Bajaj Pulsar NS400Z : बजाजने लाँच केली सर्वात शक्तिशाली पल्सर

Bajaj Pulsar NS400Z

Bajaj Pulsar NS400Z मागील अनेक वर्षांपासून बजाज पल्सर अनेक तरुणांच्या स्वप्नातील बाईक आहे. आयुष्यात एकदा तरी पल्सर विकत घ्यायची आणि मित्रांसमोर मिरवायची, असं प्रत्येक तरुणाचं स्वप्न असतं. बजाजच्या या बाईकला कल्ट स्टेटस मिळालंय एवढं मात्र नक्की.

बजाजने Pulsar 150,  Pulsar 200 अशा अनेक बाईक आजपर्यंत लॉन्च केल्या आहेत आणि आता बजाजने आजपर्यंतची त्यांची सर्वात पावरफुल पल्सर लॉन्च केलीये. या बाईकचं नाव आहे Bajaj Pulsar NS400Z .

Bajaj Pulsar NS400Z

याआधी बाजारात उपलब्ध असलेल्या Bajaj Pulsar 200NS पेक्षा ही बाईक थोडी वेगळी दिसते. आजपर्यंतची सर्वात मोठी आणि सर्वात पावरफुल पल्सर म्हणून या बाईकची जाहिरात केली गेलीये.

Pulsar NS400Z Price
Pulsar NS400Z Price

बजाजने या बाईकमध्ये 373 CC चं लिक्विड कुल्ड सिंगल सिलेंडर इंजिन दिलंय. जे जवळपास 40 BHP पावर जनरेट करतात. पावरफुल इंजिन बरोबरचं बजाजच्या या नवीन पल्सरमध्ये तुम्हाला अनेक धासु फिचर्स मिळतील.

Bajaj Pulsar NS400Z चे फीचर्स

या बाईकमध्ये तुम्हाला एलईडी हेडलाईट, ट्रॅक्शन कंट्रोल, एबीएस आणि ऍडजेस्टेबल लिव्हर्स मिळतील. फोर व्हीलरप्रमाणे तुम्हाला या बाईकमध्ये राईड मोडसुद्धा मिळतील. ही पल्सर चालवताना तुम्ही रोड, ऑफ रोड, रेन आणि स्पोर्ट या राईड मोडमध्ये स्विच करू शकतात.

Pulsar NS400Z Price
Pulsar NS400Z Price

या गाडीत तुम्हाला डिजिटल इन्स्ट्रुमेंटल क्लस्टर मिळेल. त्याचबरोबर ब्लुटूथ आणि वायफाय कनेक्टिव्हिटीही दिली गेली आहे. जिथे तुम्ही तुमचा मोबाईल कनेक्ट करू शकता आणि एका ॲपच्या मदतीने तुमची गाडी मोबाईलशी कनेक्टे होईल. जिथे तुम्हाला मिस कॉल, एसएमएस असे नोटिफिकेशन गाडीच्या इन्स्ट्रुमेंटल क्लस्टरवरचं पाहायला मिळतील. टर्न बाय टर्न जीपीएस नेव्हिगेशन तर आहेचं.

या आहेत भारतातील टॉप EV कार

एकूणचं बजाजची ही नवीन पल्सर सर्वगुणसंपन्न आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. जर तुम्ही सुद्धा बजाजची ही नवीन पल्सर विकत घेण्याचा विचार करत असाल. तरी ही बाईक तुमच्यासाठी अगदी योग्य आहे यात शंका नाही. आता तुम्ही विचाराल, या गाडीची किंमत किती आहे ? तर Bajaj Pulsar NS400Z ची एक्स शोरूम किंमत आहे 185000 रुपये.

मग तुम्ही विकत घेणार काही नवीन बजाज पल्सर ? नक्कीचं कमेंट करुन सांगा आणि अशाचं नवीन नवीन माहितीसाठी आमच्या इतर लेखही नक्की वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top