Adani Aai Marathi Story पन्नास वर्षांची नंदिनी एका उच्चभ्रू कुटुंबाची सून. संपूर्ण शहरात त्यांच्या कुटुंबाचं नाव होतं. नंदिनीचे सासू-सासरे राजकारणात सक्रिय होते. तर नंदिनीचा नवरा आमदार होता. तिची तिन्ही मुलंही खूप शिकळवली होती. सर्वात मोठा मुलगा डॉक्टर, मधला इंजिनियर तर धाकटा सीए झालेला.
नंदिनीला कोणत्याही सुखाची कमी नव्हती. सगळीकडे तिला आमदाराची बायको, एवढ्या मोठ्या घराण्याची सून म्हणून आदर दिला जायचा. Adani Aai Marathi Story परंतु तरीही ती दुःखी असायची, कारण सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये शिक्षणाचा हमखास उल्लेख यायचा आणि जेव्हा नंदिनीला विचारलं जायचं की, तुम्ही किती शिकला आहात, तेव्हा मी दहावी नापास आहे, हे सांगायला तिला लाज वाटायची आणि ती हा प्रश्न टाळण्याचा प्रयत्न करायची.
Adani Aai Marathi Story
नंदिनी दिसायला खूप सुंदर होती. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षीच तिचं लग्न झालं होतं. लग्नाच्या दिवशी तिचा दहावीचा शेवटचा पेपर होता, Adani Aai Marathi Story परंतु लग्न असल्यामुळे तिला तो पेपर काही देता आला नाही आणि दहावी पास होण्याचं तिचं स्वप्न अधूरचं राहून गेलं.
एके दिवशी शाळेच्या कार्यक्रमात तिला प्रमुख अतिथी म्हणून बोलवण्यात आलं आणि तिथे तिला एका विद्यार्थिनी विचारलं, “मॅडम तुमचं शिक्षण किती झालंय ?” Adani Aai Marathi Story तेव्हा लाजत लाजत नंदिनीने सांगितलं, “दहावीला असतानाकॅब माझं लग्न झाल्यामुळे मी दहावीची परीक्षा नाही देऊ शकले.” तेव्हा एक विद्यार्थिनी म्हणाली, “याचा अर्थ तुम्ही दहावी नापास आहात का ?” आणि हे ऐकून नंदिनीला खूप वाईट वाटलं. Adani Aai Marathi Story ही गोष्ट तिच्या मनात बसली आणि तिने ठरवलं की, आता मला दहावी पास व्हायचं. दहावी बोर्डाची परीक्षा द्यायची.
नंदिनी घरी येते. नंदिनीचा नवरा आमदारसाहेब घरी येतात. ती त्यांना म्हणते, “अहो मला दहावी पास व्हायचंय. दहावी बोर्डाची परीक्षा द्यायची आहे.”
तेव्हा नंदिनीचा नवरा हसू लागतो आणि म्हणतो, “आता या म्हातारपणी तुला कशाला परीक्षा द्यायचीये ? इतकं सुख, ऐश्वर्य, मानपान आहे ना, मग कशाला उगाच त्या परीक्षेच्या नादाला लागतेस ? Adani Aai Marathi Story उगाच त्याची न्यूज व्हायची की, आमदाराची बायको दहावीची परीक्षा देतेय आणि मला अशी कोणतीही न्यूज नकोय. पुढच्या वर्षी निवडणूक आहे. त्यामुळे हा विचार सोडून दे.” हे ऐकून नंदिनीला खूप वाईट वाटतं. Adani Aai Marathi Story ती विचार करते, यांना समजावून काही फायदा नाही. कारण त्यांना माणूस आणि त्याच्या भावनेपेक्षा निवडणूक महत्वाची आहे.
दुसऱ्या दिवशी सकाळी नंदिनी ही सर्वांना नाश्ता देत असते. तेव्हा ती आपल्या तिन्ही मुलांना सांगते की, “मला दहावीची परीक्षा द्यायची आहे, दहावी पास व्हायचंय.” तिची तिन्ही मुलं म्हणतात, “आई आता या वयात शिकून तू काय करणार आहेस ?” Adani Aai Marathi Story असं म्हणून मुलं आपल्या कामाला निघून जातात. मुलंही आपल्याला सपोर्ट करायला तयार नाही, म्हणून नंदिनीला खूप वाईट वाटतं.
नंदिनी किचनमध्ये येते. तेथे त्यांच्या घरात काम करणारी मोलकरीण प्रतिभा असते. अनेक वर्षांपासून दोघी या घरात एकत्रच होत्या. त्यामुळे दोघींमध्ये मैत्रीचं नातं होतं. प्रतिभा तिला नावानेचं हाक मारायची. Adani Aai Marathi Story प्रतिभा विचारते, “काय गं नंदिनी, काय झालं, तुझा चेहरा असा का उतरला आहे ?” नंदिनी सांगते, “आता तुझ्यापासून काय लपवायचं ? माझ्याकडे सगळं आहे, कोणाकडे नसेल तेवढं. पण एक स्वप्न पूर्ण करायचं राहून गेलं. मला शिकायचंय, दहावी पास करायचीये आणि आता मला ते करण्याची इच्छा आहे. तर माझं कुटुंबचं मला मदत करत नाहीये. पाठिंबा देत नाहीये.”
प्रतिभा म्हणते, “ऐकलंय मी सगळं आणि तुला कोणी पाठिंबा दिला नाही, तरी तुझी ही मैत्री नक्कीचं देईल तुला पाठिंबा.” Adani Aai Marathi Story नंदिनी हसते आणि म्हणते, “तुही माझ्या सारखीचं अडाणी आहेस, तू काय करशील माझ्यासाठी ?” प्रतिभा म्हणते, “मी जरी अडाणी असले, तरी माझी मुलगी यावर्षी दहावीला आहे. ती तुला नक्कीचं मदत करू शकते.”
हे ऐकून नंदिनीला खूप आनंद होतो आणि ती म्हणते, “अरे हो, मी तर विसरलेचं होते. तुझी मुलगी अपूर्वा यावर्षी दहावीची परीक्षा देणार आहे ना. तिची मला खूप मदत होऊ शकते.” प्रतिभा म्हणते, “मी तिला येथे बोलावते. Adani Aai Marathi Story ती तुला सगळं समजावून सांगेल.” नंदिनीला खूप आनंद होतो. आता आपलं स्वप्न नक्कीचं पूर्ण होईल, असं तिला वाटतं.
थोड्यावेळाने प्रतिभाची मुलगी अपूर्वा घरी येते. ती म्हणते, “काकू मला आईने सर्व सांगितलंय. तुम्ही या वयात दहावीची परीक्षा देताय. शिक्षण पूर्ण करताय. ही खूप चांगली गोष्ट आहे. मी तुम्हाला पूर्ण मदत करेल. मी माझ्या शिक्षकांना सगळं विचारलंय. Adani Aai Marathi Story फॉर्म कसा भरायचा, परीक्षा कशी द्यायची. तुम्हाला नक्कीचं जमेल मी तुम्हाला गाईड करेल.” नंदिनीला खूप आनंद होतो आणि ती अपूर्वाचे आभार मानते.
रात्रीच्या जेवणानंतर नंदिनी खोलीत दहावीच्या पुस्तकांचा अभ्यास करत असते. तेवढ्यात नंदिनीचा नवरा तेथे येतो आणि म्हणतो, “हे काय वाचतेस ?” तर नंदिनी सांगते, “दहावीचं मराठीचं पुस्तक आहे. मी बोर्डाची परीक्षा देतेय ना.” हे ऐकून नंदिनीचा नवरा म्हणतो, “ते खुळ तुझ्या डोक्यात आहेचं का अजून ? Adani Aai Marathi Story मी म्हटलं ना, काही परीक्षा वगैरे द्यायची गरज नाहीये.” नंदिनी म्हणते, “मला परीक्षा द्यायची आहे आणि मी देणारच. आणि याचा फायदा फक्त मला नाही होणार, तर तुम्हालाही होईल. तुम्हीच म्हणाला ना, पुढच्या वर्षी आमदारकीची निवडणूक आहे. Adani Aai Marathi Story तेव्हा अख्ख्या जगाला तुम्हाला सांगता येईल की, तुम्ही स्त्री शिक्षणाचे किती मोठे पुरस्कर्ते आहात. तुम्ही स्वतःच्या बायकोला पुढे शिकण्यासाठी किती प्रोत्साहन देताय. याचा तुम्हाला फायदा होईल आणि तुम्ही नक्कीचं निवडून याल.”
ही गोष्ट नंदिनीच्या नवऱ्याला पटते आणि तो म्हणतो, “माझ्याबरोबर राहून राहून तू सुद्धा हुशार झाली आहेस. तुला राजकारण समजायला लागलंय. कर अभ्यास, चांगला अभ्यास कर आणि फर्स्ट क्लासने पास हो. म्हणजे मला त्याचीही बातमी देता येईल. Adani Aai Marathi Story परंतु कोणी विचारलं तर माझं नाव सांगायचं की, मी तुला ही प्रेरणा दिली.” नंदिनी म्हणते, “हो नक्कीचं” आणि मनातल्या मनात विचार करते, तूप सरळ बोटाने नाही काढता आलं, तर बोट वाकड करावं लागतचं.”
दुसऱ्या दिवशी नंदिनीच्या मुलांना ही गोष्ट कळते. मुलं म्हणतात, “आई तुला सांगितलं ना, हे काही करण्याची गरज नाहीये.” नंदिनी म्हणते, “मी तुम्हाला सल्ला नाही विचारला, मग तुम्ही का सल्ला देताय ? Adani Aai Marathi Story मी तुमची आई आहे, तुम्ही माझी नाही. त्यामुळे मला नाही शिकवायचं, काय करायचं ते.” आई आता हट्ट्याला पेटलीये. तिला सांगून काही फायदा नाही, हा विचार करून मुलं तिला काहीचं बोलत नाही आणि आपापल्या कामाला निघून जातात.
दहावीच्या परीक्षेला आता फक्त दोन महिने बाकी राहिलेले असतात. त्यामुळे वर्षभराचा अभ्यास कसा होईल, आपल्याला ही परीक्षा देता येईल की नाही, आपण पास हो की नाही ? Adani Aai Marathi Story याची नंदिनीला खूप भीती वाटत असते. अपूर्वा तिला म्हणते, “मी तुमच्या भाषा विषयांचा अभ्यास करून घेईल. परंतु तुम्हाला बाकी विषयांसाठी ट्युशन लावावी लागेल.”
बाकीच्या विषयांचा अभ्यास कसा करावा, हा प्रश्न नंदिनीला पडतो. संध्याकाळी जेवणाच्या टेबलवर सगळे बसलेले असतात. तेव्हा नंदिनीचा नवरा म्हणतो, “परीक्षेला फक्त दोन महिने बाकी राहिलेत Adani Aai Marathi Story आणि तुझा एवढा अभ्यास कसा होईल, तू पास तर होशील ना ? नाहीतर माझा उदो उदो होण्याऐवजी, बदनामी होईल.”
नंदिनी म्हणते, “मलाही तेच टेन्शन आलंय. मी कशी पास होणार. आपल्या प्रतिभाची मुलगी अपूर्वा मला सगळे भाषा विषय शिकवणार आहे. परंतु बाकीच्या विषयांचं काय ?” नंदिनीचा डॉक्टर मुलगा म्हणतो, “आई मी तुला विज्ञान विषय शिकवेल.” तर तिचा इंजिनियर मुलगा म्हणतो, “आई मी तुला गणित आणि भूमिती विषय शिकवेल.” Adani Aai Marathi Story नंदिनीचा सर्वात धाकटा मुलगा म्हणतो, “मी तुला इतिहास आणि भूगोल विषय शिकवेल.” नंदिनीचा आमदार नवरा म्हणतो, “आणि मी तुला नागरिकशास्त्र विषय शिकवेल, त्यात तर माझा हातखंडा आहे.”
कालपर्यंत आपल्याला विरोध करणार आपलं संपूर्ण कुटुंब आता आपल्याला मदत करायला तयार झालं आहे. Adani Aai Marathi Story हे पाहून नंदिनीला खूप आनंद होतो आणि ती म्हणते, “आता जर मला माझ्या कुटुंबाची साथ मिळत असेल, तर मी सहज पास होऊन दाखवेल. मी तुमच्या विश्वासाला तडा नाही जाऊ देणार.”
पुढील दोन महिने अपूर्वा, नंदिनीचा नवरा आणि नंदिनी ची मुलं नंदिनीला शिकवतात. परीक्षेसाठी तिची चांगली तयारी करून घेतात आणि पहिल्या पेपरचा दिवस उजाडतो. नंदिनी खूप घाबरलेली असते. Adani Aai Marathi Story परंतु सगळे तिला ऑल द बेस्ट म्हणतात. नंदिनी पेपरला जाऊन बसते, तर तिची सगळी भीती दूर होते. कारण तिने जो अभ्यास केलेला असतो, ते सगळं पेपरमध्ये आलेलं असतं आणि ती खूप छान पेपर लिहिते.
चांगला अभ्यास केल्यामुळे तिचे बाकीचेही पेपर खूप छान जातात. शेवटी रिझल्टचार दिवसही उजाडतो. नंदिनी आणि सर्वांनाच खूप भीती वाटत असते. Adani Aai Marathi Story रिझल्ट लागती आणि नंदिन फर्स्ट क्लासने पास झालेली असते. आज तिचं लहानपणीचं स्वप्न पूर्ण झालेलं असतं. त्यामुळे तिचा आनंद गगनात मावत नाही.
नंदिनी ठरवते, आता येथेच थांबायचं नाही. यानंतर बारावीची परीक्षा द्यायची आणि मग पदवीधर व्हायचं, असं ती ठरवून ती पुढच्या तयारीला लागते.
तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, कशी वाटली आजची कथा नक्कीच कमेंट करुन सांगा आणि अशाच नवीन नवीन कथांसाठी आमच्या इतर कथाही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !