Adarsh Shikshak Story आदर्श शिक्षक बापाने स्वतःच्या तोंडाला काळं फासून घेतलं कारण…

Adarsh Shikshak Story

Adarsh Shikshak Story भारत सरांना संपूर्ण गाव एक आदर्श शिक्षक म्हणून ओळखायचा आणि फक्त गावातचं नाही, तर संपूर्ण राज्यात त्यांची ख्याती होती. त्यांना राज्य सरकारचे एक नाही तर तीन-तीन आदर्श शिक्षकाचे पुरस्कार मिळाले होते. जागतिक स्तरावरही त्यांचा गौरव झाला होता. त्यांच्यासारखा भाषा विषय अख्ख्या जगात कोणी शिकवत नाही, असं मानलं जायचं.

जसे भारत सर एक आदर्श शिक्षक होते. तसेच ते एक आदर्श व्यक्तीही होते. त्यांचं संपूर्ण कुटुंब आदर्श होतं. भारत सरांना एकुलता एक मुलगा होता राम. रामही आपल्या वडिलांच्या पावलावर पाव ठेवून एक आदर्श व्यक्ति होता. लहानपणापासूनचं तो अभ्यासात खूप हुशार होता. दरवर्षी संपूर्ण शाळेत त्याचा पहिला नंबर यायचा. Adarsh Shikshak Story दहावीलाही त्याने राज्यामध्ये पहिला नंबर काढला होता आणि आता बारावीच्या परीक्षेत तो खूपच चांगले मार्क मिळून पास झाला आणि राज्यातील नंबर वन इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्याचं ऍडमिशन झालं.

Adarsh Shikshak Story

भारत सर आणि त्यांच्या मुलाने संपूर्ण गावासमोरचं नाही, तर तालुक्यात एक आदर्श ठेवला आहे. Adarsh Shikshak Story त्यामुळे त्याच्यासाठी गावाने एक मोठा सत्कार समारंभ आयोजित केला होता. या बाप लेकाचा सत्कार करण्यात आला. बाप असावा तर असा आणि मुलगा असावा तर असा, असं सगळ्यांच्या तोंडी होतं.

राम आपलं पुढचं शिक्षण घेण्यासाठी मुंबईला निघून गेला. भारत सर रोज त्याला कॉल करायचे, अभ्यासाबद्दल चौकशी करायचे, काही त्रास तर नाही ना, हे विचारायचे. Adarsh Shikshak Story तेव्हा भारत त्यांना सांगायचा, कॉलेज खूप छान आहे. चांगले मित्र भेटलेत. मी चांगला अभ्यास करतो.

पाहता पाहता सहा महिने निघून गेले आणि पहिल्या सेमिस्टरनंतर सुट्ट्यांसाठी राम हा गावी परत आला. रामला सुट्टीसाठी येऊन फक्त दोनचं दिवस झाले होते. परंतु त्याच्या वागण्यातील बदल हा भारत सरांना कळायला लागला होता. गावात राहणारा राम आणि आता शहरातील कॉलेजमधून आलेला राम यांच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक होता. Adarsh Shikshak Story तो घरातील सगळ्यांशी तुटक वागत होता. दर पंधरा-वीस मिनिटांनी काही ना काही तरी कारण काढून तो घराबाहेर निघून जायचा आणि मग त्यानंतर परत यायचा.

आधी तर भारत सरांना वाटलं की, आता तो नवीन वातावरणात गेला आहे, त्याचा बदल असेल. परंतु मग हळूहळू त्यांना सत्य कळलं. एक दिवस जेव्हा रामची आई बॅगमधील त्याचे कपडे बाहेर काढून ठेवत होती, तेव्हा तिला या बॅगमध्ये चक्क सिगारेटचं पाकीट सापडतं. Adarsh Shikshak Story हे सिगारेटचं पाकीट पाहून रामच्या आईला मोठा धक्काचं बसतो आणि ती भारत सरांना येऊन सांगते, “अहो पाहिलंत का, रामच्या बॅगमध्ये मला हे सिगारेटचं पाकीट सापडलंय.”

