Actress Lalita Pawar रामायणातील मंथरा हे पात्र आठवलं की, अभिनेत्री ललिता पवार यांची आठवण येते. नकारात्मक भूमिका कशी साकारावी, कसा अभिनय करावा याचे जिवंत उदाहरण म्हणजे ललिता पवार. परंतु तुम्हाला माहिती आहे का, मंथरा साकारताना त्यांनी जसा चेहरा केला होता, तो त्यांचा अभिनय नव्हता. तर त्यांचा खरा चेहराचं तसा होता आणि हे सगळं घडलं होतं हे एका अपघातामुळे.
Actress Lalita Pawar
ललिता पवार यांनी वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी अभिनयाला सुरुवात केली होती. शेकडो चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. त्या अतिशय सुंदर दिसायच्या. मुख्य अभिनेत्री म्हणूनही त्यांनी कामं केली. परंतु 1942 मध्ये भगवानदादा यांच्या जंग ए आजादी या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान एका सीनमध्ये भगवान दादांनी चुकून ललिता पवार यांच्या थोबाडीत इतक्या जोरात मारली की, त्यांना चेहऱ्याचा अर्धांगवायू झाला आणि डोळाही निकामी झाला. तीन वर्ष उपचार घेऊनसुद्धा त्या पूर्णपणे बऱ्या होऊ शकल्या नाहीत.
आणि मग त्यानंतर ललिता पवार Actress Lalita Pawar यांना फक्त नकारात्मक भूमिकाचं मिळाल्या. परंतु हेच आपलं नशीब असा विचार करून त्यांनी हार मानली नाही आणि नकारात्मक भूमिकांमध्ये सुद्धा त्यांनी इतिहास घडवला. ललिता पवार यांच्यासारखी नकारात्मक भूमिका कोणीचं करू शकत नाही, असं आजही प्रेक्षक म्हणतात.
प्रसिद्ध युट्युबर अँग्री रेंटमॅनचा मृत्यू
रामायण बनवताना जेव्हा रामानंद सागर हे मंथराच्या भूमिकेसाठी अभिनेत्रीचा विचार करत होते. तेव्हा त्यांच्यासमोर ललिता पवार Actress Lalita Pawar हे एकमेव नाव समोर होतं आणि या ललिता पवार यांनी हे पात्र अमर केलं.
ललिता पवार जीवनकहानी
एकीकडे ललिता पवार त्यांच्या व्यावसायिक आयुष्यात यश मिळवत होत्या, तर दुसरीकडे त्यांचं वैयक्तिक आयुष्य मात्र खूप दुःखात गेलं. त्यांच्या लहान बहिणीने त्यांच्या नवऱ्याशी लग्न केलं आणि त्यांचा संसार मोडला. त्यानंतर त्यांनी दुसरं लग्न केलं. पण दुसऱ्या पतीचाही लवकर मृत्यू झाला. त्यानंतर त्या पुण्यात जाऊन राहू लागल्या.
परंतु पुण्यात त्यांच्याबरोबर कोणीही राहत नव्हतं. त्या एकट्याचं राहायच्या. काही वर्षानंतर एक दिवस त्यांचा मुलगा त्यांना फोन करत होता. परंतु त्यांनी फोन उचलला नाही. मुलगा पुण्यात आला, तेव्हा त्याला दिसलं की आईचा तीन दिवसापूर्वीचं मृत्यू झाला आहे.
तुम्हाला ललिता पवार यांची कोणती भूमिका सर्वात जास्त आवडते ? नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाचं नवीन नवीन आणि इंटरेस्टिंग माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !