Ashwathama Story In Marathi या ब्रम्हांडाच्या इतिहासात आजपर्यंत अनेक युद्ध झाली आहेत. परंतु सर्वात भयानक युद्ध म्हटलं गेलं, तर ते महाभारताचं युद्ध आहे. या महाभारताच्या युद्धात हजारो, लाखो लोकांचा मृत्यू झाला. मोठे मोठे महारथी योद्धा एकमेकांविरुद्ध या युद्धात लढले.
कौरव आणि पांडवांमध्ये झालेल्या या युद्धात पांडवांचा विजय झाला. कौरव सेनेचा संपूर्ण नाश झाला. परंतु या कौरव सेनेतील असा एक योद्धा होता, जो जिवंत राहिला आणि तो आजही या पृथ्वीवर जिवंत आहे. तो या पृथ्वीवर फिरतोय, तो अमर आहे.
Ashwathama Story In Marathi
परंतु हा योद्धा वरदानामुळे अमर नाहीये, तर एका श्रापामुळे तो आजही अमर आहे. या योध्याच्या डोक्यावर एक भळभळती जखम आहे. ज्यातून एक द्रव पदार्थ सतत वाहत असतो. काळाच्या शेवटापर्यंत पृथ्वीवर असंच फिरत राहण्याचा त्याला श्राप मिळालाय. मग हा योद्धा नेमका आहे तरी कोण ? त्याला असा शाप का मिळाला आहे ? त्याची गोष्ट काय आहे ? आज आपण त्याबद्दलचं जाणून घेऊया.
महाभारतातील हा योद्धा आहे अश्वत्थामा. Ashwathama Story In Marathi अश्वत्थामा हा गुरु द्रोणाचार्य यांचा मुलगा होता. गुरु द्रोणाचार्य पांडव आणि कौरव यांचे गुरु होते. द्रोणाचार्य यांना त्यांचा पुत्र अश्वत्थामा खूप प्रिय होता.
चिरंजीवी असलेल्या अश्वत्थामाची कथा
Ashwathama Story In Marathi अश्वत्थामाच्या जन्माची गोष्ट सुद्धा खूपचं रोचक आहे. अश्वत्थामाचे आई-वडील द्रोणाचार्य आणि कृपी एकदा हिमालयात तपस्या करण्यासाठी गेले. तेथे त्यांच्या तपस्येने महादेव खूप खुश झाले आणि त्यांनी तुम्हाला एक तेजस्वी पुत्र होईल, असं वरदान त्यांना दिलं. काही महिन्यानंतर द्रोणाचार्यांची पत्नी कृपीने एका तेजस्वी मुलाला जन्म दिला. जन्मानंतर या मुलाने घोड्यासारखा आवाज केला आणि तेवढ्यात एक आकाशवाणी झाली की, या मुलाचं नाव अश्वत्थामा असेल .
अश्वत्थामा हा लहानपणापासूनचं खूप तेजस्वी होता. त्याच्या माथ्यावर असा एक मनी होता, ज्या मणीमुळे त्याला अनेक दिव्यशक्ती मिळाल्या होत्या. त्याला भूक, तहान अशा कोणत्याही गोष्टीची जाणीव होत नव्हती.
पुष्करमधील ब्रम्हदेवाचं एकमेव मंदिर
अश्वत्थामा (Ashwathama Story In Marathi) हा द्रोणाचार्य यांचा पुत्र असल्याने कौरव आणि पांडव यांच्याबरोबरचं त्याला सगळी विद्या मिळाली. परंतु लहानपणापासूनचं अश्वत्थामा कौरवांच्या बाजूनेचं असायचा. दुर्योधन त्याचा खूप चांगला मित्र होता. गुरु द्रोणाचार्य यांचा लाडका मुलगा असल्यामुळे द्रोणाचार्य यांनी अश्वत्थामाला अनेक विघातक अस्त्र शस्त्रांचं ज्ञान दिलं होतं. त्यामुळे तो एक महान योद्धा बनला. त्याला हरवण कोणासाठीही सोप्पं नव्हतं.
अश्वत्थामा अजूनही जिवंत आहे का ?
कौरव आणि पांडव यांच्यात जेव्हा महाभारताच्या युद्धाची घोषणा झाली, तेव्हा द्रोणाचार्य आणि अश्वत्थामा या दोघांनी कौरवांच्या बाजूने लढण्याचा निर्णय घेतला.
या युद्धात जेव्हा गुरु द्रोणाचार्य कौरवांचे सेनापती बनले. त्यानंतर द्रोणाचार्य यांनी पांडवांच्या सेनेचा संहार करायला सुरुवात केली. द्रोणाचार्य यांना हरवणं कोणत्याही पांडव योध्याला शक्य नव्हतं. त्यामुळे भगवान श्रीकृष्ण यांनी एक चाल खेळली.
द्रोणाचार्य यांचं अश्वत्थामावर Ashwathama Story In Marathi खूप प्रेम आहे, हे भगवान श्रीकृष्ण यांना माहीत होतं. त्यामुळे त्यांनी भीमाला सांगितलं की, तू अश्वत्थामा नावाच्या घोड्याचा वध कर आणि मी अश्वत्थामाला मारलं असं द्रोणाचार्य यांना सांग. भीमाने असंच केलं आणि द्रोणाचार्य यांना सांगितलं की, मी अश्वत्थामाला मारलंय.