राम हा शहरात जाऊन, कॉलेजात जाऊन व्यसनाला बळी पडला आहे, तो सिगारेट पितोय, हे पाहून भारत सरांनाही खूप वाईट वाटलं. Adarsh Shikshak Story परंतु हे वयच असं आहे, आपण आपल्या मुलाला वेळीच सावरायला हवं, असा विचार करून त्यांनी रामला बोलावलं.

राम विचारतो, “काय झालं बाबा, का बोलावलं तुम्ही मला ?” भारत सर त्याला सिगारेटचं पाकीट दाखवतात आणि म्हणतात, “काय आहे हे आणि काही उत्तर देण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेव. मी तुझ्याशी शांतपणे बोलतोय. Adarsh Shikshak Story त्यामुळे मला फक्त खरं ऐकायचंय, खोटं ऐकून घ्यायचं नाही. तू जर खोटं बोलला, तर आज मी तुझ शिक्षण बंद करेल. परत तुला कॉलेजला जाता येणार नाही. इथेच राहायचं आणि शेती करायची.

तुझ्या शिक्षणापेक्षा, मला तू एक चांगला माणूस, निर्व्यसनी माणूस म्हणून जगलेला हवा आहे. त्यामुळे खोटं बोलायचं नाही.” राम म्हणतो, “हो बाबा, मी नाही खोटं बोलणार. हे सिगारेटचं पाकीट माझचं आहे. कॉलेजला गेल्यानंतर मला मित्रांच्या संगतीत सिगारेट पिण्याचं व्यसन लागलंय.” भारत सर विचारतात, “मग आता काय करायचं ?” Adarsh Shikshak Story राम म्हणतो, “बाबा मला माफ करा. मी मित्रांच्या संगतीत चुकीच्या वळणाला लागलो. व्यसन लावून घेतलं. मी हे व्यसन लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करेल. मी तुम्हाला वचन देतो, जेव्हा मी पुढच्या सेमिस्टरनंतर परत येईल, तेव्हा मी या व्यसनापासून दूर गेलो असेल आणि आजनंतर मी परत कधीही सिगरेट पिणार नाही.”

भारत सर म्हणतात, “मला तुझ्याकडून हीचं अपेक्षा आहे. परंतु जर मला कळलं की, तू सिगरेट पितोस किंवा तुला दुसरं कोणतं व्यसन लागलं आहे, तर त्यानंतर मी काय करेल, हे तुलाही माहित आहे.” Adarsh Shikshak Story राम मान डोलवतो आणि आपल्या खोलीमध्ये निघून जातो. भारत सरांना वाटतं की, एवढा दरारा ठीक आहे. तरुण मुलगा आहे, त्यावर जास्त रागावून फायदा नाही. तो हुशार असल्यामुळे नक्कीचं समजून घेईल, अशी त्यांना खात्री वाटते.

पाहता पाहता सहा महिनेही निघून जातात. परंतु भारत सरांना हीच काळजी वाटते की, रामने व्यसन सोडलं की नाही. कॉलेजचा एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर राम घरी परततो. तेव्हा तो बाबांबरोबर पूर्वीसारखाचं वागत असतो आणि त्याला आता कोणताही व्यसन नाही अशी भारत सरांना खात्री पटते. Adarsh Shikshak Story रामची आई त्याची बॅगही चेक करते, परंतु यामध्ये कोणतही सिगारेटचं पॅकेट नसतं. त्यामुळे तिलाही वाटतं, आपल्या मुलाने दिलेलं वचन पूर्ण केलंय, तो सुधारला आहे.

परंतु एक दिवस जेव्हा भारत सर हे गावातील शाळेमध्ये शिकवत असतात. तेव्हा त्यांच्यावर जळणारा गावातील एक माणूस तेथे येतो Adarsh Shikshak Story आणि म्हणतो, “भारत सर तुम्ही नेहमी आम्हाला अक्कल शिकवत असतात की, मुलांना कसं वाढवायचं, कसं शिकवायचं, संस्कार कसे द्यायचे, परंतु तुम्ही स्वतःच्या मुलाला संस्कार देऊ शकला नाही.”

हे ऐकून भारत सरांना मोठा धक्काचं असतो आणि ते विचारतात, “हे तुम्ही काय बोलताय आणि यात माझ्या मुलाचा काय संबंध ?” हा माणूस म्हणतो, “मला माहित होतं, तुमचा माझ्यावर विश्वास बसणार नाही.” असं म्हणून हा माणूस भारत सरांना रामच्या एका मित्राचं सोशल मीडिया अकाउंट दाखवतो. Adarsh Shikshak Story यामध्ये या मित्राने अनेक फोटो अपलोड केलेले असतात. हे फोटोज पार्टीचे असतात, काही डिस्कोचे असतात. जेथे राम आपल्या मित्रांबरोबर दारू पीत असतो. सिगारेट ओढत असतो. त्यामुळे भारत सरांना समजत की, रामने वचन मोडलंय आणि तो आता जे चांगलं वागतोय, ते सगळे नाटक आहे.

श्री स्वामी समर्थ मराठी गोष्ट

भारत सरांना खूप वाईट वाटतं, आपल्या मुलाने आपला विश्वासघात केला. एक बाप म्हणून आपण आज अपयशी ठरलो, असं त्यांना वाटतं आणि ते लगेचचं रामला शाळेमध्ये बोलावून घेतात. राम बरोबर रामची आईही तेथे येते आणि जवळपास अख्खा गावचं जमतो. Adarsh Shikshak Story ही बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरते की, त्या जळकुकड्या माणसाने रामचे फोटो व्हायरल केलेले असतात.

राम आणि त्याची आई शाळेमध्ये येतात. तेव्हा राम भारत सरांना विचारतो, “काय झालं बाबा, तुम्ही अचानक मला फोन करून का बोलावलं ?” भारत सर रामला या सोशल मीडिया अकाउंटवरील फोटो दाखवतात आणि विचारतात, “हे काय आहे राम ?” राम काही बोलणार इतक्यात भारत सर म्हणतात, “आणि खोटं बोलण्याचा प्रयत्न करू नको. Adarsh Shikshak Story आजपर्यंत मी कधीही तुझ्यावर हात उचललेला नाहीये, पण जर तू खोटं बोललास, तर मी संपूर्ण गावासमोर तुझ्यावर हात उचलेल आणि कदाचित ते तुला आणि मलाही नाही आवडायचं.”

राम मान खाली घालतो एक शब्दही बोलण्याची त्याची हिंमत होत नाही. भारत सर म्हणतात, “तू एक शब्दही बोलत नाही. याचा अर्थ हे सगळं खरं आहे. मागच्या वेळेस आला होता, तेव्हा तुला सिगरेटचं व्यसन आहे, हे मला कळलं होतं. तू मला वचन दिल, मी हे व्यसन सोडून देईल. परंतु तू सुधारला नाही. Adarsh Shikshak Story तर आणखीन बिघडलास. कारण आता तुला फक्त सिगारेट नाही, तर दारूचही व्यसन लागलंय आणि देव जाणे अजून काय काय. आपल्या टवाळखोर मित्रांबरोबर तू अभ्यासाचा वेळ वाया घालवतोय, तुझं आयुष्य वाया घालवतोय.”

तेथे समजावलेल्या सगळ्या गावकऱ्यांनाही मोठा धक्काचं बसतो. भारत सरांसारख्या आदर्श शिक्षकांचा मुलगा” आदर्श वडिलांचा मुलगा, अशा वाईट वळणाला कसा लागला, हाचं प्रश्न त्यांना पडतो.

रामच्या डोळ्यात पाणी येतं आणि तो चक्क भारत सरांचे पाय धरून म्हणतो, “बाबा मला माफ करा. मी तुम्हाला दिलेलं वचन मोडलं. परंतु मित्रांच्या संगतीने मला ही सगळी व्यसन लागली. मी त्यांना नकार देतो, पण ते म्हणतात, काही नाही होत. हेच तर वय आहे, ऐश करण्याचं, मजा करण्याचं. Adarsh Shikshak Story मी त्यांना नाही म्हणू शकलो नाही, कारण ते मला वेगळं पाडतील, अशी मला भीती वाटायची. म्हणून मी सगळं करतो आणि आता मलाही ते आवडायला लागलंय. पण मी तुम्हाला वचन देतो, मी हे सगळं सोडून देईल. मला आणखी एक संधी द्या, शेवटची संधी द्या.

