Best Places To Visit Near Pune In Monsoon पुण्याजवळील पावसाळी पर्यटन स्थळे

Best Places To Visit Near Pune In Monsoon

Best Places To Visit Near Pune In Monsoon. आपण सगळे ज्या दिवसाची वाट पाहत होतो, शेवटी ते पावसाळ्याचे सुरेख दिवस आले आहेत. रणरणत्या उन्हापासून, अंगाची लाही लाही करणाऱ्या उष्णतेपासून, सर्वांना सुटका हवी होती आणि मान्सून महाराष्ट्रासह संपूर्ण देशामध्ये दाखल झालाय.

कालपर्यंत जेथे सगळीकडे रुक्ष वातावरण होतं, आता तेथे हिरवाईने नटलेला परिसर दिसतोय. म्हणूनचं आता पावसाळ्यात कोठे फिरायला जायचं ? एक दिवसाची पिकनिक कोठे करायची ? याबद्दल सगळेचं विचार करताय. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी पुण्याजवळ फिरण्यासाठी काही हिल स्टेशनचे ऑप्शन घेऊन आलो आहोत. तर चला याबद्दलची माहिती जाणून घेऊया.

Best Places To Visit Near Pune In Monsoon

लोणावळा : महाराष्ट्रात थंड हवेचे ठिकाण म्हटलं की, लोणावळा हे नाव सगळ्यात आधी समोर येतं. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं लोणावळा हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आवडतं हिल स्टेशन आहे आणि पावसाळ्यात तर लोणावळ्याचं सौंदर्य आणखीनचं वाढतं. लोहगडसारखा किल्ला, भुशी डॅमसारखं धरण आणि धबधबे, डोंगर माथे हे पावसाळ्यात आणखीन सुंदर दिसतात आणि पर्यटकांना आकर्षित करतात. पुण्यापासून फक्त 65 किलोमीटर अंतरावर असलेलं लोणावळा पुणेकरांना पावसाळ्यातचं नाही, तर संपूर्ण वर्षभर वर्षभर खुणावत असतं.

Best Places To Visit Near Pune In Monsoon
Best Places To Visit Near Pune In Monsoon

महाबळेश्वर : लोणावळ्याचं नाव घेतलं आणि महाबळेश्वरचं नाव आलं नाही, मग असंच होईल की जयचं नाव घेतलं आणि वीरूचं नाही. पुण्यापासून 120 किलोमीटर अंतरावर असलेलं महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील असंख्य नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी हॉट हनिमून डेस्टिनेशनही आहे.

फक्त पावसाळ्यातचं नाही, तर संपूर्ण वर्षभर महाबळेश्वर पर्यटकांना आकर्षित करत असतं. दऱ्या डोंगरांनी नटलेलं महाबळेश्वर, पुरातन सुंदर महाबळेश्वर मंदिर असलेलं महाबळेश्वर, स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध असलेलं महाबळेश्वर, आणि प्रतापगड किल्ल्यासाठी प्रसिद्ध असलेलं महाबळेश्वर. महाबळेश्वरचं जेवढ वर्णन करावं तेवढं कमीच, त्यामुळे या पावसाळ्यात तुम्ही महाबळेश्वरला नक्की भेट द्या.

Best Places To Visit Near Pune In Monsoon
Best Places To Visit Near Pune In Monsoon

खंडाळा : या लिस्टमध्ये शेवटचा नंबर लागतो पुण्यापासून 70 किलोमीटर अंतरावर असलेल्या खंडाळ्याचा. पावसाळ्यात खंडाळ्याचं निसर्ग सौंदर्य आणखीनचं वाढतं. दऱ्या डोंगर, व्ह्यू पॉईंट यांसाठी प्रसिद्ध असलेलं खंडाळा ट्रॅकर्ससाठी सुद्धा स्वर्ग आहे.

Best Places To Visit Near Pune In Monsoon
Best Places To Visit Near Pune In Monsoon

पावसाळ्यात पुण्याजवळ फिरण्यासाठी तलाव

तर या पावसाळ्यात तुम्हाला एखाद्या हिल स्टेशनला भेट द्यायची असेल आणि तुम्ही पुण्यात राहत असाल तर लोणावळा, खंडाळा आणि महाबळेश्वर हे तुमच्यासाठी अगदी योग्य पर्याय आहेत, एवढं मात्र नक्की.

तर तुम्ही कुठे जाणार नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाचं नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top