Aloevera Farming : कोरफड शेती करून कमवा लाखों रुपये

Aloevera Farming 

Aloevera Farming आजकालच्या आधुनिक युगात प्रत्येक गोष्ट ही आधुनिक पद्धतीने केली जातेय. आपली पारंपरिक शेतीसुद्धा आता खूप आधुनिक होतेय. अनेक उच्चशिक्षित तरुण आता आधुनिक पद्धतीने शेती करताय. शेतीत नवनवीन पिकं घेताय आणि शेतीतून भरघोस उत्पन्नसुद्धा मिळवताय.

असाच एक उच्चशिक्षित तरुण खेमराज भूतेने आपल्या पारंपरिक शेतीऐवजी कोरफडीची शेती करून खूप मोठं यश मिळवलंय. खेमराज भूते या तरुणाने एम फार्म शिक्षण घेतले आणि तो एका फार्मास्युटिकल कंपनीत नोकरी करायचा पण त्यात त्याचं मन रमले नाही. दुसऱ्याची नोकरी करण्यापेक्षा त्याने स्वतःचा व्यवसाय करायचं ठरवलं आणि मग नोकरी सोडून त्याने स्वतःच्या गावी येऊन वडिलोपार्जित शेती करण्याचा निर्णय घेतला.

Aloevera Farming 

तो आपल्या भंडारा जिल्ह्यातील रोहणी या गावी परतला आणि वडिलांची शेती करण्याचा निर्णय घेतला पण त्याने शेतीत पारंपरिक पिकं घेण्याऐवजी कोरफड पिकवण्याचं ठरवलं.

या शेतीआधारेच त्याने गावात आपला उद्योगसुद्धा उभारला. गावात त्याने स्वतःची कंपनी सुरू केली आहे. शेतीत पिकलेल्या कोरफडपासून (Aloevera Farming) तो ज्यूस, जेल, फूड प्रोडक्टस आणि स्किन केअर प्रोडक्टस तयार करतो.

कोरफड शेती करून कमवा लाखों रुपये
कोरफड शेती करून कमवा लाखों रुपये

या प्रोडक्टसची विक्री फक्त राज्यातच नाहीतर देशविदेशातही केली जातेय. वडिलांच्या साडेतीन एकर शेतीमध्ये खेमराज भूते या तरुणाने नाविन्यपूर्ण शेती करून दाखवली आणि आता तो खूप यशस्वी उद्योजक बनलाय. त्याने आता गावातील शेती भाडेतत्त्वावर घेतलीय आणि त्यावरही कोरफडची लागवड करणार आहे.

कोरफड शेतीतून कमवा दरमहा लाखों रूपये  

या शेतीत त्याला 65 हजार रुपये वार्षिक खर्च येतो आणि त्या बदल्यात तीन लाखांचा निव्वळ नफा मिळतो.

लाल केळी पिकवून हा शेतकरी कमावतोय लाखों रुपये

खेमराज भूते या तरुणाने कोरफडाच्या (Aloevera Farming) शेतीतून सुरू केलेल्या लघुउद्योगातून त्याच्या गावातील 20 लोकांना रोजगार मिळाला आहे. या लघुउद्योगात कोरफडपासून ज्यूस, जेल आणि अन्य खाद्यपदार्थ बनवले जातात. हे प्रोडक्टस दुसऱ्या कंपन्यांच्या प्रोडक्टपेक्षा स्वस्त असतात त्यामुळे त्याच्या प्रोडक्टसना सगळीकडे खूप मागणी आहे.

अशाप्रकारे या होतकरू तरुणाने प्रगत शेतीतून खूपच प्रगती केली आहे हे सगळ्यांसाठी खूपच चांगलं उदाहरण आहे.

मित्रांनो तुम्हाला हा आर्टिकल आवडला असेल तर आमचे दुसरे आर्टिकलसुद्धा नक्की वाचा. 

खूप खूप धन्यवाद ! 

Scroll to Top