परंतु गुरु द्रोणाचार्य यांचा भीमावर विश्वास नव्हता. त्यांना माहीत होतं की, भीम खोटही बोलू शकतो. त्यामुळे त्यांनी युधिष्ठिरला विचारलं की, खरं काय आहे ? युधिष्ठिर हे धर्मराज होते, ते कधीही खोटं बोलणार नाही, अशी गुरु द्रोणाचार्य यांना शंभर टक्के खात्री होती.
अश्वत्थामाला कोणी शाप दिला होता
द्रोणाचार्य यांनी युधिष्ठिरला विचारलं, खरंच अश्वत्थामाचा वध झाला आहे का ? तेव्हा युधिष्ठिर म्हणाला, हो अश्वत्थामाचा वध झाला आहे, पण तो एक हत्ती होता. परंतु जेव्हा युधिष्ठिर म्हणाला की, तो एक हत्ती होता, त्याचवेळेस भगवान श्रीकृष्ण यांनी शंखनाद केला. या शंखाच्या आवाजात गुरु द्रोणाचार्य यांच्या कानावर तो एक हत्ती होता, हे शब्द पडलेचं नाही. त्यांना असं वाटलं की, खरंच अश्वत्थामा मेला आहे. त्यामुळे त्यांना खूप दुःख झालं आणि त्यांनी हातातील शस्त्र टाकून दिली.
या संधीचा फायदा घेत द्रोपदीचा भाऊ दृष्यद्युमनने द्रोणाचार्य यांचं धड तलवारीने शरीरापासून वेगळं केलं आणि द्रोणाचार्य यांचा वध केला. जेव्हा ही बातमी अश्वत्थामाला समजली की, आपल्या वडिलांचा गुरु द्रोणाचार्य यांचा पांडवांनी छळ करून वध केलाय, तेव्हा अश्वत्थामा खूप चिडला.
Ashwathama Story In Marathi त्याने या घटनेचा बदला घेण्याचं ठरवलं. रात्रीच्या अंधारात तो पांडवांच्या सेनेत घुसला, तेथे एका तंबूमध्ये पाच पांडव झोपले आहेत, अशी बातमी त्याला मिळाली. परंतु या तंबूमध्ये पांडव नसून पांडवांचे पाच पुत्र झोपलेले होते. अश्वथामाने पांडव समजून पांडवांच्या पुत्रांचा वध केला आणि त्यानंतर दृष्यद्युमनचाही वध केला.
परंतु एवढ्यावरचं अश्वत्थामाचा राग शांत झाला नाही आणि त्याने अर्जुनची सून असलेली उत्तरा जी त्यावेळेस गर्भवती होती आणि तिच्या पोटात पांडवांचा वंश होता. तिच्या गर्भावर ब्रह्मास्त्र चालवून पांडवांच्या वंशाचा समूळ नाश करण्याचा प्रयत्न केला.
अश्वत्थामाने केलं होतं हे पाप
हे पाहून भगवान श्रीकृष्ण यांचा क्रोध अनावर झाला. त्यांनी उत्तराला तर वाचवलं, परंतु अश्वत्थामाने केलेले हे पाप पाहून त्याला शिक्षा द्यायचं ठरवलं. त्यांनी पांडवांना सांगून अश्वत्थामाच्या माथ्यावर जो मनी होता, तो काढून घेण्यास सांगितलं. हा मनी काढल्याने अश्वतामाच्या माथ्यावर मोठी जखम झाली आणि त्यातून रक्त वाहू लागलं.
श्रीकृष्ण अश्वत्थामाला Ashwathama Story In Marathi म्हणाले की, तू आता जे केलंय, ते खूप मोठ पाप आहे. मी तुला श्राप देतो की, काळाच्या अंतापर्यंत तू या पृथ्वीवर असाचं भटकत राहशील. तुझ्या माथ्यावरील या जखमेतून रक्त सतत वाहत राहील. तुझ्या अंगातून दुर्गंधी येत असेल. त्यामुळे तू माणसांमध्ये राहू शकणार नाही. तुला जंगलातच राहावं लागेल.
हा शाप मिळाल्यानंतर अश्वत्थामा घोर जंगलात निघून गेला आणि आजही तो जिवंत आहे. या पृथ्वीवर सात चिरंजीवी आहेत, असं म्हटलं जातं परंतु इतर सहा चिरंजीवी हे वरदानामुळे अमरत्व मिळालेले आहेत. तर अश्वत्थामा असा एकमेव चिरंजीव आहे, जो श्रापामुळे या पृथ्वीवर अजूनही जिवंत आहे.
अश्वत्थामा आता कोठे आहे ?
आजही देशाच्या विविध भागांमध्ये अश्वत्थामाला पाहिलं गेल्याचं सांगितलं जातं. याबद्दल अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत.
तर अशी होती अश्वत्थामाची Ashwathama Story In Marathi गोष्ट. महाभारताचा एक योद्धा जो आजही जिवंत आहे. तुम्हाला माहित होती का अश्वत्थामाची ही कथा. नक्कीचं कमेंट करुन सांगा आणि आमच्या चॅनलवर असलेल्या इतर पौराणिक कथाही नक्कीचं पहा.
अशाचं नवीन नवीन पौराणिक कथा आणि माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा
खूप खूप धन्यवाद !