Besan Ladoo Recipe In Marathi | बेसन लाडू रेसिपी मराठी

Besan Ladoo Recipe In Marathi

Besan Ladoo Recipe In Marathi

Besan Ladoo Recipe In Marathi दिवाळीमध्ये आपल्या सर्वांच्या घरी मस्त फराळ बनवला जातो. फटाक्यांसोबतच सगळीकडे दिवाळीच्या फराळाची धामधूम असते. दिवाळीत जेवढं फटाक्यांना महत्त्व आहे तेवढंच फराळालाही महत्व असतं. या फराळात लाडू, करंजी, चिवडा, चकली, अनारसे, शंकरपाळे, शेव असे अनेक पदार्थ असतात पण सगळ्यात जास्त महत्व असतं ते म्हणजे लाडूंना.

दिवाळीच्या फरळात रव्याचे लाडू, बेसनाचे लाडू बनवले जातात पण सगळ्यात टेस्टी लागतात ते बेसनाचे लाडू. बेसनाच्या लाडूंची चवच काही वेगळी असते. बेसनाचे लाडू सगळ्यांचेच फेव्हरेट असतात. काहींना तर बेसनाचे लाडू इतके आवडतात की ते वर्षभरात कधीही हे लाडू बनवून खात असतात.

बेसनाचे लाडू बनवायला खूपच सोपे असतात आणि चवीलाही अतिशय टेस्टी असतात. बेसनाचे लाडू दिवाळीच्या फराळाची शान असतात आणि गोड खाल्ल्याशिवाय फराळाचा शेवट गोड कसा होणार. आज आम्ही तुमच्यासाठी दिवाळी स्पेशल बेसनाच्या लाडूंची स्पेशल Besan Ladoo Recipe In Marathi रेसिपी घेऊन आलो आहोत.

बेसन लाडू बनवण्यासाठी लागणारं साहित्य :

बेसनाचे लाडू Besan Ladoo Recipe In Marathi बनवण्यासाठी काय साहित्य लागतं ते आपण पाहूया.

  • 1 किलो बेसन
  • 500 मिली वितळलेलं तूप
  • 250 ग्रॅम बारीक रवा
  • 2 चमचे पाणी
  • थोडेशे काजूचे काप
  • 600 ग्रॅम पिठीसाखर
  • 1 छोटा चमचा वेलची पूड
  • थोडंसं जायफळ
  • थोडेसे कापलेले ड्रायफ्रुटस

बेसन लाडू बनवण्याची कृती :

