गायकावर कोसळला दुःखाचा डोंगर मराठी मनोरंजन विश्वातून एक खूपचं दुःखद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध संगीतकार आणि गायक अवधूत गुप्ते यांच्या आईचं दुःखद निधन झालंय. मिळालेल्या माहितीनुसार अवधूत गुप्ते यांच्या आईवर मुंबईतील होकार्ट हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. परंतु उपचारादरम्यानचं त्यांची प्राणज्योत मालवली.
मुंबईतील बोरिवलीमधील स्मशान घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सगळीकडेचं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अवधूत गुप्ते यांचे फॅन्स आणि मराठी सेलिब्रिटी त्यांच्या आईला श्रद्धांजली वाहताय.
गायकावर कोसळला दुःखाचा डोंगर
अवधूत गुप्ते आणि त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांना या दुःखाच्या वेळेत या संकटातून बाहेर येण्यासाठी परमेश्वर शक्ती देवो अशी सगळेजण प्रार्थना करताय.
अवधूत गुप्ते मराठीतील खूपचं नावाजलेले संगीतकार आहेत. त्यांनी अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांना संगीतबद्ध केलंय. त्याचबरोबर एक चांगले गायक म्हणून सुद्धा त्यांनी प्रसिद्धी मिळवली आहे. फक्त संगीत विश्वातचं नाही, तर दिग्दर्शन क्षेत्रात सुद्धा त्यांनी नाव कमावलंय. त्यांचा झेंडा हा चित्रपट खूप यशस्वी झाला होता.
श्रेया बुगडे दिसणार या नवीन रियालिटी शोमध्ये
त्याचबरोबर त्यांचा झी मराठीवरील कार्यक्रम खूपते तेथे गुप्ते सुद्धा चांगलाच गाजला होता. या कार्यक्रमात त्यांनी अनेक मान्यवरांना बोलावलेलं. मग ते मनोरंजन विश्वातील असो किंवा सामाजिक विश्वातील. विविध क्षेत्रातील मान्यवरांना त्यांनी त्यांच्या आयुष्याबद्दल प्रश्न विचारले आणि त्यांच्याकडून उत्तरं घेतली आणि हा शो चांगलाच व्हायरल झालेला.
सुर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणूनही त्यांनी उत्तम कामगिरी बजावली आहे. मराठी बरोबरचं काही हिंदी सिनेमांमध्ये सुद्धा त्यांनी गाणी गायली आहेत.
मनोरंजन विश्वाशी निगडित बातम्या जाणून घेण्यासाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !