Actress Smita Tambe Trolling : या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला दिसण्यावरून लोकांनी टोमणे मारले होते

Actress Smita Tambe Trolling 

Actress Smita Tambe Trolling आपल्याला प्रत्येकालाच दिसण्यावरून कोणीतरी बोलल्याचा अनुभव एकदातरी आलाच असेल. लोक दुसऱ्यांना नेहमी त्यांच्या दिसण्यावरून परखत असतात. पण माणसाच्या बाह्यरूपापेक्षा त्याच्यातील गुण हे जास्त महत्त्वाचे असतात. सामान्य माणसांप्रमाणेच कलाकारांनाही दिसण्यावरून अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.

कारण सिनेसृष्टीत कॅमेरासमोर काम करताना अभिनयासोबतच कलाकारांच्या दिसण्याकडेही भरपूर लक्ष दिलं जातं. आजकल अनेकदा आपण कलाकारांना त्यांच्या दिसण्यावरून त्यांच्या कपड्यावरून ट्रोल केलं गेल्याचं ऐकत असतो.

 Actress Smita Tambe Trolling 

लोकप्रिय अभिनेत्री स्मिता तांबेने तिला दिसण्यावरून वाईट बोललं गेल्याचा अनुभव (Actress Smita Tambe Trolling) नुकताच एका मुलाखतीत सांगितला आहे. इतकंच नाही तर तिच्या लूकमुळे अनेकदा तिला रिजेक्टही केलं गेलंय.

अभिनेत्री स्मिता तांबे आज मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीतील प्रतिभावंत आणि यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने अभिनयक्षेत्रात मोठं नाव कमावलं आहे पण सुरुवातीच्या काळात तिला दिसण्यावरून अनेक लोकांनी त्रास दिला आहे. ती कशी दिसते त्यावरून तिची खिल्ली उडवली गेली. तिला टोमणे मारले गेले.

अभिनेत्री स्मिता तांबेला आला वाईट अनुभव  

स्मिता अभिनयक्षेत्रात नवीन आली होती तेव्हा ऑडिशनला गेल्यावर लोक म्हणायचे ती काम चांगलं करते पण तिचा चेहरा कसा आहे. चेहऱ्यावर किती खड्डे आहेत ? कॅमेरामनला किती कष्ट घ्यावे लागतील ? असं लोक नेहमी म्हणायचे त्यामुळे या गोष्टी तिच्या मनाला खूप लागायच्या. एका कार्यक्रमात तिने हा सर्व अनुभव सांगितला आहे.

शिवा मालिकेतील या अभिनेत्याचं लग्न होणार

पण तिने लोकांच्या म्हणण्याकडे लक्ष न देता आपल्या अभिनयाकडे लक्ष दिलं त्यामुळे आज ती अतिशय लोकप्रिय अभिनेत्री बनली आहे. तिच्या याच उत्तम अभिनयामुळे तिला अनेक पुरस्कारदेखील मिळाले आहेत. स्मिताला ‘जोगरा’, ‘72 मैल एक प्रवास‘ या चित्रपटांसाठी अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. नुकताच तिचा ‘जोराम’ हा चित्रपट आला त्यासाठीही तिला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

अभिनेत्री स्मिता तांबेने (Actress Smita Tambe Trolling) समाजातील या चुकीच्या गोष्टींना मागे टाकत आपल्या अभिनय कौशल्यावर मनोरंजनविश्वात मोठं नाव कमावलं आहे आणि आज सर्वजण तिला उत्तम अभिनेत्री म्हणूनच ओळखतात.

मनोरंजनविश्वातील अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा. 

तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद.  

Scroll to Top