Ashwini Mahangade New Home : आई कुठे काय करते फेम अभिनेत्रीने मुंबईत घेतलं स्वप्नांचं नवीन घर

 Ashwini Mahangade New Home

Ashwini Mahangade New Home आई कुठे काय करते या मालिकेत अनघाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अश्विनी महांगडेने आपल्या फॅन्सना खूपच आनंदाची बातमी दिली आहे. तिने नुकतंच मुंबईत आपल्या स्वप्नांचं नवीन घर घेतलं आहे. तिने आपल्या नवीन घरात पूजा केली आणि गृहप्रवेशसुद्धा केला. यावेळी तिच्या कुटुंबातील सदस्य हजर होते आणि तिचा होणारा नवरा निलेश जगदाळेदेखील उपस्थित होता.

 Ashwini Mahangade New Home

अश्विनीने आपल्या नवीन घराच्या गृहप्रवेशाचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यात तिने आपल्या नवीन घराची थोडीशी झलकसुद्धा दाखवली आहे. तिने गणपती बाप्पा, श्री स्वामी समर्थ आणि बालगोपालची पूजा केली. पूजेसाठी सुंदर कलशही मांडला होता. आपल्या नवीन घराच्या दाराला फुलांचं सुंदर तोरण लावलं होतं. या पूजेला अश्विनीचे दादा आणि वहिनी बसल्याचे पाहायला मिळत आहे आणि त्यानंतर घरातील चुलीची आणि केरसुणीचीही पूजा केली. गृहप्रवेशाची पूजा खूपच आनंदात पार पडली. गृहप्रवेशाच्यावेळी सगळेजण खूप आनंदात दिसत होते.

आई कुठे काय करते फेम अभिनेत्री हिंदी मालिकेत

अश्विनीने Ashwini Mahangade New Home या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहलं की, आमच्या सगळ्यांचे घर. माझ्या माणसांमुळे घराला घरपण आहे. तिच्या या आनंदात तिचे फॅन्ससुद्धा खूप आनंदात आहेत. तिच्या सहकलाकारांनी आणि फॅन्सनी या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्स करत तिला नवीन घरासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मुंबईत इतकं सुंदर घर घेतल्याबद्दल सर्वजण तिचं कौतुक करत आहेत.

अश्विनी आणि तिचा होणारा नवरा या पूजेत पूजाविधी करताना दिसून आले. ते दोघे एकमेकांसोबत खूप सुंदर दिसत होते. अश्विनी उत्तम अभिनेत्री तर आहेच यासोबतच ती सामाजिक कार्यकर्तीदेखील आहे. ती रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान या संस्थेची संस्थापिकासुद्धा आहे. अश्विनी आई कुठे काय करते मालिकेतील अनघाच्या भूमिकेमुळे खूप लोकप्रिय आहे आणि आता ती लवकरच एका चित्रपटात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.

मनोरंजनविश्वातील अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा. 

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top