  1. बेसनाचे लाडू Besan Ladoo Recipe In Marathi बनवण्यासाठी सर्वात आधी आपण बेसन भाजून घेणार आहोत. त्यासाठी एक पॅन गॅसवर ठेवायचा आणि त्यामध्ये बेसन टाकून द्यायचं. पॅन गरम करून घ्यायचा आणि गॅस मंद आचेवर ठेवायचा. 10 ते 12 मिनिटे हे कोरडंच बेसन भाजून घ्यायचं आहे. सलग आपल्याला हे बेसन हलवत भाजून घ्यायचंय.
  2. आपलं बेसन भाजून झालंय. आपल्याला हे बेसन तुपामध्ये भाजायचं नाही कारण आधी आपण तूप घेतलं आणि मग त्यात बेसन टाकलं तर बेसन तूप शोषून घेतं आणि खूप जड बनतं. मग आपण ते बेसन भाजायला जातो तर ते नीट भाजलं जात नाही आणि कच्चं राहतं. यामुळे बेसन कोरडंच 10 ते 12 मिनिटे भाजायचं आणि मग त्यात तूप टाकायचं.
  3. आता या बेसनात आपण घेतलेलं तूप अर्धचं घालणार आहोत. थोडं थोडं करून हे तूप घालून हे बेसन भाजणार आहोत. छान खरपूस रंग येईपर्यंत हे बेसन आपल्याला मंद गॅसवर भाजायचं आहे. सलग ढवळत आपल्याला हे बेसन भाजायचंय. तूप बेसनात छान मिक्स झालंय आता उरलेलं तूपसुद्धा यामध्ये घालूया. हे छान मिक्स करून घेऊया.
  4. तुम्ही बघू शकता सुरुवातीला बेसन सगळं तूप शोषून घेईल आणि नंतर हळूहळू तूप सुटायला लागेल. हे मिश्रण सलग ढवळत राहायचं. त्यानंतर तूप सुटायला लागेल. हे ढवळत राहायचं मग काही वेळाने हे बेसन पुन्हा घट्ट होईल. साधारण हे बेसन परतून 30 मिनिटे झाली आहेत.
  5. आता बेसनामध्ये 2 चमचे तूप घालायचंय आणि मिक्स करून घ्यायचं. आपलं बेसन छान भाजलं गेलंय. यामध्ये आपण घेतलेला बारीक रवा घालायचा आणि छान मिक्स करून घ्यायचं. हे मिश्रण पुन्हा 10 ते 12 मिनिटे भाजून घ्यायचंय.
  6. सुरुवातीचे 10 ते 12 मिनिटे बेसन कोरडं भाजायचं त्यानंतर 20 मिनिटे तूप घालून भाजायचं आणि शेवटचे 10 ते 15 मिनिटे रवा घालून भाजायचं. आपल्या बेसनाला छान खरपूस रंग आलाय. एकूण 45 मिनिटे आपण हे बेसन आणि रवा भाजलाय. आता गॅस बंद करायचा. आपलं बेसन आणि रवा खरपूस भाजलं गेलंय. त्याचा रंगही बदलला आहे. गॅस बंद केल्यावरही बेसन ढवळत राहायचं कारण कढई गरम आहे तर ते जळून जाऊ शकतं.
  7. आता यामध्ये 2 चमचे पाणी घालायचं आणि हे ढवळत राहायचं. पाणी टाकल्यामुळे बेसन छान फुलतं आणि लाडू खाताना टाळूला चिकटत नाही त्यामुळे हे काम तुम्हाला नक्की करायचंय. यामध्ये तुम्ही दूध वापरू शकता पण दुधामुळे लाडू लवकर खराब होण्याची भीती आहे त्यामुळे आपण पाणी वापरलंय मग आपले लाडू 20 ते 25 दिवस मस्त टिकतात.
  8. आता या मिश्रणात काजूचे काप घालायचे. यामध्ये तुम्ही काजूची पावडरसुद्धा घालू शकता पण लाडू खाताना काजूचे काप खूप छान लागतात त्यामुळे आपण हेच वापरले. हे छान मिक्स केल्यानंतर एका ताटामध्ये काढून घ्यायचं. हे मिश्रण आपल्याला एकदम थंड करून घ्यायचंय. त्यासाठी 30 ते 40 मिनिटे वेळ लागेल आपण वाट पाहूया.
  9. आपण पिठीसाखर तयार करून घेऊया. यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर टाकायची आणि थोडीशी वेलची पूड टाकायची. हे छान मिक्सरला फिरवून घ्यायचं आपली पिठीसाखर तयार आहे. आपण बेसन घेतलं त्याची निम्मी पिठीसाखर घालायची असं प्रमाण घ्यायचंय.
  10. आपलं मिश्रण थंड झालंय आता यामध्ये 1 छोटा चमचा वेलची पूड आणि थोडंसं जायफळ घालायचं. चनाडाळीचे पदार्थ जसे पुरणपोळी, बेसनाचे लाडू यामध्ये जायफळ टाकलं तर खूप छान चव लागते.
  11. यामध्ये आता पिठीसाखर घालायची. तुम्ही गोड हवं असेल तर पिठीसाखर कमी जास्त करू शकता. 1 किलो बेसनाला 600 ग्रॅम पिठीसाखर आपण घेतलीय. पिठीसाखर या मिश्रणात मिक्स करून घ्यायची. मिश्रण गार झाल्यावरच साखर त्यामध्ये मिक्स करायची नाहीतर आपले लाडू कडक होतील. आपल्याला लाडू हे पेढ्यासारखे सॉफ्ट बनवायचे आहेत त्यामुळे मिश्रण गार झाल्यावर त्यामध्ये आपण पिठीसाखर टाकलीय. हे आपलं छान मिक्स झालंय.
  12. आपल्याला हे मिश्रण बेसनामध्ये तूप छान मुरेपर्यंत तसंच ठेवायचंय. याला 5 ते 6 तास किंवा रात्रभर तसंच ठेवू शकता. पण तुम्हाला वेळ नसेल तर 20 ते 25 मिनिटे फ्रीजमध्येसुद्धा ठेवू शकता. आपण हे मिश्रण रात्रभर तसंच ठेवणार आहोत म्हणजे तूप बेसनामध्ये छान मुरेल आणि सकाळी लाडू वळून घ्यायचे.
  13. रात्रभर मिश्रण ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या बेसनामध्ये तूप छान मुरलं आहे. आता आपण एकेक करून याचे गोल आकाराचे लाडू वळून घेणार आहोत. हलक्या हाताने आपण हे लाडू वळून घेणार आहोत कारण यामध्ये तूप आहे आणि हाताच्या उष्णतेमुळे आपण लाडू वळू तसं याला तूप सुटतं त्यामुळे लाडूंचा आकार गोल राहण्यासाठी अगदी हलक्या हाताने लाडू वळायचे आहेत.
  14. अशाप्रकारे आपण सर्व लाडू वळून घेणार आहोत. यामध्ये आपण जाड बेसन वापरलेलं नाही आपलं नेहमीचं बेसन वापरलंय त्यामुळे रवासुद्धा घेतलाय. जर तुम्ही जाड बेसन वापरलं तर रवा घेण्याची गरज नाही.
  15. आपले लाडू तयार आहेत. लाडूंवर बदाम आणि पिस्त्याचे बारीक काप करून लावायचे आहेत. तुम्ही मनुका, काजू कुठलाही सुकामेवा लावू शकता. आपले लाडू दिसायलाही सुंदर आहेत आणि चवीलाही टेस्टी बनलेत.

