Atal Pension Yojana 2024|अटल पेन्शन योजनेची संपूर्ण माहिती

Atal Pension Yojana 2024

Atal Pension Yojana 2024

Atal Pension Yojana 2024 पेन्शन म्हणजे काय ? तुम्ही जर एखादी सरकारी किंवा खाजगी नोकरी करत असाल आणि सेवानिवृत्ती घेतल्यानंतर तुम्हाला दर महिन्याला एक ठराविक रक्कम तुम्ही नोकरी करत असलेल्या संस्थेकडून मिळत असेल, तर त्याला पेन्शन असं म्हटलं जातं. या पेन्शनचा उपयोग तुम्ही सेवानिवृत्त झाल्यानंतर, काम करणं थांबल्यानंतर उतारवयात तुमच्या उदरनिर्वाहाची सोय व्हावी, तुमचं घर चालावं, यासाठी होत असतो.

आपल्या देशात मुख्यत्वे सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांनाचं पेन्शनचा लाभ मिळतो. काही काही प्रायव्हेट कंपन्याही पेन्शन देतात. परंतु त्यांचा आकडा खूपचं कमी आहे. त्यामुळे लोकांचा ओढा सरकारी नोकरीकडे जास्त आहे. कारण सरकारी नोकरीमध्ये जॉबचीही गॅरंटी असते, त्याचबरोबर सेवानिवृत्त म्हणजेचं रिटायर झाल्यानंतर पेन्शन मिळेल, ही शक्यता असते.

असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळत नाही

आता विचार करायला गेलं, तर मग तो सरकारी नोकर असो किंवा प्रायव्हेट कंपनीत काम करणारा माणूस किंवा स्वतःचा व्यवसाय असलेली व्यक्ती आणि असंघटित क्षेत्रात काम करणारी माणसं प्रत्येकालाचं एका ठराविक वयानंतर रिटायर व्हावं लागतं. शारीरिक अडचणीमुळे एका वयानंतर त्यांना काम करता येत नाही. मग रिटायरमेंटनंतर त्यांचं उरलेलं आयुष्य कसं चालेल ? त्यांचा खर्च कसा भागणार ? हा प्रश्न प्रत्येकालाचं असतो.

मग ज्या लोकांना पेन्शन मिळत नाही. त्या लोकांचं काय ? सेवानिवृत्त झाल्यानंतर, काम करणं थांबल्यानंतर त्यांचे दिवस कसे भागणार ? आता अशाच लोकांसाठी भारत सरकारने एक योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचे नाव आहे अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana 2024).

या Atal Pension Yojana 2024 योजनेअंतर्गत असंघटित क्षेत्रातील लोकांना दरमहा पेन्शन देण्याचं सरकारने ठरवलं आहे. मग ही अटल पेन्शन योजना नेमकी आहे तरी काय ? या योजनेसाठी काय पात्रता हवी ? अटल पेन्शन योजनेसाठी काय काय कागदपत्र लागतील ? किती गुंतवणूक करावी लागेल ? आज आपण त्याबद्दलचं जाणून घेणार आहोत.

अटल पेन्शन योजनेचे स्वरूप

2015 साली केलेल्या एका सर्वेक्षणानुसार भारतातील 11 टक्के लोकांना दरमहा पेन्शन मिळते. म्हणजेचं 89% लोकांना सेवानिवृत्तीनंतर त्यांनी काम करणं थांबवल्यानंतर कोणतीही पेन्शन मिळत नाही. मग त्यांचा खर्च कसा भागणार, हा खूप मोठा प्रश्न आहे.

या 89% लोकांना 60 वर्षानंतर दरमहा पेन्शन मिळावी, यासाठी भारत सरकारने अटल पेन्शन योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत जे लोक अर्ज करतील, त्यांना दरमहा एक ठराविक रक्कम गुंतवावी लागेल आणि मग वयाच्या साठ वर्षानंतर तुम्ही गुंतवलेल्या रकमेनुसार तुम्हाला 1 हजार दरमहा ते 5 हजार दरमहा अशी पेन्शन मिळेल.

हेही वाचा : Vishwakarma Yojana 2024 | प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची माहिती

सर्वात आधी तुम्हाला वयाच्या साठ वर्षानंतर किती रक्कम दरमहा पेन्शन म्हणून हवी आहे, ते निवडावं लागेल. उदाहरणार्थ तुम्हाला 1 हजार रुपये पेन्शन दरमहा हवी असेल, तर तुमच्या वयानुसार जेव्हा तुम्ही पहिल्यांदा या योजनेसाठी गुंतवणूक करताय, तुम्हाला दरमहा किती पैसे भरावे लागतील, ते ठरवलं जातं.

