Arshin Kulkarni In IPL : आयपीएलमध्ये डेब्यु केलेला सोलापूरचा क्रिकेटपटू अर्शिन कुलकर्णी कोण आहे ?

Arshin Kulkarni In IPL

Arshin Kulkarni In IPL 30 एप्रिल रोजी मुंबई आणि लखनौच्या संघामध्ये आयपीलचा सामना रंगला आणि या सामन्याचं वैशिष्ट्य म्हणजे मराठमोळा क्रिकेटपटू अर्शिन कुलकर्णीने लखनौ संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण केलं. परंतु पदार्पणातचं अर्शिन पहिल्याचं चेंडूवर शून्यावर बाद झाला.

यामुळे आर्शिन आणि त्याचे फॅन्स काहीसे नाराज झाले आहेत. पण आर्शिन कुलकर्णीला आणखीन काही संधी नक्कीचं मिळतील आणि तो या संधींचं सोनं करेल यात शंका नाही. आर्शिन सध्या फक्त 19 वर्षांचा आहे. सोलापूरमध्ये 2005 साली त्याचा जन्म झाला होता.

Arshin Kulkarni In IPL 

भारतात 2008 साली इंडियन प्रीमियर लीग म्हणजेचं आयपीएलची (IPL) सुरुवात झाली आणि देशांतर्गत खेळल्या जाणाऱ्या क्रिकेटचं स्वरूप बदललं. एकूणचं आयपीएलने खेळाडूंना प्रसिद्धी आणि पैसा दिला. त्याचबरोबर भारतीय संघासाठी खेळण्याचं स्वप्न पूर्ण करण्यातही मोठी मदत केली आहे. 

जशी इंडियन प्रीमियर लीग आहे, तशीच अनेक राज्यांनी स्वतःची प्रीमियर लीगही सुरू केली. अशीच एक क्रिकेट लीग आता महाराष्ट्रातही सुरू झाली आहे, तिचं नाव आहे महाराष्ट्र प्रीमियर लीग म्हणजेचं एमपीएल (MPL).

क्रिकेटपटू अर्शिन कुलकर्णीची संपूर्ण माहिती

महाराष्ट्र प्रीमियर लीगचा पहिला हंगाम मागील वर्षी जून 2023 मध्ये सुरू झाला. ऋतुराज गायकवाड, राहुल त्रिपाठी आणि केदार जाधवसारख्या मोठमोठ्या खेळाडूंमुळे या स्पर्धेला वलयही प्राप्त झालं. परंतु सगळ्यात मोठा धमाका केला नाशिक टायटन्स या संघाकडून खेळणाऱ्या अर्शिन कुलकर्णी या खेळाडूने.

20 जून 2023 रोजी पुणे आणि नाशिक या दोन संघांदरम्यान झालेल्या सामन्यात अर्शिन कुलकर्णीने (Arshin Kulkarni In IPL) अष्टपैलू कामगिरी करत धमाका उडवून दिला. त्याने फक्त 54 चेंडू 117 धावांची खेळी केली आणि त्यानंतर गोलंदाजी करताना 4 षटकात 21 धावा देऊन 4 गडीही बाद केले. एवढेचं नाही तर शेवटच्या षटकात त्याने फक्त 5 रन वाचवून नाशिकच्या संघाला विजय मिळवून दिला.

आयपीलमध्ये हार्दिक पांड्याने का केला रोहित शर्माचा अपमान

अर्शिन कुलकर्णीची ही अष्टपैलू कामगिरी सगळीकडे चर्चेचा विषय ठरली आहे. कारण त्याचं वय फक्त 18 वर्ष आहे आणि असं नाही की त्याने फक्त महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये असा धमाका केला आहे. याआधी अंडर १८ साठी खेळतानासुद्धा त्याने खूप चांगली कामगिरी केली होती. आता या धमाकेदार कामगिरीमुळे तो सगळ्यांच्याचं नजरेत आला आहे.

सध्या सोशल मीडियावर अर्शिन कुलकर्णीने (Arshin Kulkarni In IPL) मारलेले षटकार, त्याने केलेली बॅटिंग, बॉलिंगचे व्हिडिओज चांगलेच व्हायरल होताय. अर्शिन कुलकर्णीने जर त्याच्या कामगिरीत असं सातत्य राखलं, तर लवकरच तो भारतीय क्रिकेट विश्वातील एक चमचमता तारा होईल, यात शंका नाही.

तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, अशाच नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top