Apple Smart Watch SE : तुम्ही अगदी स्वस्तात खरेदी करू शकता ही ऍपलची स्मार्टवॉच

Apple Smart Watch SE

Apple Smart Watch SE स्मार्टफोननंतर जर एखाद्या टेक्नॉलॉजी गॅजेटची सर्वात जास्त क्रेझ असेल, तर ते म्हणजे स्मार्टवॉच. आजकाल प्रत्येकाच्याचं हातात तुम्हाला स्मार्टवॉच दिसेल. साधं घड्याळ तर कोणी वापरतचं नाहीये.

आपल्या हातात एक भारी स्मार्टवॉच असावी, ती आपलं आरोग्याची काळजी घेईल. हार्ट रेंट सेंसर असेल. आपल्या शरीरातील पाण्याची पातळी आणि ऑक्सिजनची पातळी मॉनिटर करेल. आपण दिवसभरात किती कॅलरी बर्न केल्या हे मॉनिटर करेल. अशी प्रत्येकाची इच्छा असते.

Apple Smart Watch SE

या सर्व सुविधांसाठी स्मार्टवॉच खरेदी केल्या जातात. परंतु आपल्या देशात ब्रँडेड स्मार्टवॉच बरोबरचं बजेट स्मार्टवॉचचं खूप मोठं मार्केट सुरू झालंय. जेथे 500 रुपयांपासून 1000 रुपयांपर्यंत किमतीच्या स्मार्टवॉच विकल्या जात आहेत.

या बजेट स्मार्टवॉच अगदी महागड्या स्मार्ट वॉचेससारख्या दिसतात. परंतु यामध्ये जे सेन्सर्स वापरले जातात, ते डुप्लिकेट असतात. त्यामुळे या स्मार्टवॉचमध्ये तुमच्या बर्न झालेल्या कॅलरी, हार्ट रेट, SO2 हे सगळे चुकीचं असतात. याबद्दल गॅरंटी देता येत नाही.

cheap smartwatch
cheap smartwatch

हौस पूर्ण करण्यासाठी स्वस्तात मिळणारी स्मार्टवॉच घेणं योग्य आहे. पण जर तुम्हाला खरंच एक चांगली स्मार्टवॉच वापरायची असेल, जी विश्वासार्ह असेल तर तुम्हाला ब्रॅण्डेड स्मार्टवॉचकडे मोर्चा वळवावा लागेल.

ही ऍपलची स्मार्टवॉचं स्वस्तात खरेदी करा

टेक्नॉलॉजी विश्वातील सर्वात मोठा ब्रांड म्हणजे एप्पल. एप्पलचं एक तरी प्रॉडक्ट वापरता यावं, अशी प्रत्येकाचीचं इच्छा असते. म्हणूनचं आज आम्ही तुमच्यासाठी एप्पलच्या सर्वात स्वस्त स्मार्टवॉचबद्दल माहिती घेऊन आलो आहोत.

सध्या एप्पल वॉच अल्ट्रा ही सर्वात महागडी स्मार्ट वॉच आहे. याची किंमत 1 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. तुम्ही जितका मोठा डायल आणि फीचर्स घ्याल, तितकी या स्मार्टवॉचची किंमत वाढते. परंतु लोकांना परवडेल अशीही एक स्मार्ट वॉच एप्पलने लॉन्च केलीये आणि या स्मार्टवॉचचं नाव आहे एप्पल स्मार्टवॉच SE. या स्मार्टवॉचचं सेकंड जनरेशन मार्केटमध्ये आहे.

Apple Smart Watch SE
Apple Smart Watch SE

एप्पलची ऑफिशियल वेबसाईट, ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स वेबसाईटवरून विविध ऑफरचा लाभ घेऊन तुम्ही ही स्मार्टवॉच जवळपास 24 हजार रुपयांमध्ये खरेदी करू शकतात.

भारतात बंद होणार व्हाट्सएप ?

आता आपण या स्मार्टवॉचमधील फीचर्सबद्दल जाणून घेऊया. तुम्ही या स्मार्टवॉचमध्ये 40 mm आणि 44 mm चा डायल घेऊ शकतात. त्याचबरोबर विविध strap चे ऑप्शन्स अवेलेबल आहेत.

बजेट ऑप्शन असल्यामुळे तुम्हाला या स्मार्ट वॉचमध्ये कॉलिंगचा ऑप्शन नाही मिळणार. परंतु जीपीएसचा ऑप्शन मिळेल. त्याचबरोबर विविध सेन्सर्सही मिळतील.

एकूणचं ज्या लोकांना ॲपलसारख्या मोठ्या ब्रँडची स्मार्टवॉच वापरायची आहे, पण त्यांचं बजेट कमी आहे त्यांच्यासाठी हा चांगला ऑप्शन आहे.

तर तुम्ही कोणती स्मार्टवॉचं घेणार ? ब्रँडेड की बजेट ऑप्शनमध्ये मिळणारी ? नक्कीचं कमेंट करुन सांगा.

अशाचं नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top