अटल पेन्शन योजनेत गुंतवणुकीसाठी अटी काय आहेत

1) या Atal Pension Yojana 2024 गुंतवणूक करणारी व्यक्ती भारतीय नागरिक असावी.

2) अर्जदाराचे वय 18 ते 40 वर्षे असावे.

3) अर्जदार व्यक्तीचं सरकारी बँकेत खातं असावं किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खातं असावं.

अटल पेन्शन योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

या Atal Pension Yojana 2024 योजनेसाठी अर्ज करताना तुमच्याकडे खालीलप्रमाणे कागदपत्र असणे आवश्यक आहे.

1) अर्जदाराचे आधार कार्ड

2) अर्जदाराचे बँक पासबुक

3) अर्जदाराचा मोबाईल नंबर आणि ईमेल ऍड्रेस

4) पासपोर्ट साईज फोटो

अटल पेन्शन योजनेची वैशिष्ट्ये

1) ही योजना असंघटित क्षेत्रातील कामगारांना मासिक पेन्शन देण्याचं काम करते.

2) अटल पेन्शन योजनेअंतर्गत तुम्हाला फक्त 20 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागते. त्यानंतर वयाच्या 60 वर्षानंतर तुम्हाला पेन्शन मिळते.

3) 1000 ते 5000 रुपये या दरम्यान मासिक पेन्शन निवडता येते व त्यानुसारचं गुंतवणूक करावी लागते. म्हणजे तुम्हाला तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसार मासिक भरण्याची निवड करता येईल आणि कोणतेही अतिरिक्त आर्थिक ओझे वाटणार नाही.

4) Atal Pension Yojana 2024 सरकारद्वारे सुरू केलेली असून यामध्ये बाजारातील कोणताही धोका संभवत नाही. तुम्ही गुंतवलेल्या रकमेवर तुम्हाला शंभर टक्के परतावा मिळणारचं अशी गॅरंटी आहे.

अटल पेन्शन योजनेसाठी अर्ज कसा करावा ?

1) या योजनेत अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी राष्ट्रीयकृत बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये अकाउंट ओपन करावं लागेल.

2) अकाउंट ओपन झाल्यानंतर तुम्ही याच बँकेतून अटल पेन्शन योजनेचा फॉर्म येऊ शकतात.

3) या फॉर्ममध्ये जी माहिती भरण्यास सांगितली आहे, ती माहिती भरल्यानंतर तुम्हाला आवश्यक कागदपत्र जोडावी लागतील. जसं की तुमचं आधार कार्ड आणि पासपोर्ट साईज फोटो.

4) माहिती भरलेला फॉर्म आणि कागदपत्र तुम्हाला तुमचं अकाउंट असलेल्या बँकेच्या शाखेत जमा करावी लागतील.

5) या अर्जाची पडताळणी झाल्यानंतर अटल पेन्शन योजनेचं अकाउंट ओपन होईल. हे पेन्शन अकाउंट तुमच्या बँक खात्याअंतर्गतचं असेल.

6) Atal Pension Yojana 2024 अकाउंट उघडल्यानंतर दरमहा तुम्हाला जी ठराविक रक्कम भरायची असेल, ती आपोआपचं तुमच्या अकाउंटमधून वजा केली जाईल. त्यामुळे तुम्ही बँक अकाउंटवर दरमहा तेवढी रक्कम असणे गरजेचे आहे, ही काळजी तुम्हाला घ्यावी लागेल.

7) जसं तुम्ही बँकेत किंवा पोस्टात जॉईंट अकाउंट उघडू शकता, म्हणजेच पती-पत्नीचं किंवा आई किंवा वडिलांपैकी एकाचं मुलाबरोबर मुलीबरोबर तसं तुम्ही अटल पेन्शन योजनेतही जॉईंट अकाउंट उघडू शकता.

8) (Atal Pension Yojana 2024) अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक केल्याचा आणखीन एक फायदा म्हणजे तुम्हाला आयकारात सूट मिळते. आयकर कलम 80C अंतर्गत तुम्ही आयकरात सूट मिळवण्यासाठी अर्ज करू शकता.

9) अटल पेन्शन योजनेच्या खातेदाराचा मृत्यू झाला, तर जमा झालेली रक्कम त्याच्या वारसदाराला मिळते.

अटल पेन्शन योजनेत किती पेन्शन दरमहा मिळेल

आता तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीचं आला असेल की, मला जर दरमहा 5 हजार रुपये पेन्शन मिळवायची असेल, तर दरमहा किती पैसे भरावे लागतील. आता आपण ते एका उदाहरणाद्वारे जाणून घेऊया.

1) उदाहरणार्थ जर तुमचं वय 18 वर्षे असेल आणि तुम्हाला दरमहा 5000 पेन्शन हवी असेल तर तुम्हाला दरमहा 210 रुपये पुढील 20 वर्षांसाठी भरावे लागतील.

2) जर तुमचं वय 25 वर्ष असेल आणि तुम्हाला दरमहा 5 हजार रुपये पेन्शन हवी असेल, तर तुम्हाला दरमहा 376 रुपये पुढील 20 वर्षांसाठी भरावे लागतील.

3) जर तुमचं वय 30 वर्ष असेल आणि तुम्हाला दरमहा 5 हजार रुपये पेन्शन हवी असेल, तर तुम्हाला दरमहा 577 रुपये पुढील 20 वर्षांसाठी भरावे लागतील.

4) जर तुमचं वय 35 वर्ष असेल आणि तुम्हाला दरमहा 5 हजार रुपये पेन्शन हवी असेल, तर तुम्हाला दरमहा 902 रुपये पुढील 20 वर्षांसाठी भरावे लागतील.

5) जर तुमचं वय 39 वर्ष असेल आणि तुम्हाला दरमहा 5 हजार रुपये पेन्शन हवी असेल, तर तुम्हाला दरमहा 1318 रुपये पुढील 20 वर्षांसाठी भरावे लागतील.

पंतप्रधान सुरक्षा विमा योजना

(Atal Pension Yojana 2024) अटल पेन्शन योजनेबरोबरचं भारत सरकारने गरिबांसाठी पंतप्रधान सुरक्षा विमा योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला दरमहा फक्त 1 रुपये म्हणजे एका वर्षात फक्त 12 रुपये भरून दोन लाख रुपयांचा अपघात विमा मिळतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय 18 ते 70 वर्ष असावं.

या योजनेअंतर्गत तुम्ही अर्ज केल्यास तुम्हाला एका वर्षात फक्त 12 रुपये भरायचे आहेत आणि अर्जदाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला वारसाला 2 लाख रुपये मिळतात.

ही योजना गरिबांसाठी खूपचं फायद्याची आहे, कारण विमा कंपन्यांचे प्रीमियम खूप महाग असतात. अशावेळेस भारत सरकारद्वारे राबवली जाणारी ही योजना अतिशय फायद्याची आणि उपयोगी आहे, यात शंका नाही.

FAQ About Atal Pension Yojana | अटल पेन्शन योजनेबाबत वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1) प्रश्न : अटल पेन्शन योजनेअंतर्गत दरमहा किती पेन्शन मिळते ?

उत्तर : या पेन्शन योजनेअंतर्गत तुम्ही दरमहा 1000 ते 5000 रुपये पेन्शन मिळवू शकतात.

2) प्रश्न : Atal Pension Yojana 2024 लाभ घेण्यासाठी दरमहा किती रुपये रक्कम जमा करावी लागेल ?

उत्तर : अर्ज करताना अर्जदाराचे वय आणि मासिक किती पेन्शन हवी आहे, यानुसार दरमहा भरायची रक्कम ठरवली जाते.

3) प्रश्न : अटल पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय किती असावं ?

उत्तर : या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय 18 ते 40 दरम्यान असावे.

4) प्रश्न : अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक केल्यास आयकरात सूट मिळते का ?

उत्तर : या Atal Pension Yojana 2024 योजनेत गुंतवणूक केल्यास आयकर कलम 80 C अंतर्गत आयकरात सूट मिळते.

5) प्रश्न : अटल पेन्शन योजनेत जॉईंट अकाउंट उघडता येते का ?

उत्तर : होय, या योजनेअंतर्गत तुम्ही पती-पत्नीचे जॉईंट अकाउंट उघडू शकता.

एकूणचं अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana 2024) सुरू करून सरकारने असंघटित क्षेत्रातील लोकांसाठी एक मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. ज्या लोकांना निवृत्त झाल्यानंतर वयाच्या 60 वर्षानंतर आपला उदरनिर्वाह कसा चालेल, याची काळजी आहे, त्या लोकांसाठी ही योजना खूपचं फायदेशीर आहे.

तुमच्या मनात अटल पेन्शन योजनेबद्दल आणखी काही प्रश्न असतील, तर नक्कीचं कमेंट करून विचारा आणि भारत सरकार, राज्य सरकारच्या इतर योजनांबद्दल जाणून घेण्यासाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

धन्यवाद !

Scroll to Top