Actress Angha Atul Father : अभिनेत्री अनघा अतुलचे बाबा आहेत हे प्रसिद्ध व्यक्ती

 Actress Angha Atul Father 

Actress Angha Atul Father अभिनेत्री अनघा अतुल ही मराठी मालिकाविश्वातील एक आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने तिच्या उत्तम अभिनयाने आणि मनमोहक सौंदर्याने नेहमीच प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. ती ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील श्वेताच्या भूमिकेमुळे खूपच लोकप्रिय झाली. पण या मालिकेने निरोप घेतल्यानंतर ती सध्या ‘पिरतीचा वणवा उरी पेटला’ या मालिकेत भूमिका साकारतेय.

 Actress Angha Atul Father 

अभिनेत्री अनघा अतुलचं पूर्ण नाव आहे अनघा अतुल भगरे. अनघा अतुल ही तर एक प्रसिद्ध अभिनेत्री आहेच पण तिचे बाबासुद्धा अतिशय लोकप्रिय आणि प्रसिद्ध ज्योतिषी आहेत. तिच्या बाबांचं नाव Actress Angha Atul Father अतुलशास्त्री भगरेगुरुजी आहे. टीव्हीवरील ‘वेध भविष्याचा‘ आणि ‘घेतला वसा टाकू नको’ या ज्योतिषविषयक कार्यक्रमांच्या माध्यमातून ते प्रचंड लोकप्रिय झाले आहेत. आपल्या ज्योतिषविद्येमुळे भगरे गुरुजींनी खूप लोकप्रियता मिळवली आणि त्यांचा मोठा चाहता वर्गदेखील आहे.

अभिनेता ओंकार गोवर्धन दिसणार नव्या भूमिकेत

अनघाच्या करियरबद्दल बोलायला गेलं तर तिने मास कम्युनिकेशनमध्ये एसएनडीटी कॉलेज मुंबईमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. तिने किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णी, व्हाट्सएप लग्न या सिनेमांसाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं. तिने फिल्मफेअरसोबत सेलिब्रिटी मॅनेजमेंटसाठीही काम केलं. कोठारे व्हिजनसाठी पीआर ब्रँड मॅनेजर म्हणूनही काम केलं. यासोबतच टॅगर्स पीआरसाठी पीआर हेड म्हणून काम केलं.

अभिनेत्री अनघा अतुल बाबा  

Actress Angha Atul Father अनघाने दिल दोस्ती दोबारा मालिकेत छोटासा कॅमिओ रोल केला होता. अनन्या या नाटकात अनन्याची मैत्रीण प्रियांकाची भूमिका केली होती. विमोक्ष, लव्ह इज डेड या शॉर्टफिल्ममध्ये तिने काम केलं. तिने निरमा, मुक्तीचमक टूथपेस्ट, कलर्स मॅड 2 प्रोमो या टीव्ही जाहिरातींमध्येही काम केलं.

अनघाला बाईक आणि कार ड्रायव्हिंग, डांसिंग, रोप आणि मार्शल आर्टसची खूप आवड आहे. सध्या तिने पुण्यातील डेक्कन जिमखाना भागात वदनी कवळ नावाने आपलं नवीन हॉटेलसुद्धा सुरू केलं आहे. आपला भाऊ अखिलेशसोबत मिळून तिने हे शाकाहारी हॉटेल सुरू केलंय.

या हॉटेलमध्ये खवय्यांना शुद्ध शाकाहारी पारंपरिक महाराष्ट्रीयन थाळीचा आस्वाद घेता येईल. हॉटेलची नेमप्लेटसुद्धा खूपच हटके आहे. तिच्या या नवीन मराठमोळ्या हॉटेलला खवय्यांचा खूपच उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अभिनयाप्रमाणेच ती या नवीन व्यवसायातही यशस्वी ठरली आहे.

मनोरंजनविश्वातील अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा. 

तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. 

Scroll to Top