Actress Kshiti Jog Marriage अभिनेत्री क्षिती जोग आणि अभिनेता दिग्दर्शक हेमंत ढोमेची जोडी मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणून ओळखली जाते. या दोघांनीही आपल्या अभिनयकौशल्याच्या जोरावर सिनेसृष्टीत मोठं नाव कमावलं आहे. त्यांचे अनेक चाहतेदेखील आहे. क्षिती आणि हेमंत 2012 साली लग्नबंधनात अडकले होते. आता त्यांच्या लग्नाला 12 वर्ष पूर्ण झाले आहेत आणि ते खूप सुखाने संसार करत आहेत.
Actress Kshiti Jog Marriage
पण आता क्षितीने एका मुलाखतीत आपल्या लग्नाबद्दल एक खुलासा केला आहे. तिने सांगितलं की, ती आणि हेमंत दोघेही अभिनयक्षेत्रात काम करायचे त्यामुळे त्यांची छान ओळख झाली. ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि मग त्यांनी लग्न करण्याचा (Actress Kshiti Jog Marriage) निर्णय केला. पण त्या दोघांचं लग्न टिकणार नाही असंच सगळ्यांचं मत होतं.
क्षिती आणि हेमंत दोघेही स्वभावाने एकमेकांपेक्षा खूपच वेगळे आहेत. याशिवाय क्षिती आधी ज्या रिलेशनशिपमध्ये होती त्यापेक्षाही हेमंत माणूस म्हणून वेगळा होता.
अभिनेत्री क्षिती जोग लग्न
हे सर्व पाहता क्षितीची आई तिला म्हणाली होती की तुमच्या लग्नाला एक वर्ष झालं तरी देवच पावला म्हणायचा. याशिवाय क्षितीने आपला मित्र समीर विध्वंसला फोन करून आपल्या आणि हेमंतच्या लग्नाबद्दल सांगितलं होतं तेव्हा तोसुद्धा हे लग्न करू नकोस असंच म्हणाला होता.
क्षितीने तिची मैत्रीण मुग्धा कर्णिकला आपल्या निर्णयाबद्दल सांगितलं तेव्हा तिनेसुद्धा तुला याबद्दल खात्री आहे का ? असं विचारलं होतं. तेव्हा क्षितीने विचार केला होता (Actress Kshiti Jog Marriage) की मला इतके दिवस खात्री असूनही काही झालं नाही तर आता खात्री नसताना काय होतं ते करून बघू.
या दिवशी टीव्हीवर पाहता येणार बाईपण भारी देवा चित्रपट
त्यावेळी क्षितीने कोणाचंही न ऐकता फक्त स्वतःच्या प्रेमावर विश्वास ठेवून लग्न केलं आणि आज 12 वर्षांनंतरही त्यांचा संसार सुखाने सुरू आहे. खऱ्या अर्थाने लग्नानंतरच (Actress Kshiti Jog Marriage) त्यांची प्रेमकहाणी सुरू झाली आणि ते एकमेकांना ओळखायला लागले. क्षिती ही हेमंतपेक्षा 3 वर्षांनी मोठी आहे. लग्न झाल्यानंतर ते काही काळ भांडले पण ते कायम सोबत राहिले. ते दोघे नवरा बायकोपेक्षा एकमेकांचे चांगले मित्र आणि साथीदार आहेत. आज त्यांच्या प्रेमळ नात्याकडे बघून अनेकजण प्रेरणा घेत असतील.
मनोरंजनविश्वातील अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा.
तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद.