Adhaar Card Photo Update आधार कार्ड किती महत्त्वाचं आहे, हे आपल्या सर्वांनाच माहितीये. भारतीय नागरिकाकडे आधार कार्ड असल्यास त्याला अनेक गोष्टींसाठी त्याचा फायदा होतो. आधार कार्ड एकदा काढल्यानंतर ते अपडेटसुद्धा करता येतं. आधार कार्डमधील ऍड्रेस, नाव, अशा डिटेल्स अपडेट करता येतात.
परंतु आधारकार्डवर अशी एक गोष्ट असते, जी कोणालाही आवडत नाही आणि ती म्हणजे आधार कार्डवरील तुमचा फोटो. इतरवेळेस तुम्ही कितीही सुंदर दिसत असाल, तुमचे फोटो कितीही छान येत असले तरीही आधार कार्डवरील फोटो मात्र अतिशय बेकार आलेला असतो आणि तो कोणालाही आवडत नाही.
Adhaar Card Photo Update
त्यामुळे हा असा फोटो असलेलं आधार कार्ड इतरांना दाखवायला अनेकांना आवडत नाही. अनेकांना आधार कार्डवरील फोटो बदलण्याची इच्छा असते. पण हा फोटो कसा बदलायचा अनेकांना माहिती नसतं. मग आधार कार्डवरील फोटो बदलण्याची प्रोसिजर नेमकी आहे तरी काय ? आपण त्याबद्दल जाणून घेऊया.
आधार कार्डवरील फोटो बदलण्यासाठी तुम्हाला नजीकच्या आधार केंद्रात जावं लागेल. ही प्रोसेस ऑनलाईन होऊ शकत नाही. ती आधार केंद्रावरच होऊ शकते. तेथे गेल्यावर तुम्हाला एक फॉर्म भरून द्यावा लागेल आणि मग तुमचा अपडेटेड फोटो देऊन तुम्ही आधार कार्डवरील फोटो चेंज करू शकता. यासाठी सरकारने 100 रुपये शुल्क ठरवलं आहे.
घरबसल्या ऑर्डर करा PVC आधार कार्ड
एकूणचं त्या लोकांसाठी ज्यांना आपल्या आधार कार्डवरील फोटो बदलायचा आहे, अपडेट करायचा आहे, त्यांच्यासाठी ही खूप चांगली बातमी आहे, यात शंका नाही. तर तुम्हालाही तुमचा आधार कार्डवरील फोटो बदलायचा आहे का ? नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाचं नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !