Actress Suruchi Adarkar Birthday News लोकप्रिय अभिनेत्री सुरुची अडारकरने अनेक मालिकांमध्ये उत्तम भूमिका साकारत मोठं नाव कमावलं आहे. ती मराठी मालिकाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे आणि तिचा मोठा चाहतावर्गदेखील आहे. तिने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये अभिनय केलाय. ‘का रे दुरावा’ मालिकेतून ती प्रचंड लोकप्रिय झाली. मराठी ब्लॉकबस्टर चित्रपट ‘बाईपण भारी देवा’ मधेही तिने महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. मराठीसोबतच हिंदीमधेही तिने काम केलंय.
Actress Suruchi Adarkar Birthday News
आज अभिनेत्री सुरुची अडारकरचा वाढदिवस आहे. तिच्या लग्नानंतरचा हा पहिलाच वाढदिवस आहे. गेल्यावर्षी 6 डिसेंबरला सुरुचीने अभिनेता पियुष रानडेशी लग्न केलं होतं.
पियुषने आपली पत्नी सुरुचीसाठी तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने इंस्टाग्रामवर खास पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. यासोबतच त्याने दोघांचे काही रोमँटिक फोटोसुद्धा शेअर केले आहेत.
अभिनेत्री सुरुची अडारकार वाढदिवस
पियुषने या पोस्टमध्ये लिहलंय की,
हे बर्थडे गर्ल, माझ्या आयुष्यातील गडद क्षणांमध्ये तुझं प्रेम प्रकाशाप्रमाणे मला मार्गदर्शन करतं. तू माझ्यावर जसं प्रेम केलंस ते मी विचारही केला नव्हता की शक्य आहे. माझ्या चुका, उणिवा आणि माझ्यातील कमतरता समजून माझ्यावर प्रेम केल्याबद्दल खूप धन्यवाद. आपलं नातं जसं घट्ट होतंय आणि आपलं प्रेम ज्याप्रकारे फुलतंय त्यासाठी मी कृतज्ञ आहे. माझ्या आयुष्यातील सर्वात अद्भुत व्यक्तीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आय लव्ह यू.
अभिनेत्री अपूर्व नेमळेकरचा नवीन लूक
पियुषच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी कमेंट्स करत सुरुचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. प्रिया मराठे, अभिज्ञा भावे, आदिश वैद्य, रश्मी अनपट, श्रेया बुगडे, अर्चना निपाणकर या सर्व कलाकारांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
Actress Suruchi Adarkar Birthday News सुरुची आणि पियुषने लग्नानंतर आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात केली आणि आता ते दोघे सुखाने संसार करत आहेत.
Actress Suruchi Adarkar Birthday News सुरुची काही दिवसांपूर्वी ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत दिसली होती. तर पियुष रानडे सध्या कलर्स मराठी वाहिनीवरील ‘काव्यांजली’ मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. या दोघांचाही मोठा चाहतावर्ग आहे. त्यांनी एकमेकांशी लग्न केल्यानंतर त्यांचे चाहते खूप खुश झाले होते.
मनोरंजनविश्वातील अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा.
तुमचे खूप खूप धन्यवाद.