Matar Paneer Recipe In Marathi | मटार पनीर रेसिपी मराठी

1-2 दिवसांनंतर छान तूप बेसनामध्ये मुरलं की आपल्या लाडूंची टेस्ट आणखीनच वाढते. आपले दिवाळीसाठी बेसनाचे लाडू तयार आहेत हे तुम्ही घरच्यांना खायला देऊ शकता.

Important Tips For Besan Ladoo Recipe In Marathi
  1. बेसन सुरुवातीला कोरडंच भाजून घ्यायचं ते तुपामध्ये भाजायचं नाही. कारण सुरुवातीला आपण तूप घेतलं आणि त्यामध्ये बेसन टाकलं तर बेसन तूप शोषून घेतं आणि खूप जड होतं. मग आपण हे बेसन भाजायला गेलं तर ते नीट भाजलं जात नाही कच्चं राहतं. बेसन भाजल्यानंतर त्यात तूप टाकायचं.
  2. बेसन भाजताना त्यात 2 चमचे पाणी टाकायचं म्हणजे बेसन छान फुलतं आणि लाडू खाताना टाळूला चिकटत नाही. लाडू 20 – 25 दिवसही टिकतात.
  3. बेसन थंड झाल्यावरच त्यात साखर टाकायची. गरम असताना साखर मिसळली तर लाडू कडक होतील.
  4. बेसनाचे लाडू वळताना हलक्या हाताने वळायचे कारण वळताना त्यातून तूप सुटतं आणि गोल आकार राहण्यासाठी ते हलक्या हाताने वळायचे.
  5. जाड बेसन वापरलं तर रवा नाही घेतला तरी चालेल. पण नॉर्मल बेसन घेतलं तर रवा वापरायचा.
  6. जर लाडूंमध्ये तूप जास्त झालं असेल तर त्यात काजूची पूड किंवा बदामाची पूड किंवा रवा भाजून घालू शकता. पण बेसन पुन्हा भाजून घालायचं नाही.

तुम्ही या सर्व टिप्स वापरून टेस्टी बेसनाचे लाडू Besan Ladoo Recipe In Marathi बनवू शकता.

FAQ’s About Besan Ladoo Recipe In Marathi
  1. Besan Ladoo Recipe In Marathi कसे बनवतात ?

बेसनाचे लाडू हे चवीला खूपच छान असतात. हे लाडू बेसनामध्ये वितळलेलं तूप, बारीक रवा, पिठीसाखर, काजू, ड्रायफ्रूटस टाकून बनवले जातात. दिवाळीच्या फराळामध्ये हे लाडू नेहमीच बनवले जातात.

  1. बेसनाचे लाडू किती दिवस टिकतील ?

आपण बनवलेले बेसनाचे लाडू Besan Ladoo Recipe In Marathi हे 20 ते 25 दिवस छान टिकतात. पण लाडू बनल्यानंतर ते पूर्णपणे थंड आणि कोरडे झाले की हवाबंद डब्यात ठेवून द्यायचे म्हणजे जास्त दिवससुद्धा टिकू शकतील.

  1. बेसन आरोग्यासाठी चांगलं आहे का ?

बेसन खाणं आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. बेसनमध्ये प्रोटीन आणि फायबर जास्त प्रमाणात असतं. बेसनमुळे पचन चांगलं होतं. डायबिटीजच्या पेशंटची साखर कमी होते. खराब कोलेस्टेरॉलची लेव्हल कमी करतं. आपलं वजन कमी करण्यास मदत करतं आणि हार्टची हेल्थ चांगलं ठेवतं.

  1. बेसन खाण्याचे साईड इफेक्ट काय आहे ?

बेसनामध्ये जास्त प्रमाणात फायबर असतं त्यामुळे खाण्यात फायबर वाढल्याने पोटात दुखणं आणि पोटात गॅस होऊ शकतो त्यामुळे बेसन कमी खायला हवं.

दिवाळीच्या फराळाचे स्पेशल बेसनाचे लाडू Besan Ladoo Recipe In Marathi आपले तयार आहेत. ते तुम्ही घरच्यांना खायला देऊ शकता. सर्वांना नक्कीच खूप आवडतील. दिवाळीचा आनंद या स्वादिष्ट बेसनाच्या लाडूंमुळे आणखीनच द्विगुणित होईल यात शंका नाही. तुम्ही ही बेसनाच्या लाडूंची Besan Ladoo Recipe In Marathi रेसिपी नक्कीच बनवून पहा.

तुम्हालासुद्धा ही Besan Ladoo Recipe In Marathi रेसिपी आवडली का नक्कीच सांगा. अशाच नवनवीन रेसिपी शिकण्यासाठी आमचे दुसरे आर्टिकलसुद्धा नक्कीच वाचा.

तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.  

Scroll to Top