अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या आईचं निधन आठवणीत शेअर केली पोस्ट

अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या आईचं निधन

अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या आईचं निधन. तेजश्री प्रधान ही मराठी कलाविश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. तेजश्रीने अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. तिला खरी ओळख ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेपासूनच मिळाली होती. त्यानंतरही तिने ‘अग्गबाई सासूबाई‘ मालिकेत महत्वपूर्ण भूमिका साकारली.

सध्या ती ‘प्रेमाची गोष्ट‘ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारतेय. तिची ही भूमिकासुद्धा प्रेक्षकांना खूपच आवडतेय.

अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या आईचं निधन

कठोर मेहनतीच्या जोरावर तिने अभिनयक्षेत्रात भरपूर यश मिळवलंय. पण यासोबतच तिला वैयक्तिक आयुष्यात अनेक गोष्टींना सामोरं जावं लागलं. सहा महिन्यांपूर्वी 16 नोव्हेंबरला तेजश्रीच्या आईचं दुःखद निधन झालं होतं. आईच्या अशा अचानक जाण्याने तिला खूप मोठा धक्का बसला होता.

अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या आईचं निधन
अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या आईचं निधन

आता तेजश्रीच्या आईला जाऊन 6 महिने पूर्ण झाले आहेत त्यामुळे तिने आईच्या आठवणीत खूपच इमोशनल पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. तिने इंस्टाग्रामवर आपल्या आईसोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तेजश्री पुरस्कार घेताना दिसत आहे तर तिची आई बाजूला उभी आहे. तिने या फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहलंय की, 
आई….6 महिने झाले….पाठीशी आहेस ना अशीच ! रहा…कायम

Actress Tejashree Pradhan Mother Death

तेजश्री आपल्या आईच्या आठवणीत खूपच व्याकुळ झाली होती. तिने शेअर केलेल्या या पोस्टवर चाहत्यांनी आणि अनेक मराठी कलाकारांनी कमेंट करत तिचं सांत्वन केलं आहे आणि आई नेहमी तिच्यासोबतच आहे असंही म्हटलं आहे.

अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या आईचं निधन
अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या आईचं निधन

तेजश्रीने आपल्या अभिनयकारकिर्दीची सुरुवात केली तेव्हापासून तिची आई ही नेहमी तिच्यासोबतच असायची. ती तेजश्रीच्या कामामध्ये तिची मदत करायची. तिच्या कामांची लिस्ट बनवायची. प्रवास करतानाही तिच्यासोबत असायची. पण आता तेजश्रीने अभिनेत्री म्हणून एवढं मोठं यश मिळवलंय तेव्हाच आई तिच्यासोबत नाही यामुळे ती दुःखी झालीय.

मनोरंजनविश्वातील अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा.

तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top