Akshaya Tritiya Rashibhavishya अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील खूप महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवशी नवीन कार्याची सुरुवात करायची असते. 2024 मध्ये शुक्रवार 10 मे रोजी अक्षय तृतीया साजरी केली जाईल. आज आपण अक्षय तृतीयेचे महत्त्व आणि यावर्षी अक्षय तृतीया निमित्त राशिभविष्य जाणून घेणार आहोत.
अक्षय तृतीयेचे महत्त्व
अक्षय तृतीयेला खूप शुभ मानलं जातं. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या पुराणानुसार अनेक महत्त्वाच्या गोष्टी घडल्या होत्या, आपण त्या जाणून घेऊया.
1) याच दिवशी भगवान विष्णूचा सहावा अवतार भगवान परशुराम यांचा जन्म झाला होता. भगवान परशुराम हे अमर आहेत, चिरंजीवी आहेत आणि अजूनही या पृथ्वीवर आहेत. या दिवशी त्यांची पूजा केली जाते.
2) अक्षय तृतीयेच्या दिवशी भगीरथाने तपश्चर्या करून माता गंगेला या पृथ्वीवर आणलं होतं. तेव्हापासूनचं संपूर्ण मानव जातीचे पाप निराकरण करण्याचं काम माता गंगा करतेय.
3) असं मानलं जातं की, अक्षय तृतीयेच्या दिवशी महाभारतातील युधिष्ठिरला अक्षय पात्र मिळालं होतं आणि या पात्राचं असं वैशिष्ट्य होतं की, यातील धान्य कधीही संपत नव्हतं. त्यामुळे या दिवसापासूनचं शेतकरी पेरणीला सुरुवात करतात.
4) अक्षय तृतीयेच्या दिवशी महर्षी वेदव्यास यांनी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली होती.
अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं खरेदी करण्यास खूप महत्त्व आहे. असं मानलं जातं की, या दिवशी सोनं खरेदी केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होतात आणि त्या घरात कधीही अन्नधान्य आणि संपत्तीची कमतरता राहत नाही. त्यामुळे अनेक लोक या दिवशी सोनंही खरेदी करतात. अक्षय तृतीयेच्या दिवशी नवीन नवीन वस्तू, गाड्या खरेदी करण्याची प्रथा आहे.
Akshaya Tritiya Rashibhavishya अक्षय तृतीया राशिभविष्य
2024 मध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी गजकेसरी योग, धनयोग, शुक्रादित्य योग, रवी योग आणि सुकर्मा योग असे अनेक योग एकाचं वेळेस जुळून येत आहे. त्यामुळे अशा पाच राशी आहेत, ज्यांच्यावर माता लक्ष्मी यांची कृपा बरसेल त्यांच्या धनसंपत्तीत मोठी वाढ होईल.
Akshaya Tritiya Rashibhavishya ऋषभ, कर्क, मिथुन, तुला आणि धनु या राशींना त्यांच्या नोकरी आणि व्यवसायात मोठे यश मिळेल आणि माता लक्ष्मीची कृपा बरसेल.
तर या अक्षय तृतीयेला Akshaya Tritiya Rashibhavishya तुम्ही काय नवीन खरेदी करणार ? नक्कीचं कमेंट करुन सांगा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !