Akshay Tritiya Shubh Muhurt आज 10 मे रोजी संपूर्ण देशभरात अक्षय तृतीया साजरी केली जात आहे. अक्षय तृतीयेला सोनं-चांदी किंवा इतर शुभ वस्तूंची खरेदी करणं चांगलं मानलं जातं. या वस्तू तुम्हाला नेहमी लाभ देतात. मग अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त कोणता आहे ? वस्तूच्या खरेदीसाठी शुभमुहूर्त कोणता आहे ? कोणत्या वस्तू खरेदी करायला हव्यात आणि कोणत्या नाही ? आज आपण त्याबद्दल जाणून घेऊया.
Akshay Tritiya Shubh Muhurt
सर्वात आधी अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजेचा शुभमुहूर्त (Akshay Tritiya Shubh Muhurt) कोणता ते पाहूयात.
सकाळी 5:33 ते दुपारी 12:18 मिनिटांपर्यंत तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा करू शकता. या शुभमुहूर्तात पूजा केल्यास तुम्हाला उत्तम फळ मिळेल.
अक्षय तृतीया खरेदीसाठी शुभ मुहूर्त
हा तर झाला पूजेचा शुभ मुहूर्त (Akshay Tritiya Shubh Muhurt) आता खरेदारीचा शुभमुहूर्त पाहूया. अक्षय तृतीयेच्या दिवशी दिवसभरात असे चार मुहूर्त आहे ज्यांमध्ये खरेदारी करणं खूपचं शुभ आहे.
खरेदारी करण्यासाठी सर्वात पहिला शुभ मुहूर्त आहे सकाळी 5.33 ते सकाळी 10:37 पर्यंत.
त्यानंतर दुसरा शुभमुहूर्त आहे दुपारी 12:18 ते 1:59 वाजेपर्यंत.
तिसरा शुभमुहूर्त आहे संध्याकाळी 5.21 वाजेपासून 7.02 वाजेपर्यंत.
तर चौथा शुभमुहूर्त आहे रात्री 9.40 ते 10.59 वाजेपर्यंत.
या चार शुभ मुहूर्तावर तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदारी करू शकता, जी तुमच्यासाठी खूपचं शुभ असेल.
मग अक्षय तृतीयेच्या दिवशी काय खरेदारी करायला हवी, जी शुभ असते आणि कोणती वस्तू खरेदी करायला नको, आपण त्याबद्दल जाणून घेऊया.
आपल्या सर्वांना माहिती आहे की, अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं आणि चांदी खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं. या दिवशी आपण जी सोन्याची किंवा चांदीची वस्तू खरेदी करतो, ती आपल्याला अक्षय फळ देते. त्यापासून कधीही नुकसान होत नाही, असं मानलं जातं.
अक्षय तृतीयेला सोनं खरेदी करण्याची सर्वात मोठी संधी
जर तुम्ही सोनं किंवा चांदी खरेदी करू शकत नसाल, तर इतर शुभ वस्तूंची खरेदी ही करता येते. जसं की वाहन, मातीच्या वस्तू, दक्षिणावर्ती शंख आणि श्रीयंत्र.
परंतु या दिवशी प्लास्टिकसाख्या अशुद्ध धातूची खरेदी तुम्ही नाही करायला पाहिजे. त्याचबरोबर चाकूसारखी धारदार वस्तूही कधी खरेदी करायची नाही. ते अशुभ मानलं जातं.
तर मग तुम्ही या अक्षय तृतीयेला काय खरेदी करणार ? नक्कीचं कमेंट करुन सांगा आणि अशाचं नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !