Actress Shivali Parab New Home ‘कल्याणची चुलबुली शिवाली परब’ अशी ओळख असलेली लोकप्रिय अभिनेत्री शिवाली परब महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमधून जगभर प्रचंड लोकप्रिय झाली आहे. ती सध्या मराठी मनोरंजनविश्वातील टॉपची विनोदी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने आपल्या जबरदस्त विनोदी अभिनयाने हे यश मिळवलं आहे. शिवालीने मोठ्या कष्टानंतर प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान मिळवलं आहे.
शिवाली सोशल मीडियावरसुद्धा अतिशय लोकप्रिय आहे. ती आपल्या बोल्ड आणि ब्युटीफुल फोटोशूटसाठी प्रसिद्ध आहे. शिवाली आपले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमी शेअर करते. सोशल मीडियावरून ती नेहमी आपल्या फॅन्सच्या कॉन्टॅक्टमध्ये राहते.
Actress Shivali Parab New Home
शिवालीचे कॉमेडी स्किट तर प्रेक्षकांना आवडतातच. पण यासोबतच ती अनेक मराठी चित्रपट आणि अल्बममध्ये दिसून येते. सध्या शिवालीचं ‘हार्टबीट वाढणार हाय’ हे नवीन गाणं आलं आहे. हे गाणं सगळ्यांना खूपच आवडतंय. या गाण्यामध्ये शिवाली परब आणि अभिनेता विशाल राठोडचा रोमँटिक अंदाज दिसून येतोय. प्रेक्षक या गाण्याला उत्तम प्रतिसाद देताय.
याच नवीन गाण्याच्या प्रमोशनच्या निमित्ताने शिवाली सध्या अनेक मुलाखती देतेय. एका मुलाखतीत तिने आपल्या फॅन्सना खूपच आनंदाची बातमी दिली आहे. येत्या 10 मेला शिवालीचा वाढदिवस आहे.
अभिनेत्री शिवाली परबने विकत घेतलं नवीन घर
मुलाखतीत तिला प्रश्न विचारण्यात आला की, ‘तुझ्या वाढदिवसासाठी काय तयारी करणार आहेस ?’ यावर शिवाली म्हणाली यंदा वाढदिवसासाठी असं काही स्पेशल नाहीये. ही गोष्ट मी अजून कुठेच सांगितलेली नाही. पण आता सांगते. मी नवीन घर (Actress Shivali Parab New Home) घेतलं आहे. या नवीन घराची पूजा मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी 10 तारखेला ठेवली आहे. हे सगळं फक्त प्रेक्षकांमुळे शक्य झालं आहे. यामुळे हा वाढदिवस माझ्यासाठी खरंच खूप स्पेशल असणार आहे.
हा चित्रपट पाहून गौरव मोरे झाला अभिनेता
मे महिन्यात 10 तारखेला शिवाली आपल्या नवीन घराची पूजा करणार आहे. त्याचवेळी आपल्याला तिच्या नवीन घराची झलक दिसणार आहे. शिवाली यावर्षी 29 वा वाढदिवस साजरा करणार आहे. एवढ्या कमी वयात मुंबईसारख्या महानगरात स्वतःच्या हक्काचं घर (Actress Shivali Parab New Home) घेणं ही काही छोटी बाब नाही त्यामुळे शिवालीच्या कुटुंबियांना आणि फॅन्सना तिचा खूपच अभिमान वाटतोय. ही बातमी कळताच सगळेजण शिवालीला नवीन घरासाठी भरभरून शुभेच्छा देत आहेत.
मनोरंजनविश्वातील अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा.
तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद !