All Time High Gold Rate : सोन्याचा भाव 1 लाख रुपये तोळा होणार ? सोन्याचा भाव कोण ठरवतं ?

All Time High Gold Rate

All Time High Gold Rate भारतीयांना सोन्याची किती आवड आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. जगातील सर्वात मोठा सोन्याचा आयातदार म्हणून भारताची ओळख आहे. फक्त इन्व्हेस्टमेंटसाठीचं नाही तर, शृंगारासाठी आणि सणावारासाठीही सोनं वापरलं जातं.

प्रत्येकाच्या आर्थिक परिस्थितीनुसार सोनं कमी किंवा जास्त प्रमाणात असतं. परंतु सोन्याची आवड प्रत्येक भारतीयालाचं आहे, हे मात्र नक्की. भारतात कोरोना लॉकडाऊननंतर सोन्याचा भाव दिवसेंदिवस वाढत चाललाय आणि आता सोनं 1 लाख रुपये तोळा होणार असं म्हटलं जातंय. त्यामुळे तुमच्या मनातही हा प्रश्न नक्कीचं आला असेल की, (All Time High Gold Rate) सोन्याचा भाव कोण ठरवतं ? सोन्याचा भाव चढणार की उतरणार कसं ठरवलं जातं ? आज आम्ही तुम्हाला याबद्दल सांगणार आहोत.

All Time High Gold Rate सोन्याचा भाव चढणार की उतरणार कसं ठरवलं जातं ?

जगात कोणत्याही विकल्या जाणाऱ्या वस्तूचा भाव कमी होणं किंवा जास्त होणं हे एका गोष्टीवरून ठरवलं जातं आणि ते म्हणजे त्या वस्तूची बाजारातील मागणी. बाजारात त्या वस्तूची मागणी वाढली की किंमत वाढते आणि मागणी कमी झाली की किंमत कमी होते. सोन्यालासुद्धा हा नियम लागू होतो.

सामान्य माणसं जे सोनं विकत घेतात, त्यामुळे सोन्याचा भाव कमी किंवा जास्त होत नाही. All Time High Gold Rate तर जे मोठमोठे गुंतवणूकदार आहेत, त्यांनी सोन्याची किती खरेदी आणि विक्री केली, यावरून सोन्याचा भाव ठरतो. हे गुंतवणूकदार फक्त सोन्यामध्येचं नाही तर शेअर बाजारातही पैसे गुंतवतात.

घरबसल्या असे कमवा लाखों रुपये

उदाहरणार्थ जेव्हा शेअर बाजारमध्ये गुंतवणूकदारांना असं वाटतं की, जास्त फायदा मिळणार नाही. तेव्हा ते आपला मोर्चा सोन्याकडे वळवतात. त्यामुळे सोन्याची खरेदी जास्त होते आणि सोन्याचा भावही वाढतो. All Time High Gold Rate परंतु जेव्हा याच गुंतवणूकदारांना असं वाटतं की, आता शेअर मार्केटमधून जास्त रिटर्न मिळेल. तेव्हा ते सोन्यामधील गुंतवणूक कमी करतात आणि शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवतात. त्यामुळे मागणी कमी होते आणि सोन्याचा भाव उतरतो.

परंतु सोन्यासारखी वस्तू एका लेव्हलपेक्षा जास्त स्वस्तही होत नाही आणि महागही होत नाही, एवढं मात्र नक्की.

सोन्याचा भाव कोण ठरवतं ?

तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, जगातील कोणत्याही देशाचं सरकार सोन्याचा भाव ठरवत नाही. All Time High Gold Rate तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये वर्ल्ड गोल्ड काउंसिल नावाची एक संस्था आहे, ती सोन्याचे भाव ठरवते.

आठराव्या शतकात ब्रिटनमधील पाच श्रीमंत घराणे सोन्याचा भाव ठरवायची. परंतु सध्याच्या काळात जगभरातील पंधरा मोठ्या बँका सोन्याचा भाव ठरवतात.

All Time High Gold Rate स्टॅंडर्ड चार्टर्ड बँक, एचएसबीसी, मॉर्गन स्टॅन्ली, यांसारख्या मोठ्या बँका आणि चीनमधील दोन मोठ्या बँका या 15 बँकांच्या समूहामध्ये सामील आहेत. परंतु जगातील सर्वात मोठा सोन्याचा आयातदार असलेल्या भारतातील एकही बँक या सोन्याचा भाव ठरवणाऱ्या संस्थेची सदस्य नाही.

Gold Rate Today

इंग्लंडमधील लंडनमध्ये रोज सकाळी दहा वाजता आणि दुपारी तीन वाजता सोन्याचा भाव ठरवला जातो. आपल्या देशातही सोन्याचे मोठे गुंतवणूकदार एकत्र येऊन सोन्याचा भाव ठरवतात.

एकूणच आपल्या देशात सोनं All Time High Gold Rate आयात करावं लागतं. त्यामुळे डॉलरचा भाव, त्यावरील कर आणि जगातील सोन्याचा भाव, यानुसारच आपल्या देशातील सोन्याचा दर ठरवला जातो आणि तो आंतरराष्ट्रीय बाजारापेक्षा नेहमीच जास्त असतो. त्यामुळे दुबईसारख्या देशात आपल्यापेक्षा स्वस्त सोनं भेटतं.

तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, आवडली का माहिती, नक्कीचं कमेंट करुन सांगा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीच वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top