुळे आपला जीवनसाथी फार चांगला श्रोता असायला हवा. त्याने माझं ऐकून घ्यायला हवं, अशी प्रत्येक स्त्रीची इच्छा असते.
आणि जे पुरुष त्यांच्या मनातलं ऐकून घेतात. चांगले श्रोते असतात, ते पुरुष स्त्रियांना आकर्षित करतात. म्हणजे एकूणचं स्त्रियांना आकर्षित करण्यासाठी तुम्हाला जास्त पैशांची, महागड्या वस्तूंची गरज नाहीये. तर एक चांगला व्यक्ती होण्याची गरज आहे. मेहनती, इमानदार आणि समोरच्याचं ऐकून घेण्याची गरज आहे.
सर तुम्हाला काय वाटते याबद्दल ? नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाचं नवीन नवीन आणि इंटरेस्टिंग माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !