Apurva Nemlekar On Tejashree Pradhan सध्या स्टार प्रवाह वाहिनीची नवी मालिका प्रेमाची गोष्ट चर्चेचा विषय ठरत आहे. या मालिकेतून सर्वांची आवडती अभिनेत्री तेजस्वी प्रधान टीव्हीवर पुनरागमन करत आहे. तर प्रेक्षकांची आवडती शेवंता म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरसुद्धा मालिकेत नकारात्मक भूमिका साकारतेय.
Apurva Nemlekar On Tejashree Pradhan
याबद्दल अपूर्वा नेमळेकरने एक मुलाखत दिली आणि सांगितलं की, शेवंताची भूमिका साकारल्यानंतर मी एक आव्हानात्मक भूमिकेची वाट पाहत होते. मला अनेक भूमिका ऑफर करण्यात आल्या, परंतु मला तेच तेच काम करण्यात रस नव्हता. म्हणून मी त्या भूमिकांना नकार दिला.
परंतु मला जेव्हा प्रेमाची गोष्ट या मालिकेसाठी विचारणा करण्यात आली, तेव्हा मला सावनीची भूमिका खूप आवडली. (Apurva Nemlekar On Tejashree Pradhan) ही नकारात्मक भूमिका असली, तरी या भूमिकेच्या खूप छटा आहेत.
माझी तुझी रेशीमगाठ मालिकेचा हिंदी रिमेक येतोय
तसंच अपूर्वाने हेही सांगितलं कि, ती सावनीच्या भूमिकेसाठी काय काय तयारी करतेय. ती म्हणाली की जेव्हा मी शेवंता साकारत होते, तेव्हा मला वजन वाढवण्यास सांगितलं गेलं होतं आणि केस काळे करायला सांगितलं होतं. परंतु सावनीच्या भूमिकेसाठी मी वजन कमी केलंय आणि माझ्या केसांचा ओरिजनल रंग तपकिरीच आहे. सावनी खूप मॉडर्न आहे, त्यामुळे मला विविध साड्या, ज्वेलरी आणि हेअर स्टाईल ट्राय करायला मिळतील, अशी ही भूमिका आहे.
अपूर्वा नेमळेकर तेजश्री प्रधानबद्दल काय बोलली
अभिनेत्री तेजश्री प्रधानबरोबर काम करताना असुरक्षितता वाटली का ? या प्रश्नाचे उत्तर देताना ती म्हणाली की, तेजस्वी आणि मी मागील अनेक वर्षांपासून या इंडस्ट्रीमध्ये काम करतोय. आम्ही स्वतःला सिद्ध केलंय. त्यामुळे बरोबर काम करताना कोणतीही असुरक्षितता वाटण्याची गरज नाहीये.
उलट आम्हाला (Apurva Nemlekar On Tejashree Pradhan) दोघींना एकत्र काम करताना खूप मजा येत आहे. प्रेमाची गोष्ट ही मालिका ये हे मोहबते मालिकेचा रिमेक आहे. यावरूनही मालिकेला ट्रोल करण्यात आलं. अपूर्वा यावर म्हणाली की, ही गोष्ट सर्वांनाच माहिती आणि हे काही नवीन नाही. अनिता हसनंदांनीने हिंदी मालिकेत खूपच छान काम केलं होतं आणि मी माझ्या पद्धतीने सावनीची भूमिका साकारणार आहे. मी माझ्या भूमिकेला पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न करेल.
एकूणचं अपूर्वा नेमळेकर ही भूमिका करण्यासाठी खूप उत्सुक आहे. मग आता ती काय कमाल करते, हे येणाऱ्या दिवसात कळलेच. अशाच नवीन नवीन आणि इंटरेस्टिंग माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीच वाचा.
खूप खूप धन्यवाद !