भारत सर म्हणतात, “मागच्यावेळेसही तू हेच म्हटला होता. त्यामुळे आता तुला संधी नाही. तुला मी शिक्षा देणार, अशी शिक्षा जी तुला आयुष्यभर लक्षात राहील.” राम म्हणतो, “हो बाबा तुम्ही मला शिक्षा द्या. मी हे व्यसन सोडून देईल. तुम्ही मला छडीने मारा, तुम्ही मला उन्हात उभं करा, हवी ती शिक्षा द्या.”

भारत सर काहीही बोलत नाही. ते स्टाफरूम मध्ये जातात आणि तेथून चक्क एक काळ्या शाईचा डबा घेऊन येतात आणि चक्क ही काळी शाई स्वतःच्या चेहऱ्याला फासून घेतात. स्वतःचं तोंड काळ करतात. Adarsh Shikshak Story हे पाहून रामचं नाही तर संपूर्ण गावकऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकते. राम ओरडतो, “बाबा तुम्ही हे काय करताय ? तुमच्या नाही, माझ्या तोंडाला काळ फासा, चूक माझी झालीये.”

भारत सर म्हणतात, “नाही चूक माझी झालीये. एक आदर्श शिक्षक असून, मी माझ्या मुलाला चांगलं शिक्षण नाही देऊ शकलो. चांगले संस्कार नाही देऊ शकलो. माझा मुलगा व्यसनी बनला आहे. खोटं बोलतोय, दारू पितोय, सिगारेट पितोय, आई बापांचा विश्वासघात करतोय आणि अशा मुलाच्या बापाच्या तोंडाला काळ फासलं गेलचं पाहिजे. त्याचा असा संपूर्ण गावकऱ्यांसमोर अपमान झालाचं पाहिजे.”

राम खूप दुःखी होतो आणि ढसाढसा रडू लागतो. तो भारत सरांच्या पायावर डोकं ठेवून म्हणतो, “बाबा मला माफ करा. आज माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी शिक्षा दिली तुम्ही मला. Adarsh Shikshak Story आता काही झालं तरी मी परत दारू सिगारेटला हात लावणार नाही. मी अशी चूक परत करणार नाही. मला फक्त एवढ्या वेळेस माफ करा.”

रामची आई म्हणते, “अहो खरं बोलतोय तो, माफ करा त्याला. आता नका स्वतःला त्रास करून घेऊ. त्याला पश्चाताप झाला आहे.” भारत सर म्हणतात, “राम ही शेवटची संधी. आज तुझ्या चुकीमुळे मी फक्त माझं तोंड काळ करून घेतलंय, परंतु नंतर तू परत असं काही केलं, तर आयुष्यभर मी तुझं तोंड पाहणार नाही आणि तुला माझं तोंड दिसू देणार नाही.”

राम म्हणतो, “नाही बाबा, यानंतर मी अशी चूक परत कधीही करणार नाही.” रामच्या अश्रूंनी भारत सरांचे पाय ओले झालेले असतात. त्यामुळे त्यांना खात्री वाटते आपला मुलगा आता सुधारला आहे. भारत सरांनी संपूर्ण गावांसमोर एक आदर्श ठेवलेला असतो की, मुलगा चुकीचा वागला म्हणून, त्यांनी मुलाला नाही तर स्वतःला शिक्षा करून घेतली Adarsh Shikshak Story आणि अशी जगावेगळी शिक्षा करून घेतली, ज्यामुळे त्यांचा मुलगा हा कायमचा सुधारला आणि यानंतर तो परत असं व्यसन कधीही करणार नाही. त्यांनी सिद्ध केलं की आदर्श शिक्षक म्हणजे काय असतो, आदर्श बाप म्हणजे काय असतो.

तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला आजची कथा. नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाचं नवीन नवीन कथांसाठी आमच्या इतर कथाही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद ! 

Scroll to Top